सिबिल CIBIL
Reading Time: < 1 minute
  • सिबिल (CIBIL) म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. ही कंपनी भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या आणि कंपनीच्या आर्थिक हालचालींची नोंद ठेवते.

  • सिबिलकडे आपला आर्थिक लेखाजोखा असतो. आपले क्रेडिट कार्ड्स, कर्ज, कर्जाची वारंवारता, त्यांचे हप्ते, त्यांची झालेली परतफेड, परतफेड करण्याच्या वेळा, पद्धती, थकबाकी, इत्यादी सगळी माहिती जपली जाते.

  •  ही सगळी माहिती नोंदणीकृत बँका व इतर आर्थिक संस्था सिबिलकडे नियमितपणे (साधारणतः मासिक पद्धतीने) पोहोचवत असतात.

  • सिबिल या सगळ्या माहितीवर आधारित प्रत्येक व्यक्तीचा एक क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (CIR) आणि क्रेडिट स्कोअर तयार करते. आर्थिक संस्थाकडून पुढील माहिती येईपर्यंत हाच त्या-त्या व्यक्तीचा/कंपनीचा क्रेडिट स्कोअर असतो. ह्या क्रेडिट स्कोअरलाच तुमची अधिकृत आर्थिक विश्वासार्हता म्हणून पाहिलं जातं.

  • भारतीय नागरिकांच्या व उद्योजकांच्या आर्थिक हालचालींबाबत अधिक पारदर्शकता व कार्यक्षमता यावी यासाठी सन २००० मध्ये सिबिल या संस्थेची स्थापना झाली. देशभरातील सुमारे ९०० सरकारी, खाजगी, व सहकारी बॅंका तसेच नॉन बॅंकिंग फायनान्शिअल इन्स्टिट्यूट्स (NBFC) या संस्थेशी संलग्न आहेत.

  • सिबिलचे कन्ज्यूमर ब्युरो व कमर्शिअल ब्युरो असे दोन प्रमुख विभाग आहेत. कन्ज्यूमर विभागातर्फे हा व्यक्तीगत आर्थिक नोंदी ठेवल्या जातात, तर कमर्शिअल विभागातर्फे संस्था व व्यापारीमंडळांच्या आर्थिक नोंदी ठेवल्या जातात.

  • आजमितीला जवळपास सर्वच बँका कर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता पडताळून पहाण्यासाठी सिबिलद्वारे दिल्या जाणाऱ्या क्रेडिट स्कोअरवरती अवलंबून असतात.

  • सिबिलद्वारे मिळणाऱ्या या माहितीमुळे बँका कर्ज देण्याच्या जोखिमेचं अधिक चांगलं मुल्यांकन व व्यवस्थापन करू शकतात. शिवाय, कर्ज घेऊ बघणारे ग्राहकही स्वतःचे सिबिल रिपोर्ट आणि स्कोअर पाहू शकत असल्याने आपल्याला कर्ज मंजूर होण्याच्या शक्यतांचा अंदाज त्यांना आधीच बांधता येतो. असे केल्याने त्यांना स्वतःच्या आर्थिक विश्वासार्हतेची बँकांसमोर असलेली प्रतिमा लक्षात येते, व कर्जासाठी अर्ज करण्याआधीच ती सुधारण्याचीही संधीही मिळते. ह्यामुळे भविष्यात कर्ज नामंजूर होण्याच्या शक्यता बाद होण्यास मदत होते.

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Dm0fkg)

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…