Reading Time: 2 minutes

Tax Saving Option : पगारदार वर्ग कर बचत करण्यासाठी कलम 80 सीचा (Section 80C) वापर करतो, हे आपल्याला माहिती आहे. पण इतरही मार्गांनी कर वाचवता येतो हे अनेकांना माहिती नाही. आपण कर बचत करण्याचे पर्याय शोधत असाल तर 80 सी सोडून दुसऱ्या मार्गांचा विचार करायला हवा. 

आपण खालील 6 पद्धतीने कर बचत करू शकतो, त्याबद्दलची माहिती समजून घेऊयात. 

 1. अधिक कर बचत मिळवण्यासाठी कलम 80 सी सोडून दुसऱ्या पर्यायांचा विचार करा – 
 • आयकर कायदा 1961 अंतर्गत कलम 80 सी कर कपात मर्यादा प्रत्येक वर्षात 1.5 लाख रुपये करण्यात आली आहे. 
 • आपण कलम 80 सी अंतर्गत येणारी मर्यादा संपली असेल तर इतर गुंतवणूक मार्गांचा (Investment Options) विचार करायला हवा. 
 • आपल्याला 2023-24 या वर्षासाठी आयकर (Income Tax) वाचवायचा असेल तर गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंतच शेवटची तारीख आहे. 
 • आपण गुंतवणूक करताना कर बचत कोणत्या मार्गाने करू शकतो, याचा विचार करूनच गुंतवणूक करायला हवी. 
 1. NPS मधील गुंतवणूक पर्याय – 
 • आपण नॅशनल पेन्शन स्कीममध्ये (National Pension System) गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकता. 
 • कलम 80 सीसीडी अंतर्गत 50,000 रुपयांची कर बचतीचा फायदा आपल्याला होऊ शकतो. या कलमातून मिळणारी कर बचत ही 80 सीमधील मर्यादेपेक्षा अधिकची 50,000 आहे. 

नक्की वाचा : आयटीआर भरताना कलम ८०सीची रु. १.५ लाख मर्यादा संपली तर काय कराल?

 1. आरोग्य विमा योजनेतील गुंतवणूक (Health Policy Investment) – 
 • आपण आरोग्य विमा योजनेचा प्रीमियम स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी भरल्यास कर बचतीचा फायदा मिळू शकतो. 
 • कलम 80 डी अंर्तगत स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी घेतलेल्या आरोग्य विमा योजनेतून 25,000  रुपयांची कर बचत मिळू शकते. 
 • आपण 60 वर्षांखालील आई वडीलांचा आरोग्य विमा प्रीमियम भरल्यास 25,000 रुपयांपर्यंतच्या कर बचतीचा फायदा मिळतो. 
 • जेष्ठ नागरिक असणाऱ्या पालकांसाठी एका आर्थिक वर्षात कलम 80 डी अंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतची कर कपात मिळू शकते.

  4. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी कर कपात – 
 • आपल्याला प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीसाठी कर कपात मिळू शकते, याबद्दलची माहिती असायला हवी. 
 • कलम 80 डी अंतर्गत आपल्याला कर कपातीचा फायदा मिळू शकतो. या अंतर्गत प्रत्येक करदात्याला 5,000 रुपयांची कर बचत मिळू शकते.

  नक्की वाचा :
  कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

5. कलम 80 टीटीएमुळे मिळणारी कर कपात – 

 • कलम 80 टीटीए अंतर्गत करदात्याला कर बचत मिळवता येते. 
 • करदात्याने बँक, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी संस्थेमध्ये उघडलेल्या बचत खात्यातील व्याजातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आर्थिक वर्षात 10,000 पर्यंतची कर बचत मिळते.

  6. कलम 80 जी : मंदिरांना किंवा इतर ठिकाणी दिलेल्या निधीवर कर कपात – 
 • एखाद्या करदात्याने आर्थिक वर्षात कलमी 80 जी अंतर्गत केंद्र सरकारने अधिसूचित केलेल्या निधीमध्ये देणगी दिली असेल, तर कर कपात मिळू शकते. 
 • पण यासाठी दिलेली देणगी ही उत्पन्नाच्या 10% पेक्षा जास्त नसायला हवी. या वजावटीचा फायदा केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मंदिरे, मशिदी आणि चर्चच्या नूतनीकरणासाठी दिलेल्या देणग्यांसाठी मिळू शकतो. 
 • करदात्याने वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थेला, सरकारने मान्यता दिलेल्या विद्यापीठाला किंवा महाविद्यालयाला देणगी दिलेली असल्यास कलम 80 जीजीए अंतर्गत कर कपातीचा फायदा मिळू शकतो. 

निष्कर्ष : 

 • आपण कलम 80 सीचा वापर करून सर्वात आधी कर कपातीचा फायदा मिळवू शकतो. 
 • 80 सीननंतर आपण विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. त्यामाध्यमातून आपल्याला कर कपातीचा लाभ होतो. 

नक्की वाचा – कलम ८०सी अंतर्गत करबचतीचे १० विविध पर्याय

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.

PAN Card: पॅन कार्ड विषयी सर्व काही

Reading Time: 3 minutes पॅन कार्ड हे महत्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे.  अगदी बँक खाते उघडण्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे. तुम्ही करदाते (Tax payer) असाल किंवा नसाल, पण तुमच्याकडे तुमचे स्वतःचे पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे. या लेखात आपण पॅन कार्डबद्दलची विस्तृत माहिती घेणार आहोत.