Reading Time: 2 minutes

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक बॅकअप अत्यंत गरजेचे ठरते, यामुळेच आजच्या काळात आरोग्य विमा असणे महत्वाचे आहे. आरोग्य विमा वैद्यकीय आणीबाणीमध्ये पॉलिसी धारकास वैद्यकीय खर्चामध्ये विमा संरक्षण प्रदान करते.

परंतु आरोग्य विमा खरेदी करताना त्या संबंधित सर्व माहिती असणे आवश्यक आहे. आरोग्य विमा खरेदी करण्यापूर्वी पॉलिसी धारकास यामधील प्रतीक्षा कालावधीबद्दलही जाणून घेणे महत्वाचे आहे.

 

आरोग्य विम्यामध्ये प्रतीक्षा कालावधी म्हणजे काय?

आरोग्य विम्यात प्रतीक्षा कालावधी हा पूर्वनिर्धारित कालावधी असतो. ज्यामध्ये पॉलिसी धारकास आरोग्य विमा अंतर्गत कोणत्याही प्रकारचा विमा लाभ दावा करता येत नाही. पॉलिसी धारकाने आरोग्य विमा अंतर्गत प्रतीक्षा कालावधी संपण्यापूर्वी दावा केल्यास विमा कंपनीद्वारे दावा फेटाळला जातो.  प्रतीक्षा कालावधी संपल्यानंतर अस पोलिसी धारकास दावा करता येतो व विमा कंपनी हा दावा फेटाळून शकत नाही.

प्रतीक्षा कालावधी मधील अटी व शर्ती वेगवेगळ्या कंपनीनुसार बदलतात तसेच प्रतीक्षा कालावधी हा विम्याचे कव्हरेज व पॉलिसी धारकाच्या परिस्थितीनुसार वेगवेगळा असतो.

 

आरोग्य विम्यामध्ये प्रतीक्षा कालावधीचे विविध प्रकार कोणते?

 

१) प्रारंभिक प्रतीक्षा कालावधी – आरोग्य विमा जारी करण्यात आलेल्या तारखेपासून सुरवातीच्या ३०-९० दिवसांच्या आत पॉलिसी धारकास आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास किंवा अपघात झाल्यास तसेच हॉस्पिटलाईज झाल्यास वैद्यकीय खर्चामध्ये आरोग्य विम्या अंतर्गत कोणत्याही प्रकारचा दावा करता येत नाही. आरोग्य विमा खरेदी नंतर ३०-९० दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असतो.प्रतीक्षा कालावधी संपल्यानंतर पॉलिसी धारकास दावा करता येतो.

हेही वाचा – Health Insurance : आरोग्यविमा रोकड विरहित सेवा एक वरदान

 

२) पूर्व अस्तित्वात असलेल्या रोगांसाठी प्रतीक्षा कालावधी – आरोग्य विमा खरेदी करताना पॉलिसी धारकास आधीपासून असलेल्या आजारांबद्दल जाहीर करणे आवश्यक असते किंवा आरोग्य विमा घेताना विमा कंपनी पॉलिसी धारकास वैद्यकीय चाचण्या करणे अनिवार्य करते. आधीपासून अस्तित्वात असलेले रोग उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड इत्यादी आजार असल्यास असणाऱ्या  प्रतीक्षा  कालावधीस पूर्व विद्यमान रोग प्रतीक्षा कालावधी म्हणून ओळखला जाते. सर्व विद्यमान रोग प्रतीक्षा कालावधी सामान्यतः १-४ वर्षापर्यंत असतो यामुळे आधीपासून असलेल्या आजारास या कालावधीनंतर कव्हरेज मिळते.

 

३) विशिष्ट आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी – काही विशिष्ट आजार किंवा रोग जसे की ENT, हर्निया, ट्यूमर ,ऑस्टिओपोरोसिस इत्यादी. पॉलिसी धारकास यांसारखे आजार असल्यास प्रतीक्षा कालावधी सामान्यतः १ ते २ वर्षे असतो. आरोग्य विमा खरेदी करताना पॉलिसी दस्ताऐवजामध्ये  हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. 

प्रतीक्षा कालावधी प्रत्येक रोग व विमा कंपनी   नुसार वेगवेगळे असतात. 

 

४) गंभीर आजार प्रतीक्षा कालावधी – आरोग्य विमा योजना अंतर्गत पॉलिसी धारकास गंभीर आजार असल्यास सामान्यतः ९० दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीनंतर कव्हरेज मिळते. 

 

५) मातृत्व लाभ प्रतीक्षा कालावधी –  काही विमा कंपनी आरोग्य विमा योजनेअंतर्गत मातृत्व लाभ देतात. यामध्ये प्रतीक्षा कालावधी साधारण ९ ते ३६ महिन्यांपर्यंत असतो. या कालावधीनंतर नवजात बाळास संरक्षण व मातृत्व लाभ मिळतो.

 

हेही वाचा – Health Insurance Policy: आरोग्य विम्याच्या सहाय्याने हॉस्पिटल खर्च वाचवण्यासाठी ८ महत्वाच्या टिप्स

 

६) बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया प्रतीक्षा कालावधी – काही आरोग्य विमा कंपन्या अंतर्गत बॅरिएट्रिक शस्त्रक्रियांचा समावेश आहे ज्यामध्ये प्रतीक्षा कालावधी सामान्यतः २ वर्षे असतो.

 

७) अपघाती हॉस्पिटलायजेशन प्रतीक्षा कालावधी – आरोग्य विमा खरेदी केल्यानंतर पॉलिसी धारकाचा अनपेक्षित अपघात झाल्यास अपघात स्वरूपानुसार अपघाती हॉस्पिटलायजेशन मध्ये प्रतीक्षा कालावधी नसतो पॉलिसी धारकास अपघाती हॉस्पिटलायझेशनसाठी दावा करता येतो.

 

म्हणून आरोग्य विमा खरेदी करताना प्रतीक्षा कालावधी तपासणे व त्याबद्दल माहित असणे आवश्यक आहे. 

 

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

शेअर बाजारात ६ गोष्टींपासून कायम राहा लांब !

Reading Time: 2 minutes कोरोनाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. पण काही गुंतवणूकदारांनी…