रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना ३ महिन्यांचा दिलासा : जाणून घ्या वस्तुस्थिती

Reading Time: 2 minutes

रिझर्व्ह बँकेने आज कर्जदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. 

कोरोना व्हायरस बाबत ‘आरबीआय’ने कर्जदारांसाठी नेमकी काय घोषणा केली आहे ?

 • कर्जदारांना कर्जाचा मासिक हफ्ता / कर्जावरील व्याज फेडीसाठी तीन महिने अतिरिक्त कालावधी देण्याचे आवाहन ‘RBI‘ ने बँकांना केले आहे. कर्ज प्रकारात मध्ये “क्रेडीट कार्ड”च्या बाकी रकमांचाही समावेश होईल असे आरबीआय ने स्पष्ट केले आहे.  
 • यासाठी कर्जदारांचे तीन महिन्यांचे हप्ते, त्यांचा परतफेडीचा नवा कालावधी तसेच त्यांची मुदत याची फेररचना बँकांना करावी लागेल, असे ‘आरबीआय’ने स्पष्ट केले आहे. या तीन महिन्यांच्या स्थगन कालावधीत बँकांनी कर्जदारांच्या खात्यातून परस्पर कर्जाचा मासिक हप्ता (EMI) कापू नये, असेही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेचे महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याचे परिणाम

यासाठीचा कालावधी कोणता आहे ?

 • १ मार्च २०२० ते ३१ मे २०२०

कर्ज माफी आणि अतिरिक्त कालावधी यात काय फरक आहे?

 • अतिरिक्त कालावधी म्हणजे जरी तुम्ही कर्जाचा मासिक हफ्ता / कर्जावरील व्याज बँकेला दिले नाही तरी या विशिष्ट कालावधीत बँक कुठलिही पेनल्टी रक्कम आकारणार नाही, वसुलीसाठी मागे लागणार नाही आणि तुम्हाला “डीफोल्टर” सुद्धा ठरवणार नाही. 
 • कर्जावर व्याज मात्र आकारले जाणार आहे. 
 • व्याजाला किंवा मुद्द्ल रकमेच्या परतफेडीला कुठलीही माफी दिलेली नाही. 
 • मुदत कर्जाचा एकूण कालावधी ३ महिन्यांनी वाढवला जाऊ शकतो. उदा : तुमचे कर्ज १५ वर्ष म्हणजे १८० महिन्यांत मुदतीचे असेल तर आता परतफेडीचा कालावधी १८३ महिने होईल.

“करोना” –  यातील काही आपण विसरलोय का?

सदर फायदा फक्त सरकारी बँकांच्या ग्राहकांनाच लागू आहे का ?

 • नाही. यात सर्वप्रकारच्या वाणिज्य बँका म्हणजे सरकारी व खाजगी बँका, लघु वित्त बँका, सहकारी बँका, बिगर बँकिंग वित्त संस्था, ग्रामीण बँका यांना ही सुविधा कर्जदारांना उपलब्ध करता येईल.

बँकेला यासाठी अर्ज करावा लागेल का ?

 • नाही. बँका त्यांच्या कर्ज धोरणात बदल करतील आणि सर्व कर्जदारांना ते लागू करतील. 

सर्व बँकांना ‘RBI‘ केलेलं आवाहन लागू आहे का ?

 • सध्याच्या परिस्थितीत सर्वच बँका हे आवाहन प्रत्यक्षात लागू करतील 

क्रेडीट स्कोअरवर इएमआय उशिरा भरल्यास नकारात्मक परिणाम होईल का?

 • नाही. आरबीआय ने प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात तसे स्पष्ट केले आहे. 

माझ्या बँक खात्यात पैसे असतील तर इएमआय चे पैसे खात्यातून वजा होतील का?

 • हो. बँक नेहेमीच्या तारखेला इएमआय तुमच्या खात्यातून गोळा करायचा प्रयत्न करतील. खात्यात पैसे असतील तर कर्जाचा इएमआय भरला जाईल

क्रेडीट कार्ड वरील बाकी रकमेवर ३ महिन्यांसाठी व्याज आकारले जाणार आहे का ?

 • होय. बाकी रकमेवर व्याज आकारले जाईल. क्रेडीट कार्डच्या अंतिम तारखेपर्यंत संपूर्ण रक्कम भरली नाही तर ३६% ते ४०% दराने व्याज आकारले जाते. ३ महिने कालावधीत दंड रक्कम आकारली जाणार नाही. 

कोरोना आणि कायदा

मी नक्की काय करायला हवे ?

 • आर्थिक चणचण असेल तर कर्जाचा हफ्ता / व्याज भरणा तुम्ही पुढे ढकलू शकता. तुमचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही. 
 • आरबीआय ने रेपो रेट कमी केल्याने तुमचा कर्जावर आकारला जाणारा व्याजदर सुद्धा कमी होणार आहे. 
 • तुम्ही इएमआय सहजपणे भरू शकत असाल तर फार उत्तम ! ३ महिने कर्ज कालावधी वाढवणे म्हणजे तितके व्याज बँकेला जास्त भरणे आले.  

रिझर्व्ह बँकेची आजची घोषणा सर्वसामान्य ग्राहकांसाठी मोठी दिलासा देणारी आहे

सदर प्रेस रिलीज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer: https://arthasakshar.com/disclaimer/ 

Leave a Reply

Your email address will not be published.