Reading Time: 3 minutes

आजकाल कर्ज घेणे ही एक सामान्य गोष्ट झालेली आहे. कर्ज घेताना मिळणाऱ्या सवलती आणि आर्थिक फायद्यामुळे कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मात्र कर्ज घेताना बँकेकडून बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. यामध्ये क्रेडिट स्कोअर प्रामुख्याने तपासला जातो. वैयक्तिक कर्ज घेताना तीन अंकी संख्या आपली क्रेडिट पात्रता सांगते. यावरून समजते की कर्जदार किंवा ग्राहक कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे हफ्ते भरण्यास पात्र आहे किंवा नाही.

 उच्च म्हणजेच चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास कर्ज तात्काळ मिळते आणि चांगल्या सवलती बँकेकडून कर्जदाराला दिल्या जातात. एका चांगल्या क्रेडिट स्कोअरमुळे कोणत्याही अडचणींशिवाय कर्ज मिळते. काही काळानंतर बँकेकडून कर्जदारांना अधिक चांगल्या आणि सोयीस्कर सेवा दिल्या जातात. काही बँकेकडून किंवा संस्थांकडून क्रेडिट स्कोअर चांगला नसला तरी देखील कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. 

 

 

 कमी क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर नसणे या दोन गोष्टीं शिवाय कर्ज घेणे शक्य आहे. यासाठी खाली नमूद केलेल्या काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. 

कमी क्रेडिट स्कोअर असणे हे आपली कर्जाचे हप्ते भरण्याची क्षमता कमी आहे असे सांगत असते. अशावेळी आपण बँकेत किंवा इतर संस्थांमध्ये कर्ज घेण्यासाठी मागणी केल्यानंतर कर्जदाराच्या प्रोफाईलला धोकादायक कर्जदाराचा धोकादायक यादीत समावेश केला जातो. 

कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर कमी असूनही कर्ज मिळत असले तरी देखील व्याजाचा दर हा जास्त आकारण्यात येतो. क्रेडिट स्कोअर शून्य असल्यास आपण कर्ज किंवा क्रेडिट कार्ड सारख्या गोष्टींचा लाभ घेतलेला नाही असे समजते. कर्जदाराकडे धोकादायक किंवा कर्ज न फेडू शकणारे कर्जदार म्हणून देखील बघितले जाते. तरीदेखील क्रेडिट स्कोअरशिवाय झटपट कर्ज मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यांचीच माहिती आपण खाली पाहणार आहोत. 

 

 

१. क्रेडिट रिपोर्टवर कोणताही इतिहास उपलब्ध नसणे – 

 • NA आणि NH म्हणजेच कोणताही क्रेडिट इतिहास उपलब्ध नाही. तुम्ही जर  कोणतेही कर्ज घेतले नसेल तर तुमच्या क्रेडिट रिपोर्टवर तुम्हाला या दोन गोष्टी हमखास दिसून येतात. 
 • मागील ३ वर्षात कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नाही याबद्दलची माहिती यात दिलेली असते. या दोन्ही बाबींकडे आपल्याला विशेष लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी आपण कमी रक्कमेचे कर्ज घेऊ शकतो. 

 

२. विना तारण कर्ज –

 • सामान्यतः वैयक्तिक कर्जे ही असुरक्षित असतात. ज्या कर्जासाठी कोणतीही गोष्ट आपल्याला गहाण म्हणजेच तारण स्वरूपात ठेवावी लागत नाही. 
 • तरी देखील आपले क्रेडिट प्रोफाईल हे कर्ज घेताना चांगले असावे लागते. कर्जदाराच्या क्रेडिट इतिहास व्यवस्थित असल्यास आपल्याला विना तारण कर्ज लवकरात लवकर मिळून जाते. 
 • जर समाजा आपण कर्ज घेण्यासाठी नवीन कर्जदार असलो तरी देखील विना तारण कर्ज लवकर मिळून जाते. फक्त काही संस्थांच्या किंवा बँकांच्या नियमांनुसार अटींचे पालन करावे लागते. 

 

३. कर्ज घेण्यासाठी जामीनदार किंवा हमीदार मिळवणे –

 • एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल किंवा त्याच्या उत्पन्नाचा स्रोत स्थिर असल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो. कर्ज घेताना अशा व्यक्ती जर आपल्या हमीदार किंवा जामीनदार झाल्यास आपल्याला सहज कर्ज घेता येते. 
 • हमीदाराने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. सगळ्या अटी-शर्थीचे पालन योग्यरीत्या झाल्यानंतर आपल्याला हमीदरामुळे किंवा जामीनदारामुळे कर्ज मिळून जाते. 

नक्की वाचा : कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

 

 

४. कमी कर्ज घेणे – 

 • समजा आपला कोणत्याही प्रकारचा क्रेडिट इतिहास नसेल किंवा पूर्वी कर्ज घेतलेले नसेल तर इतर पर्यायांचा विचार करतो येतो. नवीन कर्ज घेताना सामान्यतः कर्जदाराला जास्त व्याजदर मिळू शकतो.
 • जर आपण कर्ज घेताना कमी कर्जासाठी मागणी केली तर आपल्याला त्वरित कर्ज मिळून जाते. हे कर्ज घेताना  आपल्याला कोणत्याही प्रकारच्या क्रेडिट इतिहासाची किंवा जास्तीच्या कागदपत्रांची गरज पडत नाही. 
 • अशाप्रकारे आपल्या खिशाला परवडणारा व्याजदर कर्जावर आकारला जातो. हप्ते भरताना मात्र आपल्याला सातत्य ठेवणे गरजेचे असते. हप्ते भरण्यास उशीर किंवा टाळाटाळ केल्यास पुढच्या वेळेस कर्ज घेताना नकारात्मक परिणाम जाणवू शकतो. 

५. कर्ज घेत असताना स्थिर उत्पन्न स्रोतांचा पुरावा देणे – 

 • वैयक्तिक कर्ज घेताना नेहमीच कर्जदाराच्या उत्पन्नाची दखल घेतली जाते. आपले पगाराचे उत्पन्न किंवा व्यावसायिक उत्पन्न यांसारख्या आर्थिक गोष्टींचा विचार केला जातो. 
 • कर्जदाराचे उत्पन्न स्थिर असल्यास किंवा उत्पन्नाचे अधिक स्रोत असल्यास कमी क्रेडिट स्कोअर असताना झटपट वैयक्तिक कर्ज मिळवू शकते.  

नक्की वाचा : जामीनदार राहण्यापूर्वी विचारात घ्या या ७ गोष्टी 

 

 

निष्कर्ष 

 • कर्जदाराकडे मागील सहा महिन्यांचा क्रेडिट स्कोअर किंवा क्रेडिट इतिहास नसला तरी वैयक्तिक कर्ज घेणे शक्य आहे. 
 • मोबाईल ॲप्स किंवा वेबसाईट्सवरून क्रेडिट स्कोअरशिवाय कर्ज घेता येते. यातॲप्सची निवड करताना काळजी घ्यावी लागते. याव्यतिरिक्त तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…