Reading Time: 4 minutes

गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत असतात. त्यांच्यासाठी शेअर्समधून  मिळणारा लाभांश हा महत्वाचा घटक असतो. काही गुंतवणूकदार लाभांश किती मिळतो यावरून गुंतवणूक करायची का नाही हे ठरवत असतात. शक्यतो लाभांश मिळणाऱ्या स्टॉक्स मध्येच गुंतवणूक करण्याकडे गुंतवणूकदारांचा भर असतो. (Dividend information in Marathi)

लाभांश देणाऱ्या शेअर्समधून जास्त उत्पन्न  मिळत नसले तरी त्यामधील गुंतवणुकीमधून स्थिर उत्पन्नाचा मार्ग तयार होत असतो. ज्या शेअर्समधून नियमितपणे लाभांश मिळतो व शेअर्सचे भाव वाढून भांडवल वृद्धीचा फायदा होत असेल तर त्यांना ‘द ब्ल्यू चिप स्टॉक’ म्हणून ओळखले जाते. (Blue chip Stocks) चांगला लाभांश देणाऱ्या कंपन्या त्यांचा नफा योग्य प्रकारे वापरतात. काही कंपन्या दरवेळी भागधारकांना बक्षीस देण्यापेक्षा नफ्याचा वापर करून कंपनीचा विस्तार वाढवण्याकडे लक्ष देतात त्यामुळे गुंतवणूकदारांना दीर्घकाळ संपत्ती मिळण्यास मदत होते. 

भारतामधील १० सर्वाधिक लाभांश देणारे स्टॉक

  • भारतीय अर्थव्यवस्थेची प्रगती होत असताना शेअर बाजार रोज उंचीचे नवीन आकडे गाठत आहे. 
  • भारतामधील १० कंपन्या अशा आहेत ज्या गुंतवणूक करून लाभांशाची इच्छा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम आहेत. त्यांची आपण माहिती बघूया. 

 

लाभांश देणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी विचारात घेण्यासारखे घटक – 

१. गुणोत्तरे – 

  • गुंतवणूकदारांना चांगला लाभांश दिला जात असेल तर कंपनी नफ्याची रक्कम कमी स्वरूपात गुंतवत आहे असे समजावून घ्यावे. 
  • लाभांश खूप जास्त दिलेला असल्यास कंपनी पुन्हा व्यवसायात गुंतवणुकीसाठी कमी नफा वापरत असते आणि लाभांश जास्त देत असल्याचे समजते. 

२. लाभांशाचे विश्लेषण –

  • लाभांशाचे विश्लेषण करूनच शक्यतो गुंतवणूक करावी.
  • विश्लेषण केल्यानंतर  स्टॉकमध्ये गुंतवणूक करायची का नाही याचा निर्णय घेऊ शकता. सर्वात जास्त लाभांश देणाऱ्या स्टॉकमुळे सुद्धा तुम्हाला भविष्यात तोटा होऊ शकतो. 

३. शेअर्समधून मिळणाऱ्या लाभांशाकडे पाहून गुंतवणूक करू नका  –

  • तुम्हाला एखाद्या शेअर्समधून चांगला लाभांश मिळाला म्हणजे ती चांगली गुंतवणूक आहे असे कधीच होत नाही. कंपनीची कमाई आणि भविष्यातील संधी यांकडे लक्ष ठेवून योग्य वेळी गुंतवणूक करायला हवी.  
  • शेअर्समधून किती रुपये लाभांश मिळतो फक्त याच गोष्टीवर अवलंबुन गुंतवणूक करू नका. 

 

नक्की वाचा : मल्टिबॅगर स्टॉक्स म्हणजे काय?

 

भारतामधील सर्वाधिक लाभ मिळवून देणारे १० स्टॉक्स (Dividend Stocks Marathi)

१. ब्रिटानिया इंडस्ट्रीज (Britannia Industries Limited)- 

  • ब्रिटानिया इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना १९१८ साली करण्यात आली होती. कंपनी प्रामुख्याने विविध खाद्य उत्पादनांच्या निर्मिती आणि विक्री व्यवसायात आहे. 
  • ब्रिटानिया इंडस्ट्रीज कंपनीची गुड डे, टायगर आणि मॅरी गोल्ड ही प्रसिद्ध उत्पादने आहेत. 
  • त्यांच्या उत्पादन पोर्टपोलिओमध्ये बिस्कीट, ब्रेड, केक, चीज, शीतपेये, दूध आणि दह्याचा समावेश होतो. ब्रिटानिया इंडस्ट्रीजने ५६.५ रुपयांचा अंतिम लाभांश २०२२ साली जाहीर केला होता.

२. दालमिया भारत (Dalmia Bharat Group)

  • दालमिया भारत लिमिटेड ही भारतामधील सिमेंट उत्पादक कंपनी आहे. कंपनी मुख्यतः सिमेंट आणि त्याच्याशी संबंधित उत्पादने निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात आहे. 
  • कंपनीच्या उत्पादनांमध्ये ऑर्डीनरी पोर्टलॅंड सिमेंट आणि पोर्टलॅंड सिमेंटचा समावेश होतो. 
  • दालमिया भारत कंपनीने ९ रुपयांचा लाभांश २०२२ साली जाहीर केला होता. 

३. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

  • पंजाब नॅशनल बँक ही भारतामधील एक प्रमुख बँक आहे. 
  • बँकेच्या ठेवी सेवांमध्ये चालू ठेवी, बचत ठेवी, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी, भांडवली लाभ खाते योजना आणि सुवर्ण मुद्रिकरण सेवा दिल्या जातात. 
  • पंजाब नॅशनल बँकेने ०.१६  रुपयांचा लाभांश २०२२ साली जाहीर केला होता. 

४. बाळकृष्ण इंडस्ट्रीज (Balkrishna Industries) 

  • बाळकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड ही टायर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी टायर, ट्यूब आणि टायर फ्लिप बनवण्याचे काम करते. कंपनी प्रामुख्याने ऑफ हायवे टायर्सच्या निर्मितीवर प्रामुख्याने भर देते. 
  • कृषी, औद्योगिक आणि बांधकाम, अर्थमूव्हर आणि बंदर, खाणकाम, वनीकरण, लॉन आणि गार्डन आणि सर्व भूप्रदेश वाहनांसाठी टायर तयारकेले जातात. 
  • बाळकृष्ण इंडस्ट्रीज कंपनीने ४  रुपयांचा लाभांश २०२२ साली जाहीर केला होता. 

५. सुप्रीम इंडस्ट्रीज (Supreme Industries Ltd)

  • सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीची स्थापना १९४२ मध्ये झाली आहे. ही कंपनी प्लास्टिक उत्पादने बनवणारी कंपनी आहे. 
  • सुप्रीम इंडस्ट्रीज मधील औद्योगिक उत्पादन विभाग औद्योगिक घटक, सामग्री हाताळणी प्रणाली, पॅलेट्स-रोतो मोल्डेड क्रेट, पॅलेट्स अंडी कचरापेटी आणि संमिश्र लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस सिलिंडर सेवा पुरवतात. 
  • सुप्रीम इंडस्ट्रीजने १८ रुपयांचा अंतिम लाभांश २०२२ साली  जाहीर केला आहे. 

 

नक्की वाचा  : १२ वर्षांपूर्वी ‘या’ स्टॉकमध्ये १ लाख रुपये गुंतवले असते तर आज तुम्ही तब्बल पावणेचार कोटीचे मालक असता 

 

 

६. डॉ. लाल पॅथलॅब्स (Dr LalPathlabs)

  • डॉ लाल पॅथलॅब्स लिमिटेड ही कंपनी उपचार आणि संबंधित आरोग्य चाचण्या आणि सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. 
  • कंपनी बायोकेमिस्ट्री, हिस्ट्रोपॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजिच्या विविध शाखांच्या प्रयोगशाळा चालवते. 
  • सुप्रीम इंडस्ट्रीज कंपनीने ६ रुपयांचा लाभांश २०२२ साली जाहीर केला आहे. 

७. पॉलिकॅब इंडिया (Polycab India)

  • पॉलिकॅब इंडिया लिमिटेड हे पॉलिकॅब या ब्रॅण्डच्या अंतर्गत वायर, केबल्स आणि फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्सच्या निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. कंपनीच्या काम वायर्स आणि केबल्स, फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स आणि इतर अशा तीन विभागातून काम चालते. 
  • त्यांचा एफइएमजी विभागातील ग्राहक टिकावू व्यवसाय आहे. 
  • पॉलिकॅब इंडिया कंपनीने ३.४७ रुपयांचा लाभांश २०२२ साली  जाहीर केला आहे. 

८. युनिअन बँक ऑफ इंडिया (Union Bank Of India)

  • युनिअन बँक ऑफ इंडिया ही भारतातील आघाडीची बँक आहे. कंपनी वैयक्तिक, कॉर्पोरेट कर्ज आणि आंतराराष्ट्रीय अशा तीन श्रेणींमध्ये उत्पादने ग्राहकांना देते. 
  • वैयक्तिक सेवांमध्ये खाती आणि ठेवी, आर्थिक योजना आणि लॉकर्स सेवा पुरवल्या जातात. 
  • युनिअन बँक ऑफ इंडियाने ०.४८ रुपयांचा  लाभांश २०२२ साली  जाहीर केला होता. 

९. इंडियन हॉटेल्स कंपनी (Indian Hotels Company Ltd)

  • इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ही टाटा समूहातील महत्वाची कंपनी आहे. IHC कंपनी निवासस्थाने, रेस्टोरंटस आणि मोबाईल फूड सर्व्हिस मध्ये काम करते. 
  • प्रामुख्याने ताज, विवांता, दगेटवे, जिंगर आणि एक्स्प्रेशन्स सारख्या अनेक ब्रँड अंतर्गत हॉटेल्स आणि   रिसॉर्टची मालकी त्यांच्याकडे आहे. हे रेस्टोरंट खाद्यपादार्थ आणि पेय व्यवसाय देखील चालवतात. त्यांच्याकडे २३२ हॉटेल्सचा पोर्टफोलिओ आहे. 
  • इंडियन हॉटेल्स कंपनीने ०.१० रुपयांचा लाभांश २०२२ साली जाहीर केला होता. 

१०. हॅपीएस्ट माईंड टेक्नॉलॉजी  (Happiest Minds Technologies) 

  • हॅप्पीएस्ट माईंड टेक्नॉलॉजी लिमिटेड ही भारतातील डिजिटल ट्रान्सफॉर्मशन इन्फॉर्मेशन टेकनॉलॉजी आधारित सल्ल्लागार आणि सेवा कंपनी आहे. 
  • कंपनीच्या विभागांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी सर्व्हिसेस, डिजिटल बिझनेस सोल्युशन्स आणि प्रोडक्ट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचा समावेश आहे. 
  • हॅप्पीएस्ट माईंड टेक्नॉलॉजी कंपनीने ०.९४ रुपयांचा लाभांश २०२२ साली जाहीर केला होता. 

 

महत्वाचे ! 

  • वरती नमूद करण्यात आलेले शेअर्स जरी चांगला लाभांश देत असले तरी एका कारणावरून त्याची निवड करू नये
  • काही कंपन्यांना तोटा जरी होत असला तरी त्या लाभांश देत असतात.
  • नफ्याचा इतिहास, कर्जाची परिस्थिती आणि व्यवस्थापन गुणवत्ता इ सारख्या अनेक घटकांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…