जामीनदार Guarantor
https://bit.ly/2JkY1Hc
Reading Time: 3 minutes

Guarantor: जामीनदार राहण्यापूर्वी…

आजच्या लेखात आपण कर्जासाठी जामीनदार (Guarantor) राहण्यापूर्वी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात याबद्दलची सविस्तर माहिती घेणार आहोत. आयुष्यात वाटचाल करत असताना अनेक वेळी आपल्याला काही वेळा कठीण निर्णय घ्यावे लागतात. त्यापैकीच एक निर्णय म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या कर्जासाठी तुम्ही जामीनदार म्हणून राहणे. 

हे नक्की वाचा: Guarantor -कर्जासाठी जामीन राहताय? थांबा आधी हे वाचा…

तुम्ही जामीनदार (Guarantor) आहात का? 

  • तुमचा एखाद्या जवळच्या मित्राला किंवा नातेवाईकाला त्याच्या व्यवसायासाठी किंवा आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी बँकेकडून कर्ज घेण्याची आवश्यकता असते आणि तो अशावेळी तुम्हाला जामीनदार म्हणून सही करण्यासाठी गळ घालतो, तुम्हीही तुमच्या मैत्रीखातर किंवा नात्यासाठी या गोष्टीला नाईलाजाने होकार देता, परंतु हा होकार देण्याआधी त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा तुम्ही विचार केला आहे का?
  • मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अगदीच आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाने बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार नक्कीच केला असेल.
  • या संपूर्ण प्रक्रियेत आपल्याला जामीनदार म्हणून एक व्यक्ती आवश्यक असतो.आपल्याला देखील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये अशा अनेक व्यक्तींनी मदत केली असेल आणि दुसऱ्यांना मदत करणे  चांगली गोष्ट आहे.  परंतु, त्या मदतीमुळे आपल्याला काही अपाय होणार आहे का, याचा विचार करूनच दुसऱ्यांना मदत करायला हवी.
  • आपण एखाद्या व्यक्तीच्या कर्जासाठी जामीनदार राहतो याचा अर्थ जर ती व्यक्ती काही कारणास्तव कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरली, तर बँक ते कर्ज तुमच्याकडून वसूल करून घेते.
  • 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने गंगा किशन केसमध्ये जामीनदाराकडुन कर्ज वसूल करण्याची बँकेला परवानगी दिली होती. त्या प्रकरणात ज्या व्यक्तीने कर्ज घेतले होते ती व्यक्ती कर्ज न फेडताच निधन पावली.
  • पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि न्यायालयाने बँकेला जामीनदार व्यक्तिकडून कर्ज वसूल करून घेण्याची मुभा दिली. 

Guarantor: जामीनदार राहण्यापूर्वी विचारात घ्या या ७ गोष्टी 

१. आर्थिक व्यवहार तपासा

  • कोणासाठी तरी जामीनदार म्हणून जबाबदारी घ्यायच्या आधी त्या व्यक्तीचे आर्थिक व्यवहार व्यवस्थित तपासायला हवेत.  
  • ती व्यक्ती खरेच हे सर्व कर्ज फेडू शकेल का? याचा देखील विचार करायला हवा 
  • या बाबतीत तुमची खात्री पटली तरच तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी जामीनदार म्हणून जबाबदारी घ्यायला हवी. 

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया

२. क्रेडिट स्कोअर तपासा

  • कोणाच्याही कर्जाची जबाबदारी घेण्याचे आधी त्याचा क्रेडिट स्कोअर तपासा.  
  • जर तो चांगला असेल तरच तुम्ही जामीनदार म्हणून जबाबदारी घेऊ शकता.

३.  कर्जाच्या हप्त्यांवर लक्ष ठेवा

  • बँक लगेच तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करणार नाही. जर पहिले चार हप्ते कर्जदार भरू शकला नाही, तर बँक एक नोटीस काढून त्याबद्दल सूचना देईल.  
  • तुम्ही ज्या व्यक्तीच्या कर्जांसाठी जामीनदार राहिला आहात ती व्यक्ती वेळेवर कर्जाचे हप्ते भरतेय की नाही, यावर तुमचं लक्ष असायला हवं .

४.  तुमच्या भविष्याचा विचार करा

  • मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा तुम्ही एखाद्या कर्जाची जबाबदारी घेतात तेव्हा तुमची कर्ज घेण्याची क्षमता देखील कमी होते आणि समजा ती व्यक्ती कर्ज फेडू शकली नाही किंवा कर्जाचे हप्ते देण्यात उशीर केला, तर त्या व्यक्तीच्या या दिरंगाईचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो.  
  • यामुळे तुमची कर्ज घेण्याची क्षमता देखील ठराविक काळासाठी कमी होते.
  • जामीनदार होण्याच्या आधी जवळच्या भविष्यात म्हणजे अगदी दोन-तीन वर्षात तुम्हाला कर्जाची आवश्यकता आहे का, याची खात्री करून घ्या. कारण जर तुम्ही जामीनदार असाल तर तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी कर्ज मिळण्यास त्रास होऊ शकतो.

५.  जामीनदार -कोणत्या कर्जासाठी ?

  • जर जामीनदार होणारच असाल, तर शक्यतो गृहकर्ज, वाहन कर्ज यासारख्या कर्जासाठी जामीनदार व्हा. 
  • या कर्ज प्रकारात जर कर्जदार कर्जाचे हप्ते नियमित वेळेवर देऊ शकला नाही तर बँक जामीन म्हणून ठेवलेल्या वस्तू म्हणजेच घर, गाडी अशा वस्तू त्यांच्या ताब्यात घेऊ शकते आणि पर्यायाने ते कर्ज फेडायची जबाबदारी तुमच्यावर येणार नाही.

हे नक्की वाचा: कर्जबाजारीपणाची १४ लक्षणे

६. अजून एका जामीनदाराची तरतूद –

  • जर जामीनदार होणारच असाल, तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला सांगून आणखी एखाद्या व्यक्तीला जामीनदार होण्यासाठी तयार करायला सांगावे.  
  • यामुळे जर काही कारणास्तव कर्जदार व्यक्ती कर्ज खेळायच्या आधी निधन पावला किंवा तो कर्ज फेडू शकला नाही, तर कर्जाचे हप्ते दोन भागात विभागले जातील.

७.  जीवन विमा योजनेत गुंतवणूक करावी

  • जर जामीनदार होणारच असाल तर कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची जीवन विमा पॉलिसी काढलेली आहे का,याबद्दल माहिती घ्यावी.
  • जर कर्जदाराची कोणत्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी काढलेली नसेल तर यासंदर्भात त्याच्याशी चर्चा करून त्याला जीवन विमा पॉलिसी काढायला सांगावी. 
  • जेणेकरून दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर विम्याच्या पैशातून ते कर्ज फेडता येईल.

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Guarantor in Marathi, Guarantor Marathi Mahiti, Guarantor mhnje kaay?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…