Reading Time: 3 minutes

कमाई सुरु झाल्यावर सुरुवातीचे काही दिवस गेल्यावर हुशार लोकांची पावले आपसूकच गुंतवणुकीकडे वळतात. गुंतवणूक करण्यासाठी सोनं, जमीन, घर, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट असे बरेच पर्याय आहेत. (Investment options) आजकालची पिढी मात्र गुंतवणूकी साठी म्युच्युअल फंड, शेअर मार्केट याला पसंती देते, कदाचित भरपूर परतावा आणि जोखीम पत्करण्याची तयारी हे त्यामागचे कारण असावं ! आज या लेखात गुंतवणूक करण्याआधी काय काळजी घ्यावी ही आपण जाणून घेऊया. (Important things to know before investment in Marathi)

 

1) गुंतवणुकीचा हेतू : (Purpose)

  • साधारणपणे गुंतवणूक करताना ती कुठल्या कारणासाठी करणार आहे हे पक्के करावे . 
  • उच्च शिक्षण, परदेशी शिक्षण, लग्न, घर, बचत किंवा वृद्धापकाळाची गरज/सोय यापैकी कुठलेही कारण तुमच्या गुंतवणुकीमागे असू शकते. त्याप्रमाणे गरजेच्या वेळेस ठराविक रक्कम मिळणे अपेक्षित असते.

 

2) जोखीम : (Risk)

  • म्युच्युअल फंड तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करताना जोखीम घेण्याची तयारी हवी.
  • शेअर बाजाराच्या चढ उतारावर कंपनीच्या शेअर्सचे मूल्य अवलंबून असते त्यामुळे तुम्ही गुंतवणूक केलेले पैसे नफा आणि तोटा या पारड्यांमध्ये खेळत असतात. 
  • म्युच्युअल फंड च्या बाबतीत ही जोखीम थोडी कमी होते. 
  • गुंतवणूक करताना तुम्ही किती जोखीम घ्यायला तयार आहे हे ध्यानात घेऊन पैसे  गुंतवावे. 
  • या जोखीम मधून मिळणारा परतावा हा तितकाच आकर्षक असू शकतो त्यामुळे तुम्ही  काळजीपूर्वक गुंतवणूक करा. 

 

3) गुंतवणुकीतील विविधता: (Diversified Investment)

  • Don’t put all your eggs in one basket ! या इंग्रजी म्हणीचा अर्थ समजून घ्या.  
  • तुम्ही गुंतवलेली रक्कम ही सुरक्षित रहावी आणि शेअर बाजारातील चढ उताराची गुंतवणुकीला कमीत कमी हानी पोहोचावी यासाठी फक्त एकाच प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये पैसे न अडकवता इतर पर्यायांचा विचार करावा. 
  • तुम्ही फक्त मुदत ठेवींमध्ये सगळे पैसे गुंतवले तर परतावा कमी मिळतो व सगळे पैसे शेअर्समध्ये गुंतवले तर जोखीम उदभवते.  
  • तुमचे पैसे विविध पर्यायात गुंतवा. यात सरकारी रोखे, म्युच्युअल फंड, कॅश, सोन हे पर्याय येतात,शेअर बाजाराच्या पडझडी मुळे एक बाजू कमकुवत झाली असता दुसरी बाजू गुंतवणुकीला आधार ठरू शकते. 

 

4) कालावधी: (Duration of Investment)

  • छोट्या अवधीसाठी किंवा जास्त कालावधी साठी गुंतवणूक करताना पैशाची गरज किती आणि कधी असणार आहे हे ठरवून गुंतवणूक करावी. 
  • म्युच्युअल फंड मध्ये वेळेआधी पैसे काढून घेतल्यास गुंतवलेल्या रकमेवर तोटा सहन करावा लागू शकतो.
  • योग्य ठिकाणी दीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक छोट्या अवधीच्या गुंतवणुकी पेक्षा चांगला परतावा देते. 

 

हे ही  वाचा : Investment Tips for Beginners : गुंतवणुकीला सुरुवात करताय ? या ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

 

5) आपत्कालीन निधी : (Emergency Fund)

  • कोरोनासारखी आपत्ती किंवा अचानक झालेला अपघात किंवा नोकरी जाणे अशा अप्रिय आर्थिक धक्क्यांसाठी आपत्कालीन खर्चासाठी तुम्ही निधी बाजूला काढायला हवा. 
  • गुंतवणूक करतानाही काही रक्कम आपत्कालीन खर्चासाठी बाजूला काढून ठेवणे महत्त्वाचे असते. नैसर्गिक किंवा अनैसर्गिक घटनांसाठी बचतीचा काही भाग राखीव असावा. 

 

6) सातत्य: (Continuity)

  • कुठल्याही गोष्टी मधील सातत्य हे दीर्घकाळ टिकणारे यश देते. 
  • गुंतवणुकीतील सातत्य सुद्धा भविष्यात येणाऱ्या चढ उताराचा खंबीरपणे सामना करायला मदत करते.
  • “थेंबे थेंबे तळे साचे” या उक्तीप्रमाणे दरमहा काही रक्कम सातत्याने गुंतवल्यास त्याचा परतावा नक्की चांगला मिळतो.
  • चक्रवाढ पद्धतीने फायदा मिळवण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक महत्वाची ठरते. 

 

 

7) संधी: (Opportunity)

  • योग्य संधी मिळणे आणि त्या संधी चे सोने करणे हे प्रत्येकाला जमतेच असे नाही,मात्र प्रयत्नपूर्वक हे शिकणे गरजेचे आहे. 
  • गुंतवणुकीमध्ये योग्य संधी साधून चांगल्या शेअर्समध्ये किंवा चांगल्या जागेत गुंतवणूक केल्यास त्यातून मिळणारा परतावा फायद्याचा ठरतो. 

 

8) पैशाची सुरक्षितता: (Safety for money )

  • वर्षानुवर्षे बचत केलेला पैसा टिकून राहावं आणि वाढत राहावा यासाठी योग्य ठिकाणी  गुंतवणूक करणे गरजेचे आहे.
  • गुंतवणूक करताना गुंतवणुकीतून फायदा होणे यापेक्षा आपलं मुद्दल सुरक्षितता असणे जास्त महत्वाचे ठरते. 

 

9) फसवणुकी पासून सावधानता: (Beware of Fraud)

  • “चकाकते ते सर्व सोने नसते” या उक्तीचा अर्थ ध्यानात ठेऊन बाजारात असणाऱ्या संभाव्य फसवणुकीपासून सावधानता बाळगा. 
  • जास्त फायद्यासाठी सर्व गुंतवणूक पणाला लावून फसवणूक होण्यापासून स्वतःला वाचविणे गरजेचे आहे. कोणाचा तरी फायदा आपल्यासाठी तोटा असू शकतो हे लक्षात ठेवावे. 
  • गुंतवणूक सल्लागार सर्व बारकावे तपासून, गुंतवणुकीचा अभ्यास करून मार्गदर्शन करीत असतो त्यामुळे केवळ अमुक कुणीतरी सांगत आहे म्हणून गुंतवणूक करत असाल तर वेळी थांबा आणि योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. 

महत्वाचे : INVESTMENT IN IT COMPANIES : गुंतवणूक म्हणून ‘आयटी’कडे लक्ष देण्याची गरज का आहे?

 

निष्कर्ष : 

  • बचत आणि गुंतवणूक करणे हे महागाईच्या काळात अत्यंत गरजचे आहे. 
  • गुंतवणुकीतून मिळणारा परतावा भविष्यातल्या गरजांसाठी उपयोगी येतो म्हणून लवकरात लवकर योग्य गुंतवणूक करा आणि सुखी व्हा ! 
  • तुम्हाला गुंतवणुक करणे ही महान सवय लागावी यासाठी शुभेच्छा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutesMRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutesअसा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutesअस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…