Reading Time: 3 minutes

IRDAI (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) (विमा उत्पादन) नियम 2024 आरोग्य विभागातर्फे एक सर्क्युलर प्रकाशित करण्यात झालं. त्यानुसार पॉलिसीधारकांचे हित लक्षात घेता काही महत्वाचे बदल संस्थेमार्फत केले आहेत.आजच्या लेखामधून याबद्दल काही महत्वाची माहिती मांडायचा प्रयत्न केला आहे. यामुळे जनमानसात जागरूकता वाढून त्याचे फायदे सर्वाना माहित होणे अपेक्षित आहेत. ते याप्रमाणे-

1. कस्टमर इन्फॉर्मेशन शिट (#Customer Information Sheet ) – 

CIS हे पॉलिसीबद्दल सविस्तर माहिती देणारे एक कागदपत्र आहे. तुम्ही वैयक्तिक विमाधारक असा किंवा एखाद्या समूहामधे विमा घेतलेला असो, अशा प्रत्येक पॉलिसीधारकाला CIS देण्यात येईल. यात विमाधारकाची वैयक्तिक माहिती असेल; तसेच याशिवाय खालील गोष्टीचा समावेश असेल. उदाहरणार्थ ,

  • विम्याचा प्रकार कुठला आहे? विम्याची रक्कम किती आहे? विम्याचे कव्हरेज तसेच पॉलिसीमधे समाविष्ट असणारे मुद्दे याचा समावेश असेल.  
  • पूर्व निर्धारित रक्कम, ज्या पलीकडे विमा कंपनी रक्कम भरणार नाही आणि निर्धारित रक्कम म्हणजे दावा केलेली रक्कम निर्धारित रकमेपेक्षा अधिक असेल तर विमा कंपनी एका विशिष्ट रकमेपर्यंत कव्हर देते.
  • प्रतीक्षा कालावधी: अर्थात वेटिंग पिरेडमधे काही आजार आणि औषधोपचार कव्हर केले जात नाहीत.
  • कस्टमर इन्फॉर्मेशन शिटमुळे विमा कंपनीला पॉलिसी धारकांची सर्व माहिती संग्रहित करणे सोपे होते. त्यामुळे पॉलिसीधारकांना सुविधा देण्यासाठी मदत होते.
  • तसेच या सुधारित फॉर्ममुळे माहितीचा गैरवापर होणे, माहितीमधे त्रुटी आढळणे या गोष्टी टाळता येऊन माहितीची गोपनीयता आणि संरक्षण यांचा विचार देखील करण्यात आला आहे.   

माहितीपूर्ण:  विमा कंपन्यांचे कार्य कसे चालते?

2. नो क्लेम बोनस : (#एनसीबी): 

पॉलिसीधारकाने पॉलिसीच्या मुदतीदरम्यान आरोग्य विमा पॉलिसीवर कोणताही दावा केला नाही तर विमा कंपनीकडून पॉलिसी धारकाला बोनस विमा दिला जातो. यात तुमचे प्रीमियम न वाढवता पॉलिसीसाठी असलेले कव्हरेज वाढवले जाते. याला नो क्लेम बोनस म्हणतात. 

  • या नो क्लेम बोनसचे दोन प्रकार असतात, यापैकी पॉलिसीधारक त्याच्या निवडीनुसार किंवा सहमतीनुसार पर्याय निवडू शकतात.
  • पर्याय1: संचयीत बोनस: तुमच्या नवीन वर्षाच्या प्रीमियममधे मागच्या वर्षाची मूळ रक्कम जोडली जाते. 
  • पर्याय2: दरवर्षी पॉलिसी नूतणीकरणाच्या वेळी प्रीमियमची  रक्कम न वाढवता प्रीमियममधे सवलत दिली जाते.
  • विमाधारकांनी दरवर्षी त्यांचे एनसीबी प्रमाणपत्र विमा कंपनीकडून मिळवणे आवश्यक आहे.

3. 100% कॅशलेस क्लेम सेटेलमेंट :(#cashless claim settlement )

  • पॉलिसधारकाने 100% कॅशलेस क्लेम सेटेलमेंटसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, एमर्जन्सीमधे पॉलिसीधारक विमा कंपनीला 100% कॅशलेस क्लेमसाठी विनंती करू शकतो आणि त्यानंतर अधिकृतपणे विनंतीसाठी साधारण एक तासाच्या आत विमा कंपनीला क्लेम संदर्भात निर्णय घेणे आवश्यक असेल.
  • या सगळया व्यवस्थापनासाठी IRDAI ने वीमा कंपनीला 31 जुलै 2024 पर्यंतचा वेळ दिला आहे.
  • याआधी 2022-2023 चा विचार केला असता आरोग्य विमा नियमकाने जवळपास 86% दावे निकालात काढले आहे. या पूर्वीच्या नियमन 27 (i) च्या अटींनुसार, विमा कंपनी शेवटचं आवश्यक कागदपत्र मिळाल्यापासून तीस दिवसांच्या आत दावा निकाली काढेल किंवा नाकारेल असे नियम होते.

हे जाणून घ्या : आरोग्यविमा संरक्षण कमी पडल्यास काय करावे?

4. मोरेटोरियम कालावधी :

मोरेटोरियम कालावधी म्हणजे या कालावधीनंतर विमा कंपन्यांना पॉलिसी खरेदी करताना पॉलिसीधारकास आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांबद्दलचा खुलासा करणारे प्रश्न विचारण्यास मनाई केली जाते

  • 60 महिन्यांचा कालावधी पूर्ण केल्यावर, कुठल्याही विमा कंपनीकडून कोणतीही विमा आणि क्लेमचा दावा हा विवादाचा मुद्दा मानला जात नाही. विमा कंपनी पूर्व-अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितीसंदर्भात जर काही दावे असतील तर ते  दावे नाकारू शकते.
  • आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत करण्यात येणारे दावे पाच वर्षांच्या आत करणे आवश्यक आहे. आधी ही मुदत आठ वर्षे होती.
  • उदाहरणार्थ :  अबक नावाच्या व्यक्तीने आरोग्य विमा खरेदी केला. त्याचा  मोरेटोरियम कालावधी 5 वर्षे आहे. विम्याची तारीख:15/07/2024

समजा या व्यक्तीला डायबेटीस झाला आणि त्याचे निदान 10/08/2024 ला झाले तर अबक यासाठी दावा करू शकत नाही कारण येथे त्याचा मोरेटोरियम कालावधी पूर्ण झालेला नाही आणि हा आजार पूर्वअस्तीत्वात असलेला आजार मानला जातो. मात्र अबक या व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आला ती तारीख 13/10/2030 असेल तर मात्र त्याने दावा केला तर तो ग्राह्य मानला जाईल कारण मोरेटोरियम कालावधी पूर्ण झालेला आहे. शिवाय हृदयविकाराचा झटका ही अचानक येणारी आपत्ती आहे. त्यामुळे त्याला विमासंरक्षण मिळू शकतं.  

5. हॉस्पिटलमधील डिस्चार्ज:

  • नवीन नियमानुसार हॉस्पिटलमधून डिस्चार्जची विनंती केल्यावर विमाधारकाला तीन तासांमधे विमा कंपनीकडून निर्णय येणे आवश्यक आहे. 
  • तीन तासांपेक्षा अधिक उशीर झाला आणि यामुळे पॉलिसीधारकाला अधिक पैसे भरावे लागले तर, विमा कंपनी त्या खर्चाची जबाबदारी घेणार.
  • जुन्या पद्धतीचा विचार केला असता रुग्णाच्या डिस्चार्जची प्रक्रिया सुरू झाल्यावर विमा कंपनीकडून विमा क्लेम करण्याच्या प्रक्रियेसाठी 10-12 तासांचा कालावधी लागत असे. पर्यायाने  रुग्णांना हॉस्पिटलमधला मुक्काम वाढल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असे. मात्र नवीन नियमामुळे डिस्चार्ज प्रक्रिया अधिक सोयीस्कर होण्यास मदत होईल.
  • रुग्णालयाचे बिल भरल्याशिवाय किंवा अन्य कुठल्या कारणासाठी रुग्णाचा मृतदेह कुटुंबाला सोपवण्यासाठी अडवणूक होऊ नये यासाठी पॉलिसीधारकांच्या हिताच्या दृष्टीने नविन मुद्दा मांडण्यात आला आहे. तो म्हणजे उपचार सुरू असताना पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास त्याने दावा केलेल्या विनंतीची तत्काळ दखल घेतली जावी. तसेच मृतदेह त्वरित कुटुंबाला सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी.

आर्थिकदृष्टीने संरक्षण पुरविणारा आरोग्य विमा हा आपल्या हितासाठी आहे; त्यासाठी त्याची सर्व माहिती घेऊन योग्य विमा निवडा आणि विम्याच्या कागदपत्रावरील मुद्दे सल्लागार व्यक्तीकडून समजून घेऊन दावा दाखल करताना योग्य ती काळजी घ्या. 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

आरोग्य विम्याची निवड

Reading Time: 3 minutes विकसित देशातील आरोग्य सुविधा तिथल्या नागरिकांचे स्वास्थ्य राखून तेथील नागरिक अशी सेवा…

प्रवासविमा (Travel Insurance)

Reading Time: 3 minutes विमा हा विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यातील करार आहे आणि जोखीम व्यवस्थापन…