Reading Time: 3 minutes

भारतामध्ये गुंतवणूक क्षेत्रात आयपीओ हा शब्द सध्याच्या घडीला चर्चेत आहे. आतापर्यंत एलआयसी, डेल्हिव्हरी आणि अदानी विल्मर या कंपन्यांचे २०२२ मध्ये आयपीओ येऊन गेले. यामधील काही कंपन्यांनी  चांगली कामगिरी केली तर काहींनी निराशाजनक कामगिरी केली. एलआयसी आयपीओने सगळ्यांची निराशा केली असून अलीकडेच त्याचे मूल्य निच्चांकी पातळीला गेले होते. झोमॅटो आणि पेटीएम सारख्या कंपन्यांनी पण निराशाजनक कामगिरी केली आहे. 

मागे येऊन गेलेल्या आयपीओनी निराशाजनक कामगिरी केलेली असली तरी २०२२ आणि २०२३ मध्ये अनेक चांगले आयपीओ येणार आहेत. तुम्ही जर आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर खाली काही कंपन्यांची यादी दिली आहे. त्या सार्वजनिक क्षेत्रात पुढील वर्षभरात सूचिबद्ध होणार आहेत. 

 

१. मामाअर्थ

  • मामाअर्थ कंपनीने लवकरच आयपीओ आणण्याची घोषणा केली आहे. भारतीय स्किनकेअर स्टार्टअप आणि युनिकॉर्न असणारी मामाअर्थ कंपनी २०२३ मध्ये ३ अब्ज डॉलरचा आयपीओ आणण्याचा विचार करत आहे, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे. 
  • या वर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये कंपनीचे अंतिम मूल्य १.२ बिलिअन डॉलर होते. कंपनीने सेक्युआ कॅपिटल आणि बेल्जियमच्या सोफिनासह गुंतवणूकदारांकडून निधी उभारला आहे.  मामाअर्थची स्थापना २०१६ मध्ये हिंदुस्थान युनिलिव्हरचे माजी कार्यकारी अधिकारी वरून अलघ आणि त्यांची पत्नी गझल यांनी केली होती.

 

२.  फ्लिपकार्ट 

  • अमेझॉनची स्पर्धक असणारी फ्लिपकार्ट कंपनी २०२३ मध्ये अमेरिकेमध्ये  त्यांचा आयपीओ मार्केट मध्ये आणणार आहे. एप्रिल २०२२ मध्ये फ्लिपकार्ट कंपनीच्या आयपीओ ६०-७० बिलिअन डॉलर्सच्या उद्दिष्टांपर्यंत जाऊन पोहोचला होता, यासंदर्भातील माहिती रॉयटर्सच्या वतीने देण्यात आली आहे. 
  • २०२१ मध्ये फ्लिपकार्ट कंपनीने क्लिअरट्रीप प्रवासी बुकिंग वेबसाईट विकत घेतली होती. याच कंपनीने औषधे आणि इतर आरोग्य सेवा उत्पादने आणि सेवा देण्यासाठी हेल्थ अँप लाँच केले आहे. 
  • आयपीओ २०२३ मध्ये लाँच करण्याच्या मागे फ्लिपकार्टच्या वतीने कारण सांगण्यात आले आहे की ऑनलाईन आरोग्य सेवा आणि प्रवासी बुकिंगवर लक्ष केंद्रित केल्यामुळे मूल्यांकन वाढवण्याची शक्यता आहे. 
  • फ्लिपकार्ट कंपनीचे मुख्य कार्यालय भारतात नसून सिंगापूर मध्ये आहे. 

 

नक्की वाचा : Investing In IPO : आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

 

३ स्विगी 

  • जानेवारी २०२२ मध्ये स्विगी कंपनीने १० बिलिअन डॉलर्सचे मूल्य पार केले आहे. भारतीय अन्न वितरण कंपनी असणारी स्विगी पुढील वर्षी ८०० दशलक्ष डॉलर जमा करणार आहे. 
  • स्विगी कंपनी अन्न वितरण कंपनी म्हणून न राहता एक लॉजिस्टिक कंपनी म्हणून काम करण्याची योजना आखत आहे. या कंपनीने त्यांच्या बोर्डमध्ये स्वतंत्र संचालक जोडण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०२२ मध्ये स्विगी कंपनी डेकाकॉर्न बनली आहे. सॉफ्टबँक समूह समर्थित स्विगीने ७०० दशलक्ष डॉलर्सचे निधी फेरीत मूल्यांकन दुप्पट करून १०.७ अब्ज उभे केले होते. 

 

४. ओयो 

  • २०१३ मध्ये सुरु झालेल्या ओयो कंपनीचा आयपीओ २०२३ मध्ये येणार आहे. ओयो ही  क्हॉटेल्स भाड्याने देणारी  प्रमुख कंपनी आहे.   
  • ओयो कंपनी सुमारे ८००० कोटी रुपयांचा आयपीओ असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ओयोचे बोर्ड प्रामुख्याने ओरवेल स्टेस लिमिटेड या नावाने ओळखले जाते. मे २०२२ मध्ये बँकर्स आणि गुंतवणूकदारांशी बोलल्यानंतर कंपनी वर्षाच्या अखेरीस पुन्हा प्रक्रिया सुरु करणार आहे. 

 

५. ओला कॅब 

  • २०२२ वर्षाच्या पहिल्या सहामाहीत आपला आयपीओ आणायची ओला कॅब योजना आखत आहे. ओला कॅबचा वापर प्रवासासाठी केला जातो. ओला कॅब कंपनीची स्थापना भाविश अग्रवाल यांनी केली होती. 
  • ओला कंपनीला आर्थिक वर्ष २०२२ च्या समाप्तीपर्यंत ८९.९२ कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. ओला कंपनीची प्रमुख प्रतिस्पर्धी उबेर कॅब कंपनी राहिलेली आहे. भविष्यात कंपनी इलेकट्रीक वाहनांच्या व्यवसायात उतरणार आहे. 

 

नक्की वाचा : IPO New Rules and Regulation : आयपीओबद्दल ‘हे’ नवीन नियम माहित आहेत का ?

 

६. बायजू 

  • शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या बायजू कंपनीने २०२२ मध्ये प्री आयपीओ मधून ८०० दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला आहे. नियोजित प्रारंभिक पब्लिक ऑफरिंगच्या आधीची फेरी कंपनीची झालेली आहे. 
  • कंपनीचे सध्याच्या घडीला  २२ अब्ज डॉलर्स मूल्य आहे.  संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी त्यांच्या वैयक्तिक क्षमतेत ४०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. 
  • बायजू पुढील नऊ ते बारा महिन्यांमध्ये आयपीओसाठी कागदपत्रे दाखल करणार आहे. कंपनीच्या यादी करताना अंदाजे ४० अब्ज डॉलर किंमत असण्याची अपेक्षा आहे. 

 

कंपनी शेअर बाजारात नोंदणी करावी, भांडवल उभे करावे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे शेअर्स खरेदी विक्री करता यावे म्हणून आयपीओ आणत असते. तुम्ही आयपीओ मधली गुंतवणूक आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेऊनच करावी.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…