- प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीची व त्रासमुक्त करण्यात झाली आहे. म्हणूनच भारतात केंद्र सरकारने ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकरामध्ये काही करसवलती दिलेल्या आहेत. (Income Tax Benefits for senior citizens and super senior citizens)
- कित्येकदा, या योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या नीट समजून घेतल्या जात नाहीत, त्यामुळे या करसवलतींचा लाभ घेण्यामध्ये अडचणी येतात.
- सरकारच्या करसवलतींचा लाभ मिळाल्यास कोणत्याही आर्थिक स्थितीतील ज्येष्ठ नागरिकांचे जगणे सुसह्य व आनंदी होण्यामध्ये मोठी मदत होते.
- या सर्व सरकारी योजनांमुळे, त्यांच्या म्हातारपणी एक प्रकारचा आर्थिक आधार त्यांना नक्कीच मिळतो.
- म्हणूनच आपण या लेखातून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध प्राप्तीकर सवलती जाणून घेणार आहोत.
हे ही वाचा – ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर समस्या आणि त्यावरील उपाय
ज्येष्ठ नागरिक व अतिज्येष्ठ नागरिक म्हणजे नक्की कोण –
- ज्येष्ठ नागरिक (senior Citizens) – वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक व ८० पेक्षा कमी.
- अतिज्येष्ठ नागरिक (Super senior Citizens) – वय ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त.
ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तीकरातील विविध करसवलती –
1) कलम ८०टीटीबी व्याजातील वजावट –
- ८०टीटीबी अंतर्गत रु. १०,००० पर्यंतची वजावट तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,००० पर्यंतची वजावट उपलब्ध आहे.
- रु. ५०,००० पेक्षा जास्त कमावलेल्या रकमेवर कर आकारण्यात येईल ज्यामध्ये बचत खात्यावरील व्याजासाठी रु.१०,००० पर्यंत असलेली (कलम ८०टीटीबी अंतर्गत असणारी) वेगळी वजावट मिळणार नाही.
2) कलम ८०डी अंतर्गत वजावट –
- कलम ८०डी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय विमा हप्त्यावरील रु. २५,००० पर्यंतची वजावट आता रु.५०,००० पर्यंत वाढवली आहे.
- कलम ८०डी प्रमाणे केवळ वैद्यकीय विमा हप्त्यासाठीच नव्हे तर, ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांवर केलेला प्रत्यक्ष खर्चदेखील वजावट म्हणून मिळू शकतो.
3) व्याजातून टीडीएस ची मर्यादा –
- मुदत ठेवींवरील व्याजावर टीडीएस न कापण्यासाठी प्राप्तीकर अर्ज १५एच अंतर्गत करकपातीची मर्यादा ही रु. १०,००० वरून रु.५०,००० करण्यात आली आहे जेव्हा, –
-करदात्याच्या एकूण उत्पन्नाला प्राप्तिकरातून सूट असेल व
-त्या आर्थिक वर्षासाठी त्याला/तिला शून्य कर देयता असेल.
4) कलम ८०टीडीबी अंतर्गत जास्त वजावट –
- विशिष्ट रोगांच्या वैद्यकीय उपचारांवर खर्च झाल्यास कर कपातीतून सवलत.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुमत वजावटीची रक्कम रु.६०,००० वरून रु,१,००,००० पर्यंत वाढवली आहे.
5) आगाऊ कर भरण्याची आवश्यकता नाही-
- ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या व्यवसायातून उत्पन्न मिळत नाही, अशा नागरिकांना आगाऊ कर भरण्याची गरज नाही.
हे ही वाचा – Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?
नवे कलम १९४पी काय आहे –
प्राप्तीकर कायदा, १९६१ मधील नवे नियम कलम १९४पी हे १ एप्रिल, २०२१ पासून लागू आहेत. यामध्ये ७५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यापासून सूट मिळते.
कलम १९४पी साठी असणाऱ्या विविध अटी पाहूयात –
- करदात्याचे वय ७५ वर्ष किंवा त्याहून अधिक असावे.
- प्राप्तीकर व्याख्येनुसार करदाता रहिवासी असावा.
- करदात्याचे उत्पन्न फक्त निवृत्तीवेतन आणि व्याजाचे असावे.
- ज्या बँकेत निवृत्तीवेतन जमा होते, त्याच विशिष्ट बँकेमध्ये व्याजाचे सर्व उत्पन्न असणे आवश्यक.
विविध कर-स्लैब दर (जुन्या कर प्रणालीप्रमाणे) –
करमुक्त | ५% कर | |
नागरिकांसाठी | रु. २.५० लाखांपर्यंत | रु. २.५० लाख ते
रु. ५.०० लाखांपर्यंत |
ज्येष्ठ
नागरिकांसाठी |
रु. ५ लाखांपर्यंत | रु. ३.०० लाख ते
रु. ५.०० लाखांपर्यंत |
अतिज्येष्ठ
नागरिकांसाठी |
रु. ५ लाखांपर्यंत | रु. ५.०० लाखांच्यापुढे २०% |