Reading Time: 4 minutes

कायदेशीर कागदपत्रे हा अनेक ठिकाणी लागणारी आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. अगदी जन्मापासून सुरु झालेला हा कागदपत्रांचा सिलसिला मृत्यूनंतर मृत्यू-दाखला मिळाल्यावरच संपतो. जर लहानपणीच मुलांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार करुन ठेवली तर शाळेच्या प्रवेशापासून अगदी परदेशगमनापर्यंतच्या बहुतांश गोष्टी करताना वेळ वाचेल व इतर अडचणींचा सामनाही करावा लागणार नाही.

१. जन्म-दाखला:

   बाळाच्या जन्मानंतर त्याच्या जन्माची नोंद जन्म-मृत्यू कार्यालयात करणे आवश्यक आहे. या जन्मदाखल्यावर-

    – बाळाचे संपूर्ण नाव

   – आई व वडिलांचे संपूर्ण नाव

   – बाळाचे लिंग

   – बाळाची  जन्मतारीख

   – जन्मठिकाण

 या सर्व गोष्टींची नोंद केलेली असते. जन्मदाखला ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात पहिले व सर्वात महत्वाचं कागदपत्र आहे. जन्मदाखला शाळेचा प्रवेश, आधार कार्ड नोंदणी, पासपोर्ट, बॅंक अकाउंट ओपनिंग, इत्यादी सर्व  ठिकाणी मागितले जाते..

     नोंदणी:

 • बाळाच्या जन्मानंतर २१ दिवसांच्या आत हॉस्पिटल, संस्था अथवा कुटुंबातील सदस्याकडून जन्म-मृत्यू कार्यालयात बाळाच्या जन्माची नोंद करावी लागते.
 • दत्तक मुलाच्या जन्मदाखल्यासाठी कायद्यामध्ये वेगळी तरतूद केलेली आहे. त्या तरतुदींनुसार दत्तक मुलाचा जन्मदाखला त्याच्या पालकांना मिळतो.
 • ज्या गावात/ शहरात बाळाचा जन्म झालेला असेल त्या गावातील/ शहरातील जन्म-मृत्यू कार्यालयातच  बाळाच्या जन्माची नोंदणी करणे आवश्यक आहे. इतर ठिकाणी नोंदणी करता येत नाही.
 • बाळाच्या  जन्माच्या सर्व तपशीलांविषयी पत्र हॉस्पिटलमार्फत जारी केले जाते.

      जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate) :

 • नोंदणीनंतर जन्म-मृत्यू कार्यालयात रजिस्ट्रारकडे अर्ज केल्यावर जन्म प्रमाणपत्र मिळते. बाळाच्या जन्माची नोंदणी करताना जन्मठीकाणानुसार कार्यालय ठरते. उदा. जर बाळाचा जन्म गावामध्ये झाला असेल तर ग्रामपंचायत किंवा स्थानिक संस्था;  शहारामध्ये असेल तर नगरपरिषदेमधील आरोग्य अधिकारी; महानगरामध्ये झाला असेल तर महानगरपालिकेतील आरोग्य अधिकारी.
 • जन्मादाखल्याची प्रत (फक्त प्रथम प्रत) मोफत मिळते. यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही (RBD Act कलम १२ ).
 • एकापेक्षा जास्त प्रती हव्या असल्यास मात्र नियमानुसार ठरलेली फी भरावी लागते (RBD Act कलम १७). एकापेक्षा जास्त प्रती घेणे कधीही चांगलं.
 • जन्म-दाखल्याची इंग्रजी प्रत हवी असल्यास अन्य भाषेतील जन्मदाखला दाखविल्यानंतर जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयातील वरिष्ठ नोंदणी अधिकाऱ्यामार्फत ( रजिस्ट्रार) ते जारी केले जाते.
 • जन्म दाखल्यातील बदल आणि कोर्ट ऑर्डर: जन्म दाखल्यामध्ये  कायदेशीररित्या बदल करणे   किंवा सुधारित करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची आवश्यकता असल्यास-
  • संबंधित कार्यालयाशी व गॅझेट ऑफिसशी संपर्क साधून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन व आवश्यक ते फॉर्म भरुन त्यावर सही करुन ते कोर्टासमोर सादर करावे.
  • न्यायाधीशांसमोर बदल करण्याच कारण, त्यामागचा आपला हेतू,  इत्यादी सर्व गोष्टी स्पष्ट करुन आपली विनंती मंजूर करुन घेण्यासाठी विनंती करावी.
  • आपली विनंती मंजूर झाल्यास विनंती केलेली जन्मतारीख अथवा नावाचा वापर करण्याची परवानगी असल्याची एक प्रमाणित ऑर्डर मिळते.
  • मूळ जन्मदाखल्यामध्ये बदल करुन घेण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क  करुन नवीन कायदेशीर नावासह अथवा नवीन जन्मतारीख जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत सादर केल्यावर जन्मदाखल्यामध्ये बदल करुन नवीन जन्म दाखला मिळतो. यासाठी जे काही शुल्क असेल ते मात्र भरावे लागेल.

     महत्वाचे मुद्दे:

 • बाळाचे नाव:  
  • जन्मदाखल्यावर बाळाचं नाव असणे आवश्यक आहे. परंतु RBD ॲक्टच्या सेक्शन १४ नुसार बाळाच्या नावाशीवाय जन्मदाखला मिळू शकतो.
 • जन्म दाखल्यातील बदल:  अनेकवेळा काही कारणांमुळे आपल्या जन्मदाखल्यामध्ये बदल किंवा सुधारणा करण्याची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने; जन्मतारीख बदलणे व नाव बदलणे या दोन गोष्टींचा सामावेश होतो. काही कारणांमुळे जन्मतारीख व नाव चुकीचे अथवा चुकीच्या पद्धतीने लिहिले गेलेले असल्यास त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता भासते. यासाठी-
  • संबंधित कार्यालयाशी संपर्क करुन आवश्यक ती माहिती व कागदपत्रे दिल्यानंतर  ही प्रक्रिया पूर्ण होते.
  • दत्तक मुलाच्या बाबतीत पालकांचे नाव बदलण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. यामध्ये बाळाचे वय १ वर्षापेक्षा कमी असल्यास न्यायालयीन प्रक्रियेशिवाय केवळ आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.
 • जन्म दाखल्यातील बदल आणि कोर्ट ऑर्डर: जन्म दाखल्यामध्ये  कायदेशीररित्या बदल करणे   किंवा सुधारित करण्यासाठी कोर्ट ऑर्डरची आवश्यकता असल्यास-
  • संबंधित कार्यालयाशी व गॅझेट ऑफिसशी संपर्क साधून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करुन व आवश्यक ते फॉर्म भरुन त्यावर सही करुन ते कोर्टासमोर सादर करावे.
  • न्यायाधीशांसमोर बदल करण्याच कारण, त्यामागचा आपला हेतू,  इत्यादी सर्व गोष्टी स्पष्ट करुन आपली विनंती मंजूर करुन घेण्यासाठी विनंती करावी.
  • आपली विनंती मंजूर झाल्यास विनंती केलेली जन्मतारीख अथवा नावाचा वापर करण्याची परवानगी असल्याची एक प्रमाणित ऑर्डर मिळते.
  • मूळ जन्मदाखल्यामध्ये बदल करुन घेण्यासाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क  करुन नवीन कायदेशीर नावासह अथवा नवीन जन्मतारीख जारी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत सादर केल्यावर जन्मदाखल्यामध्ये बदल करुन नवीन जन्म दाखला मिळतो. यासाठी जे काही शुल्क असेल ते मात्र भरावे लागेल.

२. आधारकार्ड:

 • आधारकार्ड हे जन्मदाखल्यानंतर आवश्यक असणारे दुसरे महत्वाचे कागदपत्र आहे. मुलांसाठी असणारे आधार कार्ड  ‘बाल आधार’ म्हणून ओळखले जाते व ते निळ्या रंगाचे असते.
 • काही हॉस्पिटल्सनी बाळाच्या जन्माच्या वेळीच आधार कार्ड नोंदणीची प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. जन्म प्रमाणपत्रांसह आधार कार्ड नोंदणीची पावती पालकांना दिली जाते.
 • आजकाल बहुतांश शाळा प्रवेशासाठी आधारकार्ड अनिवार्य (compulsory) करत आहेत.
 • मार्च २०१७ मध्ये, सरकारनेमिड-डे मिल’  योजनेचा लाभ घेणाऱ्या मुलांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने घोषित केले आहे की आधार कार्डशिवाय मुलांना मिड-डे मिल योजनेचा लाभ घेता येणार नाही.
 • लहान मुलांच्या आधारकार्डसाठीच पालकांनी अर्ज करावा. पालकांचे आधारकार्ड नसल्यास पाल्याचे आधारकार्ड काढता येत नाही.
 • जर मुल ५ वर्षांपेक्षा लहान असेल तर त्याच्या पालकांच्या आधारकार्डला मुलाचे आधारकार्ड लिंक केले जाते (जोडले जाते).
 • मुल ५ वर्षांचे झाल्यावर, मुलाची बायोमॅट्रिक  पडताळणी करणे आवश्यक आहे.

       आधारकार्डाची प्रक्रिया:

  • आधार कार्ड एनरॉलमेंट कार्यालयामध्ये जाऊन, आधार कार्डचा संपूर्ण फॉर्म भरुन द्यावा.
  • मुलाच्या जन्मदाखल्याची  व आई किंवा वडिलांच्या आधार कार्डची किमान एक एक प्रत सादर करावी. तसच पडताळणीसाठी मुळ प्रतही  सोबत न्यावी.
  • जर मुलाचा मुळ जन्मदाखला शाळेमध्ये दिलेला असेल तर शाळेचे आयकार्ड सादर करावे.
  • मुलाच्या चेहऱ्याचा फोटो, बायोमॅट्रिक पडताळणी, बोटांचे ठसे, इत्यादी इतर सर्व गोष्टी एनरॉलमेंट सेंटरवरच आधार कार्ड नोंदणीच्या (Registration) वेळी केल्या जातात.
  • जर मुल ५ वर्षांपेक्षा लहान असेल तर  बायोमॅट्रिक पडताळणी केली जात नाही. मुल ५ वर्षांचे झाल्यानंतर, मुलाची बायोमॅट्रिक  पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच १५ वर्षांनंतर संपूर्ण प्रक्रिया पुन्हा करणे आवश्यक आहे.
  • आधारकार्डची नोंदणी केल्यानंतर एनरॉलमेंट नंबर मिळतो. या नंबरद्वारे आधार कार्डचे स्टेटस संबंधित वेबसाईटवर तपासून पहाता येते.
  • सामान्यतः नोंदणीपासून ९० दिवसांच्या आत आधार कार्ड पोस्टामार्फत घरी येते.

लहान मुलांसाठी काही महत्वाची कागदपत्रे भाग २

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.