Reading Time: 3 minutes

मागच्या भागात आपण ‘जन्म दाखला’ आणि ‘आधारकार्ड’ अशा दोन महत्वाच्या  कागदपत्रांची माहिती घेतली. देशातील प्रत्येक नागरिकासाठी ही दोन्ही कागदपत्रे कायद्याने अनिवार्य आहेत. या भागात आपण लहान मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या इतर कागदपत्रांबद्दल माहिती घेऊया.

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग १

पासपोर्ट:

  • पासपोर्ट हे महत्वाचे कागदपत्र असले तरी जन्मदाखला व आधारकार्ड प्रमाणे प्रत्येकाकडे पासपोर्ट असणे अनिवार्य नाही. मात्र परदेशगमनासाठी पासपोर्टची आवश्यकता असते.
  • पासपोर्टची प्रक्रिया तशी काहीशी किचकट व त्रासदायक आहे. परंतु लहान मुलांचा पासपोर्ट काढताना  मात्र तसा फारसा त्रास होत नाही.
  • नागरिकत्व, ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून हा एक अत्यंत महत्वाचा दस्तऐवज आहे.
  • १८ वर्षाखालील म्हणजेच अल्पवयीन मुलांनाही स्वतंत्र पासपोर्ट जारी केला जातो. अल्पवयीन मुलांना ३६-पानांची  पासपोर्ट पुस्तिका जारी केली जाते.
  • अल्पवयीन मुलांचा पासपोर्ट पाच वर्षांसाठी किंवा १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत यापैकी जे आधी असेल तोपर्यंत वैध असतो. तथापि, १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी अल्पवयीन पासपोर्टऐवजी दहा वर्षांच्या पासपोर्टसाठी अर्ज करता येतो. परंतु यासाठी मात्र पोलिस व्हेरिफिकेशनची (पडताळणी) आवश्यकता असते.
  • अल्पवयीन मुलांचा पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया प्रौढांसारखीच आहे. Www.passportindia.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरून झाल्यावर पासपोर्ट ऑफिसच्या अपॉइंटमेंटसाठीची तारीख व वेळ निश्चित होते. नेमून दिलेल्या दिवशी व वेळी वेबसाइटवर नमूद केलेले दस्तावेज घेऊन पासपोर्ट ऑफिसमध्ये जाणे आवश्यक आहे.
  • नवीन नियमांनुसार, प्रत्येक अर्जदाराला पासपोर्ट कार्यालयात, बायोमॅट्रिक्स पडताळणी व छायाचित्र काढण्यासाठी पासपोर्ट ऑफिसमध्ये उपस्थित असणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदार लहान  बाळ असेल तरीही बाळाला पासपोर्ट ऑफिसमध्ये घेऊन जाणे अनिवार्य आहे. पालकांनी यावेळी मुलांसोबत उपस्थित असणे बंधनकारक नसले तरी त्यांची पासपोर्ट जारी करण्यासंदर्भात लेखी परवानगी असणे अनिवार्य आहे.

अल्पवयीन मुलाच्या पासपोर्टची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रे:

  • पासपोर्टसाठी शक्यतो मूळ (Original) कागदपत्रे सादर करावी लागतात. फोटोकॉपी किंवा नोटराइज्ड प्रती स्वीकारल्या जात नाहीत.

अर्ज:

  • नवीन पासपोर्टसाठी डीएस ११ अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. संपूर्ण फॉर्म व्यवस्थित भरुन सबमिट करावा. पासपोर्ट एजंटने निर्देशित केल्याशिवाय डीएस -11 फॉर्मवर स्वाक्षरी करु नये.

पासपोर्ट फोटो:

  • पासपोर्टसाठी फोटो काढताना फोटोग्राफरला हे फोटो पासपोर्टसाठी हवे आहेत म्हणून सांगणे आवश्यक आहे. कारण पासपोर्टसाठी विशिष्ठ प्रकारचे फोटो फॉर्मसोबत जोडावे लागतात.

नागरिकत्वाचा व नातेसंबंधांचा पुरावा:  

  • नागरिकत्वाठी मुलाचा जन्मदाखला तर नातेसंबंधाचा पुरावा म्हणजे पालकांचे मुलाशी असलेले नाते व त्याचा पुरावा सादर करणेआवश्यक आहे.

पालकांचे संमतीपत्र:  

  • मुलांच्या पासपोर्टसाठी  किमान एका पालकाचे संमतीपत्र आवश्यक आहे

पासपोर्ट शुल्क:

  • पासपोर्टसाठी आवश्यक असणारे शुल्क पासपोर्ट ऑफिसमध्ये भरावे लागते.

एकेरी पालकत्व:

  • जर अल्पवयीन व्यक्तीस फक्त एकच(सिंगल) पालक असेल तर त्यासंदर्भातील पुरावा सादर करावा. पुराव्यामध्ये न्यायालयीन आदेश असल्यास त्यामध्ये सद्य पालकास पासपोर्टसाठी अर्ज करण्याची परवानगी नमूद केलेली असावी अथवा पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र अक्षमतेबाबतचे  न्यायालयीन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

तात्काळ पासपोर्ट:

  • सामान्यतः सहा आठवड्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा पासपोर्ट पोस्टाने घरी येतो. परंतु काही कारणांमुळे जर तात्काळ पासपोर्ट हवा असल्यास तात्काळ पासपोर्टची सुविधा लहान मुलांच्या पासपोर्टसाठीही उपलब्ध आहे.

पॅनकार्ड:

  • पॅन (PAN) म्हणजेच कायमस्वरूपी खाते क्रमांक. हा खाते क्रमांक धारण करणाऱ्या प्रत्येक नागरीकाच्या उत्पन्नाची व आर्थिक व्यवहारांची माहिती या पॅन नंबरवर उपलब्ध असते. भारतातील प्रत्येक कर भरणाऱ्या नागरिकांजवळ पॅनकार्ड असणे बंधनकारक आहेच परंतु अठरा वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने पॅन कार्ड काढणे आवश्यक आहे. पॅन नंबर हा कायमस्वरूपी नंबर असतो.  जो धारकाच्या संपूर्ण आयुष्यात कधीही बदलत नाही.
  • सामान्यतः पॅन कार्डसाठी 18 वर्षांनंतर अर्ज केला जातो परंतु १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीसाठीही  पॅन कार्ड लागू केले जाऊ शकते. राजकोट येथील ‘आहना’ ही १० दिवसाची मुलगी सर्वात लहान पॅन कार्ड धारक आहे.

अल्पवयीन मुलांसाठी पॅन कार्डची आवश्यकता:

  • जर अल्पवयीन मूल त्याच्या कौशल्याचा उपयोग करुन कमाई करत असेल तर त्याचे उत्पन्न पालकांच्या उत्पनासोबत  जोडले जात नाही आणि सदर उत्पन्नावर त्याला आयकर रिटर्न भरून द्यावे लागत असल्यामुळे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • अल्पवयीन मुलाच्या/ मुलीच्या  नावावर गुंतवणूक केल्यास व आपल्या गुंतवणूकीसाठी आपल्या अल्पवयीन मुलाच्या/ मुलीच्या नामनिर्देशित केले असल्यास अल्पवयीन मुलांचे पॅन कार्ड असणे  आवश्यक आहे.

अल्पवयीन मुलांसाठीची  पॅन कार्ड प्रक्रिया:

  • अल्पवयीन पॅनसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रौढांसारखीच आहे आणि हे  पॅन कार्ड जवळपास प्रौढांच्या पॅन कार्डप्रमाणेच असत.
  • अल्पवयीन व्यक्तीला जारी केलेल्या अल्पवयीन पॅनकार्डमध्ये अल्पवयीन व्यक्तीचा फोटो किंवा स्वाक्षरी नसते; म्हणूनच अल्पवयीन व्यक्तीला १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पॅन कार्ड अपडेट(अद्ययावत) करावे लागते.
  • अल्पवयीन व्यक्तीचे पॅन कार्ड अद्ययावत करण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागतो. अर्जासोबत फोटो सादर करून स्वाक्षरीही अद्ययावत करून घ्यावी लागते.
  • पॅन नंबर हा कायमस्वरूपी नंबर असतो. जो धारकाच्या संपूर्ण आयुष्यात कधीही बदलत नाही. त्यामुळे अल्पवयीन फक्त फोटो व स्वाक्षरीसह अद्ययावत केले जाते.  पॅन कार्ड नंबर व नाव बदलत नाही.

अल्पवयीन मुलांच्या  पॅन कार्डचे फायदे-  

अल्पवयीन मुलांसाठी पॅन कार्डसाठी अर्ज करण्याच्या अनेक फायदे आहेत-

  • मालमत्ता, शेअर्स किंवा कोणत्याही आर्थिक उत्पन्नासाठी नॉमिनी बनविल्यास, अल्पवयीन व्यक्तीजवळ पॅन कार्ड असणे आवश्यक असते.
  • जर अल्पवयीन मुलाच्या नावे  गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणुकीच्या वेळी त्याचे पॅन कार्ड सादर करावे लागते.
  • पॅन कार्ड हे धारकासंबंधीची सर्व करविषयक माहिती एकत्रित करण्यासाठी असले तरीही कोणत्याही उत्पन्नातून अल्पवयीन व्यक्तीला मिळालेले उत्पन्न अथवा त्यांच्या नावे केलेली गुंतवणूक करपात्र होत नाही. परंतु  खाली नमूद केलेल्या परिस्थिती याला अपवाद ठरतात.
    • जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीस शारीरिक अपंगत्व असेल तर तो पूर्ण अंधत्वाने ग्रस्त असेल,
    • जर अल्पवयीन व्यक्तीने स्वत: च्या कौशल्यांचा वापर करून उत्पन्न मिळवले असेल अथवागुंतवणूक केलेली असेल, तर  मुलांचे उत्पन्न करपात्र होत असल्याने ते काढून घेणे आवश्यक आहे. 

जर लहानपणीच मुलांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन ठेवली तर मुलांना भविष्यात इतर कागदपत्रे तयार करताना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तसेच लहानपणी तयार केलेल्या कागदपत्रांची नूतनीकरणाची प्रक्रिया (Renewal) तुलनेने सोपी असते. 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2PXzQjx )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.