Reading Time: 3 minutes

भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती जी नोकरी अथवा व्यवसाय करून जे उत्पन्न कामावते त्यावर भारत सरकार काही कर आकारत असते त्याला आपण आयकर म्हणतो. हा कर आयकर रिटर्न द्वारे भरला जातो. हा कर भरण्यासाठी उत्पन्नाची अट असते. 

ज्या व्यक्तींचे  वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना आयकर भरावा लागतो. यासाठी भारतामध्ये आयकर कायदा आणि नियम लागू आहेत त्यानुसार आयकर भरणे आवश्यक आहे. भारतीय आयकर कायद्यानुसार उत्पन्नाच्या प्रमाणावर कर रचना अवलंबून आहे. त्यानुसार कोणी किती आणि कुठल्या प्रकरचे फॉर्म वापरुन आयकर रिटर्न्स भरावे हे ठरलेले आहे.

हे आयकर रिटर्न भरताना अनेक वेळा नकळतपणे चुका होत असतात, या चुका झाल्यामुळे तुम्हाला आयकर विभागाकडून नोटिस मिळू शकते. हे टाळण्यासाठी काही महत्वपूर्ण अशा काही गोष्टी आजच्या लेखामधून मांडल्या आहेत त्या आपण बघणार आहोत.

हे वाचा : आपण 2023-24 मध्ये कलम 80 सी व्यतिरिक्त 5 मार्गांनी करा कर बचत

  1.   योग्य फॉर्मची निवड :  फॉर्म निवडताना तुम्ही कुठल्या उत्पन्न गटात अर्थात इन्कम स्लॅब मध्ये येता हे काळजीपूर्वक तपासा. तुम्ही कंपनी, व्यक्ती, HUF म्हणजे हिंदू अविभक्त कुटुंब यापैकी कुठल्या श्रेणी मध्ये येत आहे यावरून योग्य फॉर्म निवडला आहे का हे याची खात्री करून घ्या.

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फॉर्मची निवड तुमच्या उत्पन्नाचे स्रोत, उत्पन्नाची रक्कम यावर अवलंबून असते.फॉर्मचे प्रकार आणि कुठला फॉर्म कोणी भरावा या संबंधी थोडक्यात जाणून घेऊ. 

ITR-1 (सीए) (सहज फॉर्म ) – नोकरी आणि इतर मालमत्ता यांच्यातून मिळणारं तुमचं उत्पन्न ५० लाखांपेक्षा कमी असेल तर हा फॉर्म भरावा. याला सहज फॉर्म देखील म्हंटले जाते.

ITR-2 (एच) – हिंदू व्यक्ती किंवा अविभक्त कुटुंबासाठी : नोकरीतील उत्पन्न, भांडवली नफा, निवृत्ती वेतन यातून एकूण 50 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ITR-2 (एच) हा फॉर्म भरावा.

ITR-3 (बी) – हिंदू व्यक्ती किंवा अविभक्त कुटुंबासाठी : व्यवसाय आणि व्यवसायाच्या कमाई मधून उत्पन्न मिळाले असेल तसेच या व्यवसायामध्ये बुक्स ऑफ अकाऊंट असणे आवश्यक असते. त्यांनी हा फॉर्म भरावा. यासोबत अनलिस्टेड शेअर्स मधून काही उत्पन्न कमावले असेल तर त्यांना देखील  ITR-3 (बी) हा फॉर्म भरावा. यामध्ये वकील,डॉक्टर,चार्टर्ड अकाऊंटंट असे व्यावसायिक येतात ज्यांचे उत्पन्न हे नफा किती झाला यावर अवलंबून असते.

ITR-4 (सीएच) (सुलभ फॉर्म ) – हिंदू व्यक्ती किंवा अविभक्त कुटुंबसाठी : व्यवसाय आणि व्यवसायाच्या कमाईमधून मिळालेले असे एकूण 50 लाखापर्यंत उत्पन्न असेल आणि तुमच्या  व्यवसायासाठी कल्पनात्मक कर योजना लागू होत असेल तर ITR-4 (सीएच) (सुलभ फॉर्म )भरावा. (कल्पनात्मक कर योजना- लहान व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाना त्याच्या उत्पन्नावर कर भरणे सोपे जावे यासाठी ही योजना मदत करते.)

ITR-5 (एफ) – फर्म, व्यक्तीची संघटना किंवा संस्था, मर्यादित भागीदारी असणारे, सहकारी संस्था असे दिवाळखोरांची मालमत्ता, मृत व्यक्तीची मालमत्ता याच्याशी संदर्भ असणाऱ्या करदात्यानी ITR-5 (एफ) भरावा. हा फॉर्म भरणे कठीण असल्याने जाणकार अथवा सल्लागार व्यक्तीकडून सल्ला घेऊन भरणे आवश्यक आहे. 

ITR-6 (एफ) – ज्या कंपनीला कलम 11 अंतर्गत सूट मिळत नाही त्यांनी हा फॉर्म भरावा.यात मुख्यतः सरकारी लिमिटेड कंपनी, खासगी लिमिटेड कंपन्या येतात. धार्मिक मालमत्तेमधून उत्पन्न मिळणाऱ्याना कलम 11 अंतर्गत सूट मिळते, यांनी हा फॉर्म भरण्याची गरज नाही. 

ITR-7 (जी) – खालील कलम अंतर्गत रिटर्न भरणाऱ्या व्यक्ती किंवा कंपनीसाठी ITR-7 (जी) हा फॉर्म भरावा.

कलम 139(4A):  यामध्ये धर्मादाय किंवा धार्मिक हेतूंसाठी मालमत्ता असणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश असतो.

कलम 139(4B):  हा कलम राजकीय पक्ष यांना लागू होतो. राजकीय पक्षाची प्राप्ती कर योग्य मर्यादेपेक्षा अधिक असेल तर कर विवरणपत्र दाखल करणे गरजेचे असते. 

कलम 139(4C):  वैद्यकीय संस्था, वृत्तसंस्था, प्रतिष्ठान, शैक्षणिक संस्था, वैज्ञानिक संशोधनात गुंतलेल्या संस्था यासारख्या संस्था किंवा संघटना या कलमाअंतर्गत येतात. 

कलम 139(4D):  महाविद्यालये आणि विद्यापीठे किंवा इतर संस्था जिथे महसूल आणि तोटा या कायद्याच्या या कलमाखाली घालून दिलेल्या नियमांनुसार नोंदवणे आवश्यक नाही. 

हे ही वाचा : आयकर फॉर्म 10 A आणि फॉर्म 10 AB

  1.   कर श्रेणी तपासा : फॉर्म भरताना आपण उत्पन्नाच्या कुठल्या कर श्रेणीत येतो हे तपासून बघा. हे चुकल्यास आणि उशिरा माहिती काळविल्यास तुम्हाला अतिरिक्त कर, दंड आणि व्याज भरावा लागू शकतो.
  2.   अचूक माहिती: ITR मध्ये लिहून दिलेली माहिती ही अचूक आहे का याची खात्री करून घ्या, यात तुमच्या उत्पन्नाची  माहिती, तुम्ही कुठे गुंतवणूक केलेली असेल तर त्यासंबधी सविस्तर माहिती लिहली आहे का हे तपासून बघा. तुम्हाला कोणत्या प्रकारची वजावट मिळाली असेल तर त्यासंबंधी माहिती देणे आवश्यक आहे.
  3.   फॉर्म 26 AS तपासा: फॉर्म 26 AS तपासा आणि खात्री करून घ्या. यामध्ये TDS, TCS, आणि आपल्या वास्तविक करदायित्वासह अ‍ॅडव्हान्स टॅक्स (अग्रिम कर) देण्याची माहिती असते.
  4.   वैध कपातीसाठीच दावा करताय का ? : तुम्ही पात्र आहात अशाच गोष्टीसाठी कपातीचा दावा करताय का आणि त्या सबंधी सर्व महत्वाची कागदपत्र,पुरावे तुमच्याकडे उपलब्ध आहेत का? हे बघा. तुम्हाी अपात्र असलेल्या गोष्टीसाठी दावा करत नाही ना याची खात्री करून घ्या.
  5.   उत्पन्नाचे स्त्रोत नमूद करा: तुमच्या उत्पन्नाच्या सर्व स्त्रोतांबद्दल  फॉर्ममध्ये सविस्तरपणे अचूक माहिती नमूद करणे गरजेचे आहे. गुंतवणुकीमधून मिळणारे उत्पन्न, नोकरीतील उत्पन्न, तुमचं घर भाडेतत्वावर दिले असल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न इत्यादि.
  6. बँक स्टेटमेंट तपासून बघा : फॉर्ममध्ये दिलेली माहिती अचूक आहे का तसेच दिलेली सर्व माहिती  बँक स्टेटमेंटशी मिळतीजुळती आहे का याची खात्री करून घ्या.
  7. आयकर फॉर्मची मुदत पाळा : आयकर फॉर्म भरल्यानंतर दिलेल्या मुदतीच्या वेळेत आयकर विभागाला फॉर्म सादर करावा लागतो त्यामुळे अंतिम मुदत पाळणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर ITR भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे.  
  8.   कागदपत्र आणि पुरावे जपून ठेवा: फॉर्म भरल्यानंतर काही समस्या उद्भवल्या तर फॉर्मसोबत दिलेली कागदपत्रं आणि इतर प्रूफ जपून ठेवा जेणेकरून भविष्यात काही संदर्भ लागल्यास याचा उपयोग होईल.
  9. तज्ञांचा सल्ला घ्या:  तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील, तर जरूर आयकर वित्त तज्ञांशी संपर्क करून त्यांचा सल्ला घ्या. तसेच कराच्या प्रक्रियेबद्दल साशंकता असेल तर त्यासाठी तुम्ही तक्रार करून पडताळणी करू शकता. 

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता आयकर रिटर्न भरताना या महत्वाच्या गोष्टी तुम्हा सर्वाना नक्कीच उपयुक्त ठरतील .

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutesअनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutesटॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

नव्या कॅलेंडर वर्षातील महत्वाच्या तारखा (सन 2024)

Reading Time: 4 minutes1 जानेवारी 2024 ला नवे कॅलेंडर वर्ष सुरू होईल. सध्या चालू असलेल्या…

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutesआयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.