john graham
john graham
Reading Time: 3 minutes

John Graham investing in India

कॅनडा देशातील सुमारे दोन कोटी नोकरदारांच्या ३३ लाख कोटी रुपयांच्या  निवृत्ती फंडाच्या जगभराच्या गुंतवणुकीची जबाबदारी असलेल्या सीपीपी इन्वेस्टमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन ग्रॅहम नुकतेच भारतात येवून गेले. ते भारतात गुंतवणुकीच्या संधी शोधत आहेत, मग भारतीय गुंतवणूकदारांनी का मागे राहायचे? 

जगभर महागाई आणि युद्धाची चर्चा सुरु असताना भारतात एक पाहुणे नुकतेच येऊन गेले. त्यांचे नाव जॉन ग्रॅहम. कॅनडा देशातील सुमारे दोन कोटी नोकरदारांच्या निवृत्ती फंडाच्या जगभराच्या गुंतवणुकीची जबाबदारी असलेल्या सीपीपी इन्वेस्टमेंट बोर्डाचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. हे बोर्ड ५०० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३३ लाख कोटी रुपयांचा फंड सांभाळते.  ३३ लाख कोटी रुपये म्हणजे भारताचे एका वर्षाचे करसंकलनही त्यापेक्षा सहा लाख कोटी रुपयांनी कमी आहे. आणि भारताच्या वार्षिक बजेटपेक्षा साधारण पाच ते सहा लाख कोटी कमी. आपल्या निवृत्तीच्या काळात आपण आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असावे, यासाठी सेवेत असताना निवृत्ती फंडात मोठी गुंतवणूक करण्याची अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन देशांत पद्धत आहे. कॅनडात त्यातून एवढ्या प्रचंड फंडाची निर्मिती झाली आहे. त्या फंडाचे काय करावयाचे, याचा निर्णय हे ग्रॅहमसाहेब नेतृत्व करत असलेले बोर्ड घेते. त्यामुळे ते कोठे गुंतवणूक करतात, याकडे सर्व जगाचे लक्ष असते. असे ग्रॅहमसाहेब भारतात पाच दिवस आले, त्याला म्हणूनच महत्व आहे.

 

हेही वाचा –  Investment Tips for Beginners : गुंतवणुकीला सुरुवात करताय ? या ५ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

 

भारतातील संधीकडे लक्ष 

सीपीपी इन्वेस्टमेंट बोर्डाची जगभरात मोजकी कार्यालये आहेत, ज्यात मुंबईत असलेल्या कार्यालयाचा समावेश आहे. या बोर्डाकडे असलेल्या निधीचा सर्वाधिक वाटा आज चीन, अमेरिका आणि जपानला मिळत असला तरी त्याचे लक्ष भारताकडे वळले असल्याचे ग्रॅहमसाहेबांच्या भारत भेटीच्या वेळी आणि त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात आले. आज यातील फक्त तीन टक्के गुंतवणूक भारताच्या वाट्याला आली आहे. मात्र, विदेशी गुंतवणुकदारांना भारत चुंबकाप्रमाणे खेचून घेत आहे, त्याचे कारण भारतातील गुंतवणुकीचे वैविध्य होय, या त्यांच्या विधानामुळे भारताच्या आशा वाढल्या आहेत. आकार आणि लोकसंख्या लक्षात घेता भांडवलाची भारताला प्रचंड गरज आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती चांगली असताना सुद्धा परकीय गुंतवणुकीची भारताला कायमच गरज राहिली आहे. दुसरीकडे भारतात सध्या इतकी संधी आहे की त्याकडे अशा फंडाचे लक्ष न गेले तरच नवल. 

आकर्षक गुंतवणूक क्षेत्र 

ग्रॅहमसाहेबांना भारतातील कोणती क्षेत्र खुणावत आहेत, हे पाहिले पाहिजे. याविषयी त्यांनी जी विधाने केली आहेत, त्याचा सार साधारणच आहे.

१. भारतातील रस्ते बांधणी, कार्यालयाच्या जागा, हरित उर्जा, ईकॉमर्स आणि फिनटेक कंपन्या यातील गुंतवणूक त्यांना आकर्षक वाटते आहे.

२. गुंतवणुकीत वैविध्य हवे तसेच ती भौगोलिकदृष्ट्या विभागलेली असली पाहिजे, असे त्यांना वाटते आणि या दोन्ही गोष्टी भारतातील गुंतवणुकीतून साध्य होतात, असे ते म्हणतात.

३. भारतीय बाजारपेठ संधी तर देतेच पण ती आता अत्याधुनिक, विकसित आहे.

४. भारतात गुंतवणूक करण्यासाठीच्या अडचणी बऱ्याचअंशी दूर झाल्या आहेत.

५. बोर्ड या फंडाची ८५ टक्के गुंतवणूक कॅनडाच्या बाहेर करते. गुंतवणुकीच्या दृष्टीने अमेरिकेच्या बाहेर इमर्जिंग अर्थव्यवस्था महत्वाच्या ठरत असून त्यात चीन, भारताचा समावेश हा फंड करतो आहे. 

पुढील २५ वर्षांचा विचार !

वर्क फ्रॉम होममुळे कार्यालयीन जागांची मागणी कमी होईल, असे वाटत असताना ही मागणी पुन्हा वाढेल, असे या फंडाला वाटते, असे दिसते. कारण भारतातील गुंतवणुकीची गरज व्यक्त करून ते थांबले नाहीत, तर टाटा समूह उभ्या करत असलेल्या व्यावसायिक रियल इस्टेट प्रकल्पात त्यांनी पाच हजार ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीरही केली. भारतात त्यांनी यापूर्वी बायजू, फ्लिपकार्ट, डिलेव्हरी आणि डेलीहंट अशा स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केलेली आहे. पेटीएममध्ये त्याच्या लिस्टिंगनंतर मोठी घसरण झाली असली तरी त्यात या फंडाने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यावरून हा फंड विचलित झाला नाही, कारण हा फंड दीर्घकालीन गुंतवणूक करतो. पुढील किमान २५ वर्षांचा विचार केला जातो, असे या फंडाचे म्हणणे आहे. चीनच्या ईकॉमर्स कंपन्यांमध्ये या फंडाने अधिक गुंतवणूक का केली आहे, हे आकडेवारीवरून लक्षात येते. चीनमध्ये ईकॉमर्स कंपन्या २७ ते २८ टक्के लोकसंख्येपर्यंत पोचल्या आहेत तर भारतात हे प्रमाण अजून केवळ ५.५ टक्केच आहे. याचा अर्थ आता भारतात वाढीला मोठी संधी असल्याने या फंडाचे लक्ष भारतीय ईकॉमर्स कंपन्यांकडे गेले आहे. भारतातील अपारंपरिक उर्जा म्हणजे सौर, पवन ऊर्जेकडेही या फंडाचे लक्ष गेले असून त्याने त्या क्षेत्रातील गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

 

हेही वाचा – Top 5 Investment Options : नियमित व सुरक्षित  मासिक उत्पन्नासाठी ५ गुंतवणूक योजना

 

भारतीय गुंतवणूकदारांना संधी 

विकसनशील देश या नात्याने भारतात असलेल्या संधी परकीय गुंतवणूकदार कशा हेरत आहेत, हे यावरून दिसते. सर्वाधिक विकासदर वाढ, लोकसंख्येचा लाभांश आणि त्यामुळे सतत असणारी मागणी, कोविडनंतर वेग घेत असलेली अर्थव्यवस्था तसेच अन्नधान्यासह एकूण निर्यातीचा वाढत असलेला वाटा.. या सर्वांचा परिणाम म्हणजे भारताची अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यात जगाचे लक्ष वेधून घेईल, अशीच सर्व चिन्हे दिसत आहेत. ही संधी जसे परकीय गुंतवणूकदार घेत आहेत, तशी ती भारतीय गुंतवणूकदारांनीही घेतली पाहिजे. ती घेण्याचा एक मार्ग आहे, जी नव्या काळात पुढे जाणारे उद्योग व्यवसाय आहेत, त्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे होय.  

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…