Reading Time: 2 minutes

ग्राहकांनी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले असेल किंवा घ्यायचे असेल तर त्याची परतफेड करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन A किंवा प्लॅन  B  तयार हवा असतो. कर्ज घेतल्यानंतर केवळ त्याची परतफेड करणे गरजेचे नसून वेळेत परतफेड होणे ही महत्वाचे आहे ! असे न केल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. 

आजच्या लेखामध्ये आपण कर्ज वेळेवर भरला नाही तर लागणाऱ्या दंडात्मक शुल्क या बद्दल माहिती घेऊया. 

 

 

(Penal interest & Penal charges information in marathi)

 

 

हे वाचा  : गृहकर्ज घेताना तुम्हाला माहितच असावीत अशी १० कलमे

सद्यपरिस्थिती आणि RBI ने केलेले नियमातील बदल : (Change in RBI policy for Penal Interest)

  • कर्जाचा हप्ता भरायला उशीर झाला तर कर्ज देणारी संस्था कर्ज घेणाऱ्या वर पेनल इंटरेस्ट आकारत होती. प्रत्येक वित्तीय संस्थेचे याबद्दलचे नियम आणि अटी व्यवहार करताना अग्रीमेन्ट मध्ये नमूद असायचे. 
  • मात्र आता RBI ने कर्जाचे हप्ते द्यायला उशीर झाला अथवा हप्ते भरले नाही तर पेनल इंटरेस्ट रद्द करून पेनल चार्जेस लागतील अश्या नवीन नियमाची तरतूद केली आहे.
  • काही उदाहरणामध्ये पेनल इंटरेस्ट लागू होताना कर्जदाराला जास्त रक्कम दंड स्वरूपात भरावी लागत होती,त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी आणि वाद याच्यात वाढ होत होती.  
  • RBI ने याची दाखल घेत पेनल इंटरेस्ट ऐवजी पेनल चार्जेस आकारण्यात येतील असे स्पष्ट केले आहे.
  • यात वाजवी रक्कम आणि अधिक पारदर्शकता असल्याने ग्राहकाला ही कार्यपद्धती सोयीस्कर असेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

 

हा बदल का गरजेचा होता ?

  • अनेक वित्तीय संस्थांनी कर्जदारांना जास्त प्रमाणात पेनल इंटरेस्ट आकारला होता,त्यामुळे अशा कर्जदारांच्या अनेक केसेस न्यायालयात प्रलंबित आहे.
  • सामान्यतः कर्ज बाकी रकमेवर वार्षिक 2 % पेनल इंटरेस्ट चार्ज आकारण्यात येते.मात्र जेव्हा शुल्क आकारणी टक्केवारी मध्ये होते तेव्हा हे शुल्क जास्त होते. 
  • यावरून पेनल इंटरेस्ट आकारणीच्या नियमांमधील गुंतागुंत दिसून येते. 

 

 

हे वाचा :    Home loan – गृहकर्ज घेणं झाले महाग, कर्जदरांमध्ये झपाट्याने वाढ – तुम्ही काय कराल ?

 

 

नियमांचा ग्राहकांना होणार फायदा – (how helpful to the customer)

  • RBI च्या या निर्णयाचा कर्जदाराला नक्कीच फायदा होणार आहे असे अनेक अर्थ तज्ज्ञांचे मत आहे. 
  • सर्व वित्तीय संस्थामध्ये समान नियम लागू होण्यामुळे,संस्था आणि ग्राहक यांच्यात पारदर्शकता आणि विश्वास निर्माण होऊन ग्राहकांचे हित साधले जाईल.
  • कर्जाची प्रक्रिया सुरक्षित व्हावी आणि क्लीष्ट न होता सोप्या पद्धतीने कर्ज दारापर्यंत सर्व गोष्टी वितरित  होणे गरजेचे असते .
  • ग्राहक आणि वित्तीय संस्था या दोघांमधे परस्पर सामंजस्य असणे व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक आहे. 
  • कर्ज न भरणे किंवा वेळेवर न भरणे याचा अर्थ ग्राहकाच्या वागणुकीबद्दल संशय न घेता खऱ्या अर्थाने काही आर्थिक अडचण किंवा व्यापारामधील तोटा हे कारण असू शकते,याचा विचार होणे महत्वाचे आहे.  
  • यामध्ये ग्राहक हिताचा विचार केल्यामुळे RBI ने घेतलेल्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.  

 

पेनल चार्जेस आकारणी : (Recovery of Penal charges)

  • पेनल चार्जेस कर्जाच्या मूळ रकमेवर न लावता कर्जदाराकडून स्वतंत्रपणे आकारण्यात येतील. यामुळे कर्जदारावरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होणार आहे.
  • RBI च्या नियमांमध्ये अद्याप किती प्रमाणात आणि कुठल्या परिस्थितीत पेनल चार्जेस ग्राहकांना भरावे लागतील याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले नाही. 
  • पेनल चार्जेस च्या नियमामुळे ग्राहकांमध्ये कर्जाची परतफेड करण्याबाबत शिस्त लागेल, भिन्न आकारसरणी जाऊन कामामध्ये सुसूत्रता येईल. 
  • ग्राहकांमध्ये कर्ज प्रक्रिया संदर्भात संभ्रम न राहता संवाद प्रस्थापित होईल. 

 

 

निष्कर्ष: 

  • कर्जदार व्यक्तींना कर्ज वेळेत न भरल्यामुळे दुहेरी नुकसान सहन करावे लागते. 
  • कर्ज वेळेत न भरल्यामुळे दंड म्हणून शुल्क भरावे लागते आणि महत्वाचे म्हणजे क्रेडिट स्कोर वर याचा नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे पर्यायाने पुढच्या वेळी कर्ज घेताना कर्जदाराच्या या गोष्टी गणल्या  जातात. 
  • मात्र RBI चा स्वागतार्थ निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…