Delhivery IPO
Delhivery IPO
Reading Time: 3 minutes

Delhivery IPO

एलआयसीच्या २२,००० हजार कोटींचा आयपीओ नुकताच बाजारात येउन गेला. आतापर्यंतचा शेअर बाजारातील हा सर्वात मोठा आयपीओ होता. याच आयपीओ पाटोपाठ आणखी एक धमाकेदार आयपीओ बाजारात आजपासून खुला झाला आहे. आपल्यातील बऱ्याच जणांना ही कंपनी माहित नसेल. मात्र भारतातील लॉजिस्टिक क्षेत्रातील(पुरवठा करणारी) सर्वात मोठी कंपनी डेल्हिव्हरी  आहे. डेल्हिव्हरी कंपनीचा आयपीओ ११ तारखेपासून म्हणजे आजपासून गुंतवणुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तब्ब्ल ५,२३५ कोटी रुपयांची मागणी करण्यासाठी हा आयपीओ बाजारात येणार आहे. कार्पोरेट क्षेत्राशी निगडित असणाऱ्या काही गोष्टींसाठी, कंपनीच्या वाढीव उपक्रमांसाठी या सर्व रक्कमेचा वापर करण्यात येणार आहे. 

 

हेही वाचा – Adani Wilmar IPO : अदानी विल्मार आयपीओमध्ये गुंतवणूक करताना जाणून घ्या ‘या’ गोष्टी

 

डेल्हिव्हरी  काम कसे करते ?

 • डेल्हिव्हरी ही भारतातील आघाडीची लॉजिस्टिक क्षेत्रातील कंपनी आहे. दळणवळण, पुरवठा क्षेत्रात ही कंपनी काम करते. भारतात जवळपास सर्वच राज्यांमध्ये डेल्हिव्हरीचं व्यावसायिक जाळं पसरलेलं आहे. १७,०४५ पिनकोड क्रमांकांवर डेल्हिव्हरी आपली सुविधा पुरवते.
 • डेल्हिव्हरीकडे २१,३४२ सक्रिय ग्राहक आहेत. यामध्ये ई-कॉमर्स मार्केटप्लेस, डायरेक्ट-टू-ग्राहक ई-टेलर्स आणि एंटरप्राइजेस आणि FMCG यांचा समावेश आहे. यासोबतच वेअर हाउसेस म्हणजेच वस्तूंचा साठा करण्यासाठी लागणाऱ्या जागांची लॉजिस्टिक व्यवसायात गरज असते. डेल्हिव्हरी भारतातील अनेक ठिकाणी जागा भाडेतत्वावर घेऊन व्यवसाय करते. वेअर हाऊसेसच्या बाबतीतही डेल्हिव्हरीचं मोठं जाळं पसरलेलं आहे. 
 • लॉजिस्टिक व्यवसायात लागणारा दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ट्रान्सपोटेशन (वाहतूक). वाहतुकीसाठी देखील डेल्हिव्हरी थर्ड पार्टी कंपन्यांसोबत हातमिळवणी करून यामध्ये एक क्रमांकावर आहे. बऱ्याच ई-कॉमर्स कंपन्यांच्या आपल्या स्वतःच्या वाहतूक  सुविधा आहेत. तरीदेखील उरलेल्या ४६% वाहतूक व्यवसायात डेल्हिव्हरी चांगला नफा मिळवते. 
 • तिसरा आणि अत्यंत महत्वाचा घटक यामध्ये आहे- टेकनॉलॉजी(तंत्रज्ञान). डेल्हिव्हरीने तंत्रज्ञानामध्ये कमालीची वाढ केली आहे. यामध्ये डेटा इंटीलिजन्स आणि इतर तंत्रज्ञानाचा उपयोग करून डेल्हिव्हरीने आपली छाप सोडली आहे. लॉजिस्टिक व्यवसायात लागणाऱ्या तीनही मुख्य घटकांमध्ये डेल्हिव्हरीने प्रभुत्व स्थापित केले आहे. यामुळेच कंपनीचा महसूल सातत्याने चढता आहे. 
 • डेल्हिव्हरीकडून  एक्सप्रेस पार्सल, अवजड वस्तूंची डिलिव्हरी, मालवाहतूक, गोदाम पुरवठा साखळी, क्रॉस-बॉर्डर एक्सप्रेस यांसारख्या सुविधा ग्राहकांना दिल्या जातात. मुख्यतः मालाचा पुरवठा करणारी कंपनी यादृष्टीकोनातून आपण डेल्हिव्हरीकडे पाहू शकतो. 
 • कंपनीला सध्या एक्सप्रेस पार्सलमधून ५९% महसूल मिळतो. अवजड वस्तूंच्या डिलिव्हरीमधून २५%, मालवाहतूकीमधून ४%गोदाम पुरवठा साखळीमधून ७% तर क्रॉस-बॉर्डर एक्सप्रेसमधून ५%महसूल मिळतो. 

डेल्हिव्हरीचा आतापर्यंतचा व्यावसायिक रेकॉर्ड कसा आहे

 • डेल्हिव्हरीने आतापर्यंत तरी देशभरात अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवसाय केला आहे असं दिसत आहे. कंपनीकडे तिच्या मालकीच्या तंत्रज्ञानाच्या स्टॅकवर केलेल्या कामाचा एक चांगला रेकॉर्ड आहे. २०११ पासून भारतीय बाजारपेठेत डेल्हिव्हरीचा समावेश करण्यात आला होता. सध्या डेल्हिव्हरी भारतातील सर्वात मोठी लॉजिस्टिक क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. 
 • भारत हा विकसनशील देश आहे. भारताची आगामी काळातील विकासाची शक्यता लक्षात घेता डेल्हिव्हरीला एक मोठी संधी आहे. भारतातील जीडीपीच्या टक्केवारीनुसार डेल्हिव्हरी  कंपनीला सध्या बाजारपेठेत टक्कर घेणारी कंपनी सध्यातरी अस्तित्वात नाही. डेल्हिव्हरी सध्या मोठयाप्रमाणावर डेटा इंटीलिजन्सचा वापर करत आहेत. यासोबतच नवीन तंत्रज्ञानाचा वापरही कंपनीने वाढवलेला आहे. यामुळे कंपनी आगामी काळातही भारतीय बाजारपेठेत चांगला नफा कमवू शकते असा अंदाज आहे. 

हेही वाचा – LIC IPO : जाणून घ्या ‘LIC’ च्या ‘IPO’ विषयी ….

आयपीओची तारीख

 • डेल्हिव्हरीचा आयपीओ हा ११ मे रोजी गुंतवणुकीस उपलब्ध होणार आहे. १३ मे दुपारी ५ वाजता हा आयपीओ गुंतवणुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. 
 • अँकर गुंतवणूकदारांसाठी अगोदरच १०मे रोजी आयपीओ उपलब्ध झाला आहे.
 • डेल्हिव्हरीने प्रति इक्विटी शेअर ४६२ ते ४८७ रुपये प्राइस बँड निश्चित केला आहे. 
 • डेल्हिव्हरी आयपीओ जेव्हा बाजारात विक्रीसाठी आणण्याचा विचार सुरु होता तेव्हा त्याचे मूल्य ७,४६० कोटी रुपये इतके होते. मात्र काही तांत्रिक बाबींकडे लक्ष देऊन त्यांचे मूल्य आता ५,२३५ कोटी रुपये इतके निश्चित करण्यात आले आहे. 

संभाव्य जोखीम

 • कोरोनाची महामारी घटल्यापासून डेल्हिव्हरीच्या व्यवसायामध्ये कमालीची वाढ झालेली दिसत आहे. कंपनीने बाजारातील इतर लॉजिस्टिक कंपन्यांना चांगलेच मागे टाकले आहे. ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांच्या कामकाजातून डेल्हिव्हरीने ४८१० कोटींचा महसूल(व्यवसाय) उभारलेला आहे.  वार्षिक व्यवसायात डेल्हिव्हरीच्या ४८% वाढ यावर्षी दिसून आली आहे.   
 • डेल्हिव्हरी कंपनीने या वर्षी महसूल चांगला उभारलेला असताना नफ्याच्या बाबतीत काहीसं नुकसान झेलावं लागलं आहे. कंपनीला ८९१ कोटींचा निव्वळ  तोटा झाला आहे. दुसरीकडे ऑपरेटिंग लिव्हरेजमधून कंपनीला फायदा मिळत आहे. यामुळे मार्जिनमध्ये(व्यवसायातील नफ्याचा टक्का) सुधारणा होऊन कंपनीला नफा मिळण्याची शक्यता मोठी आहे. 
 • कंपनीचा व्यवसाय ई- कॉमर्स वर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. मोठ्या 5 ग्राहकांकडून कंपनीला 40% महसूल मिळतो. यात काही गडबड झाल्यास कंपनीचा नफा कमी होऊ शकतो. 

 

हेही वाचा – Investing In IPO : आयपीओमध्ये गुंतवणूकीपूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

तुम्ही काय कराल ? 

लॉजिस्टिक व्यवसायात मार्जिन कमी असूनही डेल्हिव्हरीने मोठी मजल मारलेली आहे. सध्या जरी स्टॉक काहीसा महाग वाटत असला तरी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी डेल्हिव्हरीचा स्टॉक तुम्ही आता आयपीओ मधून किंवा लिस्टिंग झाल्यावरही काहीसा खाली आल्यानंतर  तुम्ही खरेदी करू शकता.

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

वॉरेन बफेट यांनी दिलेले गुंतवणूकीचे धडे !

Reading Time: 2 minutes अर्थविश्वातील गुंतवणूकीमधील बाराखडीचे गुरु म्हणजे वॉरेन बफेट यांचे नाव घेतले जाते. वॉरेन बफेट हे नाव, त्यांचे गुंतवणूकीचे ज्ञान आणि शेअर बाजारातील अनुभवांचे…