Reading Time: 2 minutes
  • प्राप्तीकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया आता अधिक गुंतागुंतीची व त्रासमुक्त करण्यात झाली आहे. म्हणूनच भारतात केंद्र सरकारने ज्येष्ठ व अतिज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तिकरामध्ये काही करसवलती दिलेल्या आहेत. (Income Tax Benefits for senior citizens and super senior citizens)
  • कित्येकदा, या योजना ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत किंवा त्या नीट समजून घेतल्या जात नाहीत, त्यामुळे या करसवलतींचा लाभ घेण्यामध्ये अडचणी येतात.
  • सरकारच्या करसवलतींचा लाभ मिळाल्यास कोणत्याही आर्थिक स्थितीतील ज्येष्ठ नागरिकांचे जगणे सुसह्य व आनंदी होण्यामध्ये मोठी मदत होते. 
  • या सर्व सरकारी योजनांमुळे, त्यांच्या म्हातारपणी एक प्रकारचा आर्थिक आधार त्यांना नक्कीच मिळतो. 
  • म्हणूनच आपण या लेखातून ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या विविध प्राप्तीकर सवलती जाणून घेणार आहोत. 

 

हे ही वाचा – ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर समस्या आणि त्यावरील उपाय

 

ज्येष्ठ नागरिक व अतिज्येष्ठ नागरिक म्हणजे नक्की कोण –

  • ज्येष्ठ नागरिक (senior Citizens) – वय ६० वर्षे किंवा त्याहून अधिक व ८० पेक्षा कमी. 
  • अतिज्येष्ठ नागरिक (Super senior Citizens) – वय ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त.

ज्येष्ठ अतिज्येष्ठ नागरिकांसाठी प्राप्तीकरातील विविध  करसवलती –

1) कलम ८०टीटीबी व्याजातील वजावट –

  • ८०टीटीबी अंतर्गत रु. १०,००० पर्यंतची वजावट तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,००० पर्यंतची वजावट उपलब्ध आहे. 
  • रु. ५०,००० पेक्षा जास्त कमावलेल्या रकमेवर कर आकारण्यात येईल ज्यामध्ये बचत खात्यावरील व्याजासाठी रु.१०,००० पर्यंत असलेली (कलम ८०टीटीबी अंतर्गत असणारी) वेगळी वजावट मिळणार नाही.   

2) कलम ८०डी अंतर्गत वजावट – 

  • कलम ८०डी अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय विमा हप्त्यावरील रु. २५,००० पर्यंतची वजावट आता रु.५०,००० पर्यंत वाढवली आहे.
  • कलम ८०डी प्रमाणे केवळ वैद्यकीय विमा हप्त्यासाठीच नव्हे तर, ज्येष्ठ नागरिकांच्या उपचारांवर केलेला प्रत्यक्ष खर्चदेखील वजावट म्हणून मिळू शकतो. 

3) व्याजातून टीडीएस ची मर्यादा –

  • मुदत ठेवींवरील व्याजावर टीडीएस न कापण्यासाठी प्राप्तीकर अर्ज १५एच अंतर्गत करकपातीची मर्यादा ही रु. १०,००० वरून रु.५०,००० करण्यात आली आहे जेव्हा, –

     -करदात्याच्या एकूण उत्पन्नाला प्राप्तिकरातून सूट असेल व

     -त्या आर्थिक वर्षासाठी त्याला/तिला शून्य कर देयता असेल.

4) कलम ८०टीडीबी अंतर्गत जास्त वजावट –

  • विशिष्ट रोगांच्या वैद्यकीय उपचारांवर खर्च झाल्यास कर कपातीतून सवलत. 
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी अनुमत वजावटीची रक्कम रु.६०,००० वरून  रु,१,००,००० पर्यंत वाढवली आहे. 

5) आगाऊ कर भरण्याची आवश्यकता नाही- 

  • ज्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या व्यवसायातून उत्पन्न मिळत नाही, अशा नागरिकांना आगाऊ कर भरण्याची गरज नाही. 

 

हे ही वाचा – Tax Concession: ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या या प्राप्तिकर सवलतींची तुम्हाला माहिती आहे का?

 

नवे कलम १९४पी काय आहे  –

प्राप्तीकर कायदा, १९६१ मधील नवे नियम कलम १९४पी हे १ एप्रिल, २०२१ पासून लागू आहेत. यामध्ये ७५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तीकर विवरणपत्र भरण्यापासून सूट मिळते. 

कलम १९४पी साठी असणाऱ्या विविध अटी पाहूयात –

  • करदात्याचे वय ७५ वर्ष किंवा त्याहून अधिक असावे.
  • प्राप्तीकर व्याख्येनुसार करदाता रहिवासी असावा. 
  • करदात्याचे उत्पन्न फक्त निवृत्तीवेतन आणि व्याजाचे असावे.  
  • ज्या बँकेत निवृत्तीवेतन जमा होते, त्याच विशिष्ट बँकेमध्ये व्याजाचे सर्व उत्पन्न असणे आवश्यक. 

विविध कर-स्लैब दर (जुन्या कर प्रणालीप्रमाणे) – 

करमुक्त ५% कर
नागरिकांसाठी रु. २.५० लाखांपर्यंत रु. २.५० लाख ते 

रु. ५.०० लाखांपर्यंत

ज्येष्ठ 

नागरिकांसाठी

रु. ५ लाखांपर्यंत रु. ३.०० लाख ते 

रु. ५.०० लाखांपर्यंत

अतिज्येष्ठ 

नागरिकांसाठी

रु. ५ लाखांपर्यंत रु. ५.०० लाखांच्यापुढे २०%
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…