Arthasakshar marathi info about dividend Tax or buyback shares
Reading Time: 2 minutes

करविचार: लाभांश की शेअर्सची पुनर्खरेदी

(Tax –  Dividend or Buyback Shares)

लाभांशावरील कर (Tax on Dividend) –

 • ३१ मार्च २०२० पर्यत लाभांश देताना त्यावर करकपात होत असल्याने बहुतेक भागधारकांच्या हाती येणारा लाभांश पूर्णपणे करमुक्त होता. 
 • अनेक निवृत्त लोकांना भरघोस मिळणारा लाभांश हा आधार होता. 
 • अनेक म्युच्युअल फंड हाऊसनी नियमित लाभांश देत असलेल्या योजना जाहीर करून आपल्याकडे गुंतवणूकदारांना आकर्षीत करून घेतले. 
 • मोठ्या प्रमाणात भांडवली हिस्सा असणाऱ्या प्रवर्तकांच्या दृष्टीने लाभांश ही पर्वणीच होती. 
 • एका आर्थिक वर्षात ₹ १० लाख हून अधिक लाभांश असल्यास त्यावर १०% दराने करआकारणी होत होती.
 • चालू अर्थसंकल्पात लाभांशाची गणना करपात्र उत्पन्नात केली गेल्याने हे गणितच बिघडून गेले आहे. 

लाभांश (Dividend) म्हणजे काय?

 • हे वर्ष १ एप्रिल २०२० रोजी सुरू झाल्याने तेव्हापासून मिळालेला लाभांश उत्पन्न म्हणून करपात्र असून, जर तो येत्या वर्षभरात ५ हजाराहून अधिक असेल तर त्यास मुळातून करकपातीच्या तरतुदी लागू होऊन त्यावर १०% कर कापला जाणार आहे. 
 • अलीकडे जाहीर केलेल्या सुधारणांमध्ये यात २५% तात्पुरती सूट दिल्याने, सध्या ही करकपात ७.५% असेल. 
 • ही करकपात थांबवण्यासाठीची १५ H किंवा G फॉर्म भरण्याची कोणतीही तरतूद नाही. यामुळे अनेक करपात्र उत्पन्न नसलेल्या व्यक्तींना केवळ मुळातून कापलेला कर परत मिळवण्यासाठी आयकर विवरणपत्र भरावे लागणार आहे, तसेच कापलेल्या कराचा परतावा मिळण्याची दीर्घकाळ वाट पाहावी लागणार आहे. 
 • लाभांशासंबंधित या सुलभ तरतुदी आता वगळल्याने मिळालेली रक्कम उत्पन्नात मिळवून करदाता त्यांनी निवडलेल्या करपद्धतीतील ज्या करपात्रतेच्या टप्यात असेल त्यानुसार कर आकारणी होईल. 
 • ती किमान शून्य ते कमाल ४२.७४% एवढी उच्च उत्पन्न धारकांना असेल. तर कंपनी करदात्यांच्या बाबतीत हाच दर किमान २५.१७% पासून सर्वाधिक ३४.९४% असेल.

शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)

शेअर्सच्या पुनर्खरेदी (buybacks Shares) –

 • आयकर कायद्यातील कलम ११५ Q/A नुसार पुनर्खरेदी करताना पूर्वीच्या लाभांश वितरण कराप्रमाणे कंपनीस करकपात करूनच शेअरधारकास पैसे द्यायचे आहेत. 
 • येथे आकारणी करण्यात येणारा कराचा दर हा २३.२९६% असेल तो मुळातून पूर्ण कापला गेल्याने घारकाच्या हातात मिळणारी रक्कम आयकर कायद्यातील कलम १०(३४) पुर्णपणे करमुक्त असणार आहे. 
 • याप्रमाणे लाभांशावरील अधिकतम कर ३४.९४%  ते ४२. ७४% असल्याचे तो धारकास भरावा लागेल या तुलनेत पुनर्खरेदीवरील कर २३.२९६% असल्याने व तो कंपनी मुळातूनच कापत असल्याने धारकास करमुक्त उत्पन्न मिळेल. 
 • कायद्यात असलेल्या या तरतुदींचा विचार करून आता अधिकाधिक चांगल्या कंपन्या यापुढे लाभांशात कपात करून शेअर पुनर्खरेदीचा पर्याय निवडताना दिसतील.
 • गेले अनेक वर्षे भांडवली नफा करमुक्त ठरवून तो दोन वर्षांपूर्वी  पुन्हा करपात्र करण्यात आला आता कंपन्यांचा लाभांश वितरण कर रद्द करून तो शेअरहोल्डर्सनी भरावा असा बदल केला आहे. 
 • यातून कोणतेही ठाम करधोरण प्रतिबिंबित न होता ६ वर्ष होऊनही सरकार अजून चाचपडत असल्याचे दिसून येते. 

कररचनेत सुलभता आणणारा प्रत्यक्ष कर कायदा येण्यास अजून बरीच वाट पाहावी लागेल त्याची सुरुवात म्हणून सुचवलेली सध्या ऐच्छिक असलेली नवी करप्रणाली या गोंधळात भर घालणारी आहे.

उदय पिंगळे

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

TDS: टीडीएस म्हणजे नक्की काय?

Reading Time: 2 minutes अनेक खर्च एखाद्या देशाच्या सरकारला देशासाठी करायचे असतात. त्यासाठी सरकारच्या तिजोरीत काही पैसे प्रत्यक्ष जमा व्हावे लागतात. त्यासाठी सरकार नागरिकांकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर (Direct-Indirect Taxes) गोळा करत असते. सरकारसाठी/ सरकारच्या अर्थ खात्यासाठी हे कर गोळा करण्याचे काम आयकर खाते (Income Tax Department) करते. टीडीएस (TDS) ही आयकर खात्याने यासाठीच सुरू केलेली एक प्रणाली आहे. हिच्यामुळे सरकारच्या तिजोरीत वेळच्या वेळी कर जमा होतो.  या प्रणालीमुळे प्रत्यक्ष कर गोळा करणे सरकारला सोपे जाते.

आयकर खात्याच्या मदतीने आयटीआर फॉर्म भरणे होईल सुलभ

Reading Time: 2 minutes कर भरणाऱ्याला जो आयटीआर फॉर्म लागू होतो त्याची निवड करणे हे फॉर्म…

आयकर विभागाची नोटीस आली आहे? घाबरू नका, आधी हे वाचा

Reading Time: 4 minutes टॅक्स, टॅक्स रिटर्न हे शब्द जरी ऐकले तरी करदाता काहीसा नाराज होतो. त्यात जर का आयकर विभागाकडून कुठली नोटीस आली तर ही नाराजी भीतीमध्ये बदलते. आयकर विभागाकडून आलेल्या कोणत्याही नोटीसमुळे अथवा पत्रामुळे करदाते घाबरून जातात. तथापि, कलम १४३(१) सूचना म्हणजे काळजी करण्याची गरज नाही. या लेखात आम्ही कलम १४३(१) च्या अंतर्गत पाठविलेल्या सूचनांबद्दल तपशीलवार चर्चा करणार आहोत जेणेकरून करदात्यांना याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल.

कलम ८० अंतर्गत करबचतीचे विविध पर्याय

Reading Time: 3 minutes आयकर कायदा १९६१, नुसार कलम ८० मध्ये करबचतीचे विविध पर्याय नमूद करण्यात आले आहेत. मागील भागात कलम ८० सी अंतर्गत नमूदकेलेल्या विविध पर्यायांची माहिती घेतली. या भागात उर्वरित सबसेक्शन अंतर्गत नमूद करण्यात आलेल्या करबचतीचे विविध पर्यायांची माहिती घेऊया.