प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था

Reading Time: 3 minutes

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. 

आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.

भागीदारी संस्था (Partnership Firm):

व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती (जास्तीत जास्त वीस) एकत्र येऊन भागीदारी संस्था स्थापन करतात. या संस्थेची नोंदणी संस्था भागीदारी कायद्यानुसार केली जाते.

मर्यादित दायित्व भागीदारी (LLP): 

मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) हा भागीदारीचा नवीन प्रकार लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कायदा, २००८ पासून अस्तित्वात आला. हा प्रकार जुन्या भागीदारी संस्थेपेक्षा (Partnership Firm) वेगळा आहे.  

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी: 

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतीय कंपनी कायद्यातील तिसऱ्या कलमानुसार नोंदणीकृत केली जाते. यामध्ये सभासदांची संस्था मर्यादित असते (किमान २ व कमाल २००). यामध्ये सभासदांच्या शेअर्सच्या हस्तांतरावर मर्यादा असतात. यामध्ये व्यवसायासाठी आवश्यक असणारे भांडवल सभासद, त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या मदतीने गोळा केले जाते. 

पुढील तक्त्याच्या आधारे भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येतील. 

लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) भागीदारी संस्था (Partnership Firm) प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 
कायदा  लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट, २००८ नुसार नोंदणीकृत केली जाते.  भागीदारी कायदा १९३२

नुसार नोंदणीकृत केली जाते. 

कंपनी कायदा २०१३ नुसार कंपनी रजिस्ट्रारकडे नोंदणी केली जाते.  
स्थापना  एलएलपीच्या स्थापनेसाठी, प्रथम एलएलपीमार्फत नियुक्त केलेल्या २ भागीदारांपैकी भागीदार ओळख क्रमांक म्हणजेच Designated Partner Identification Number(DPIN) साठी अर्ज करणे आणि त्यातील एका भागीदाराने डिजिटल स्वाक्षरी तयार करून घेणे आवश्यक आहे. यामध्ये असा कुठलाही ठराविक नियम नाही.परस्पर संमतीने करार करून भागीदारी संस्था स्थापन करता येते. कंपनीच्या स्थापनेची पहिली पायरी म्हणजे प्रस्तावित कंपनीसाठी नाव निवडणे. नाव निश्चित झाल्यावर मग संचालक ओळख क्रमांक आणि डिजिटल स्वाक्षरीसाठी अर्ज करावा लागतो.
नोंदणी या संस्थेची नोंदणी कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाकडे केली जाते भागीदारी संस्थेची नोंदणी फर्मच्या रजिस्ट्रारकडे केली जाते. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी कंपनीच्या निबंधकांकडे (Registrar of companies) केली जाते.
दायित्व / जबाबदारी (Liability) एलएलपीमध्ये भागीदार आणि संस्था यांचे वेगवेगळे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असते. त्यामुळे भागीदारांची जबाबदरी (liability )कंपनीमध्ये गुंतविलेल्या रकमेएवढीच मर्यादित असते. भागीदारी संस्था व भागीदार या दोंघांचे स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व नसते.त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक व्यवहारासाठी सर्व भागीदार जबाबदार असतात. अनपेड भांडवलाच्या प्रमाणात मर्यादित
भागीदार / भागधारक  संख्या  किमान २ तर कमाल कितीही  किमान २ तर कमाल २०  किमान २ तर कमाल २०० 
अज्ञान भागीदार /भागधारक  अज्ञान व्यक्ती भागीदार होऊ शकत नाही.  अज्ञान व्यक्ती भागीदार होऊ शकते.  अज्ञान व्यक्ती भागीदार होऊ शकते.परंतु त्याचे अधिकार व कर्तव्य त्याच्या पालकांद्वारे पार पडली जातात. 
करार (Agreement) एलएलपी करार एलएलपीच्या ऑपरेशन, व्यवस्थापन आणि निर्णय घेण्याच्या पद्धती आणि इतर कामकाजावर नियंत्रण ठेवते. भागीदारी करार ऑपरेशन, व्यवस्थापन आणि निर्णय घेण्याच्या पद्धती आणि भागीदारीच्या इतर कामकाजावर नियंत्रण ठेवते. १. कंपनीच्या मेमोरंडममध्ये   कंपनीचे नाव नमूद केलेले असावे व त्यामध्ये “प्रायव्हेट लिमिटेड” या शब्दाचा समावेश असणं आवश्यक आहे. 

२ यासंदर्भात सर्व नियम कंपनी कायद्यामध्ये नमूद केलेले आहेत. 

शेअर्सचे हस्तांतरण व रूपांतरण (Transferability /Conversion) १. एलएलपीमधील सर्व भागीदारांच्या संमतीने समभाग दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात.

२. हस्तांतरण प्रक्रियेनंतर व्यक्ती भागीदार होऊ शकत नाही.

३. एलएलपी संस्था भागीदारी संस्थेमध्ये रूपांतरित करता येत नाही.  परंतु प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लिमिटेड कंपनीमध्ये रूपांतरित करता येऊ शकते.

१. सर्व भागीदारांच्या संमतीने समभाग दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जाऊ शकतात.

२. भागीदारी हस्तांतरणाची प्रक्रिया किचकट व मोठी आहे.

 

३. भागीदारी संस्थेचे एलएलपी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतर करता येऊ शकते. परंतु ही प्रक्रिया किचकट व कठीण आहे. 

१. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सहजपणे शेअर्सचे हस्तांतरण करता येत नाही.

२. कंपनी कायद्यामध्ये खासगी कंपन्यांची नावे, आर्टिकल ऑफ ओसीएशन, सदस्यांचा तपशील, समभागांचे हस्तांतरण इत्यादी संबंधित इतरही काही नियम देखील विहित केलेले आहेत.

अनुपालन (Compliance) कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाकडे वार्षिक परतावा दाखल करणे अनिवार्य आहे. कोणताही वार्षिक परतावा दाखल करण्याची आवश्यकता नाही. कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाकडे वार्षिक परतावा दाखल करणे अनिवार्य आहे.

 

भांडवल  किमान १ लाख पेड अप भांडवल
नोंदणी खर्च (Cost of registration) साधारणतः 

रु. ३०००/- त ५०००/-

साधारणतः 

रु. १५००/- ते ३०००/-

साधारणतः 

रु. ५०००/- ते ७०००/-

 

नोकरी करू की व्यवसाय?

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

श्रीमंतीची ‘वही’वाट

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा: फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.3]