Reading Time: 3 minutes

कंपनीने आपल्या करोत्तर नफ्यातून (Profit after taxes)  समभागधारकांना पैशाच्या स्वरूपात दिलेली भेट म्हणजे ‘लाभांश’ (Dividend) होय. कंपनी झालेला संपूर्ण फायदा वाटून टाकत नाही तर त्यातील काही भाग भागधारकांना देते. शिल्लक रक्कम भविष्यातील विस्तार योजना किंवा अधिक व्याजदराने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरून आपली नफाक्षमता वाढवते.

 • कंपनी कायद्याप्रमाणे लाभांश दिलाच पाहिजे आणि तो कंपनीच्या चालू वर्षाच्या फायद्यातूनच द्यावा असे बंधन नाही. शिल्लक असलेल्या फायद्यातूनही त्याचे वाटप करता येऊ शकते.
 • सर्वसाधारणपणे वर्ष संपल्यावर संचालक मंडळ एकूण आर्थिक स्थितीचा आढावा आणि भाविष्यकालीन योजना विचारात घेऊन लाभांश देण्याचा निर्णय घेते. यासाठी पात्र धारकांची यादी करण्यासाठी निश्चित अशी एक तारीख (Record date) ठरवण्यात येते. त्या दिवशी जे भागधारक असतील त्यांना लाभांश दिला जातो.
 • लाभांश देण्याचा या निर्णयाला सर्वसाधारण सभेत (Annual general meeting) मंजुरी मिळवावी लागते. ती मिळाल्यावर पात्र भागधारकांना त्याचे वाटप करण्यात येते.
 • लाभांश मिळाल्याने सर्व भागधारक आनंदित होतात. त्यांचा कंपनीवरील विश्वास वाढतो जर सातत्याने वाढीव लाभांश मिळाला तर त्यांची गुंतवणूक अप्रत्यक्षपणे वसूल होते.
 • अनेक वेळा त्यांच्या गुंतवणुकीच्या मानाने कितीतरी अधिक प्रमाणात लाभांश मिळाल्याने त्या समभागांची बाजारातील किंमत वाढते. त्यामुळे असे गुंतवणूकदार हे समभाग विकण्याचा विचार करीत नाहीत त्यामुळे बाजारातील खरेदी/ विक्रीयोग्य (Floating stocks) भागांची संख्या कमी होते. त्यामुळे भाव आणखी वाढण्यात मदत होते.
 • आर्थिक वर्षाचे हिशोब पूर्ण झाले की लाभांश देण्याची प्रथा असली तरी अनेक कंपन्या वर्ष पूर्ण होण्याच्या आतच आर्थिक स्थितीचा अंदाज घेऊन लाभांश जाहीर करतात. त्यास अंतरिम लाभांश (Interim dividend) असे म्हटले जाते.
 • सरकारी हिस्सेदारी मोठया प्रमाणात असलेल्या कंपन्या उदा. कोल इंडिया, इंडियन ऑइल, स्टेट बँक या अंतरिम लाभांश जाहीर करतात. यासाठी भागधारकांच्या संमतीची गरज नसते. वर्ष पूर्ण झाले की अंतिम लाभांश (Final dividend) जाहीर करून त्यातून अंतरिम लाभांश वजा केला जातो.  जर काही बाकी लाभांश असेल तर दिला जातो आणि त्यास भागधारकांची मंजुरी घेतली जाते.
 • आय टी, फायनान्स क्षेत्रातील काही मोजक्या कंपन्या उदा. टीसीएस, क्रिसिल, केअर रेटिंग या दर तिमाहीस अंतिम लाभांश देतात. यामुळे भागधारकांना सतत काहीतरी रक्कम मिळत राहते.
 • ज्यांनी दीर्घकालीन गुंतवणुकीच्या हेतूने समभाग घेतले आहेत त्यांना वर्षभर सतत काहीतरी रक्कम मिळत राहाते. ज्यांनी फक्त खरेदी / विक्री करण्याच्या हेतूने समभाग विकत घेतले आहेत त्यांना हा जास्तीचा लाभ मिळतो. त्यांचा मुख्य हेतू फक्त भावातील फरक मिळवणे असल्याने लाभांशामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही.
 • मुलभूत आणि तांत्रिक विश्लेषण (Fundamental & Technical analysis) करणाऱ्याच्या दृष्टीने लाभांशाचे महत्त्व आहे. कंपनीस झालेल्या समाधानकारक फायद्यावर कंपनीचा विकास अवलंबून असतो. कंपनी लाभांश देते म्हणजे चांगली आहे अशी सर्वांची भावना असते. त्यातून एक सकारात्मक संदेश बाजारास मिळतो.
 • लाभांश उताऱ्याच्या टक्केवारीचे गुणोत्तर (Dividend yield ratio) प्रति समभाग प्राप्त लाभांशास त्याच्या बाजारभावाने भागून शंभरने गुणले की मिळते. ही टक्केवारी बाजारभावाच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजे जेवढा बाजारभाव अधिक तेवढी लाभांश टक्केवारी कमी आणि जेवढा बाजारभाव कमी तेवढी ही टक्केवारी अधिक असते.
 • प्रतिसमभाग मिळालेला लाभांशास प्रतिशेअर मिळकतीने भागून शंभराने गुणले असता लाभांश वाटप टक्केवारी (Dividend payout ratio) समजते. यातून उरलेली रक्कम कंपनीच्या भवितव्यासाठी वापरली जाते.
 • ज्यांची  लाभांश वाटप टक्केवारी अधिक आहे त्यांनी भविष्याचा फारसा विचार केला नाही असे समजले जाते. मिळत असलेल्या लाभांशातून खरेदी किंमत भरून निघण्यास किती वर्षे (Dividend payback period) लागतील ते काढता येते. लाभांश छत्र गुणोत्तर (Dividend coverage ratio) याचा वापर करून  तांत्रिक विश्लेषक कंपनीच्या भवितव्याचा अंदाज बांधतात. हे गुणोत्तर व्यवसायापासून उपलब्ध उत्पन्नाची रोख प्रवाहता (Cash flow from operations) किंवा उपलब्ध सर्व उत्पन्नाची रोख प्रवाहता (Free cash flow) पाहून काढता येते.
 • या गुणोत्तराच्या आलेल्या मूल्यावरून भविष्याचा वेध घेतला जातो. या दोन्ही पद्धतीने मिळवलेल्या निष्कर्षांचे काही फायदे तोटे आहेत. हे गुणोत्तर जेवढे अधिक तेवढी कंपनी अधिक सुरक्षित असे समजले जाते. मागील उपलब्ध माहितीवरून भविष्याचा अंदाज बांधणे सुलभ होते.
 • याशिवाय अनेक कंपन्या त्यांच्या स्थापनेच्या रजत(२५), सुवर्ण(५०), हिरक(६०), अमृत(७५), शतक(१००) वर्षानिमित्त अथवा काही मालमत्ता विक्रीतून मोठ्या प्रमाणात उपलब्ध  असलेल्या निधीतून घसघशीत रक्कम विशेष लाभांश म्हणून आपल्या भागधारकांना देतात. हा एकरकमी मिळालेला अतिरीक्त लाभ असून तो फक्त त्याच वर्षापुरता /कारणापुरता मर्यादित असतो.

– उदय पिंगळे

बोनस शेअर्स आणि करदेयताशेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks) ,

शेअर बाजार : भारतीय गुंतवणूकदारांचे पुढचे पाऊल !शेअर्सची साधी बदलती सरासरी

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.