Reading Time: 3 minutes

लोकसभेची निवडणूक व मुलांच्या शाळेची सुट्टी संपण्याची वेळ जवळपास एकच असल्यामुळे भारतीय पालक खऱ्या अर्थाने नव्या पर्वाला सुरुवात करीत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मतमोजणी संपवून नवनिर्वाचित सरकारची स्थापना झाली असून काही विदयार्थी शाळा बदलतात तसे काही खात्यांचे मंत्री बदलले गेले आहेत. या मंत्रिमंडळात लक्षवेधी नेमणूक झाली ती निर्मला सितारामन यांची. एका महिलेला प्रथमच १३५ कोटी सदस्यांच्या कुटुंबाचे अर्थहित सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा बहुमान त्या प्रत्येक भारतीय स्त्रीचा आहे जी कुटुंबाचे पालन पोषण करतांना कुटुंबाची आर्थिक रोजनिशी कमवित्या धन्यास न कळता सक्षमपणे हाताळत असते.

आता मुलांच्या शाळा सुरु होणार म्हणजे खर्चांना सुरुवात होणार. खरतर शिक्षणासाठी केलेला खर्च म्हणजे गुंतवणूक असली पाहिजे. परंतु सध्याच्या शैक्षणिक बाजारात ही गुंतवणूक कायम आर्थिक ताळेबंदाच्या तुटीकडे जात असल्यामुळे सगळेच पालक चिंतीत आहेत.

आज आपण बचतीच्या सवयी व उत्पन्नाची विभागणी या मुद्द्यांवर चर्चा करू.

बचतीच्या सवयी ढोबळपणे ४ प्रकारे नोंदविल्या जाऊ शकतात.

१. जेवढे उत्पन्न तेवढा खर्च – “विलासी” जीवनशैली:

 • या प्रकारात मिळणाऱ्या उत्पन्नाचे खर्चात रुपांतर करण्याकडे कल असतो.
 • उदा.नोकरीत बोनस अथवा व्यवसायात अतिरिक्त नफा झाल्यास चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याची योजना तयार असणे.

. त्पन्न कमी परंतु खर्च जास्त – “होऊ दे खर्च” जीवनशैली

 • या प्रकारात तुलनात्मक वृत्ती झळकत असते.या प्रकारातील लोक कायम कर्जात राहणे पसंत करतात.
 • उदा.ऐपत नसतांना पत मिरविण्यासाठी पात्रता नसलेल्या मुलांना महागडया शिक्षण संस्थांमधे प्रवेश घेणे.

वरील(१व२) प्रकारच्या सवयी “जो भी होगा देखा जायेगा” या बेफिकीर मानसिक वृत्तीतून तयार होत असतात. नियोजनाच्या अभावामुळे या प्रकारातील लोक लवकर नैराश्याच्या गर्तेत जाण्याची शक्यता जास्त असते.

. उत्पन्न आणि खर्च यांचा सुयोग्य मेळ – “आर्थिक शिस्तपालन” जीवनशैली

 • या प्रकारातील लोक मिळणाऱ्या उत्पन्नाचा स्त्रोत बघून खर्चांची आखणी करतात. यांना तणावमुक्त आर्थिक जीवनशैली मान्य असते.
 • उदा.हॉटेलचा खर्च परवडत नसल्यास भेळ-पाणीपुरी खाऊन तृप्त होतात.

४. उत्पन्नातून बचत करून खर्च करणे – “भविष्याचा वेध घेणारी” जीवनशैली

 • या प्रकारातील लोक वर्तमानात गरजेपुरता खर्च करून भविष्यात येणाऱ्या ध्येयांबद्दल योजना आखत असतात. याच गटातील लोकांना आपण कंजूष किंवा काटकसरी म्हणून हिणवत असतो. परंतु दीर्घकाळात हाच बचतकर्ता गुंतवणूकदार बनून त्याची “बकेट लिस्ट” पूर्ण करत असतो.

वरील(३व४) प्रकारातील लोक “या जन्मावर,या जगण्यावर शतदा प्रेम करावे” या जबाबदार मानसिक वृत्तीचे असतात. यांना सुरुवातीला नियोजन अथवा काटकसर करून भविष्यात आनंद घेण्यात रस असतो.

बचतीची तुमची “सवय” कुठली? एकदा पडताळून बघा.

आता आपण मासिक अथवा वार्षिक उत्पन्नाची विभागणी एका आर्थिक अभ्यासानुसार कशी असावी? याबाबत जाणून घेऊ.

यात देखील उत्पन्नाचा विनियोग ४ टप्प्यात केला आहे.

 1. घरखर्च – ३०%
 2. परतफेड – ३०%
 3. गुंतवणूक – ३०%
 4. वैयक्तिक – १०%

वरील ४ टप्प्यांचे थोडक्यात विश्लेषण पाहू.

 1. जर तुम्हाला दैनंदिन खर्च लिहून ठेवण्याची सवय असेल तर तुम्ही लवकरच “गुंतवणूकदार” बनू शकतात. नसेल तर अर्थखात्याची जबाबदारी मुलीला(असेल तर) दया. कदाचित तिच्यात देखील एखादी निर्मला दडलेली असेल. हि सवय म्हणजे आरशात स्वतःला पाहणे.कारण आरसा कधीच खोटं बोलत नाही. या सवयीचा चांगला परिणाम म्हणजे तुम्ही कुठे वायफळ खर्च करत नाहीत ना? हे माहित होण्यास मदत होते. म्हणजेच तुम्ही तुमच्या खर्चांवर नियंत्रण आणून बचत वाढवू शकतात.
 2. वरील सवय प्रामाणिकपणे आत्मसात केल्यास परतफेड किंवा गुंतवणूकीचे नियोजन करणे सोपे होईल.आज तुम्हाला देणी(उदा.कर्ज) असलेली यादी बनवा. त्यावर होत असलेली व्याज आकारणी व परतफेड होणारी रक्कम यांचा आढावा घ्या. शक्य तितक्या लवकर देणी संपवा. या सवयीचा फायदा तुम्हाला आरोग्यदायी व आनंदी जीवन जगण्यास मदत करेल.
 3. लहानपणी आपण पळण्याची शर्यत सुरु करण्यापूर्वी १,२ साडे माडे ३ असे म्हणून सुरु करायचो. ज्याचं लक्ष ध्येयाकडे असायचं त्याला सगळ्यात अगोदर ३ ऐकू येत असे. तीच शर्यत पुन्हा सुरु होण्यापूर्वी ३ ऐकण्याची सवय जोपासा.

वरील ३ टप्पे पार पाडायचे असतील तर तुम्ही स्वतःमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. यासाठी नव-नवीन गोष्टी शिका,तुमचे छंद जोपासा,स्वतःच्या मनोरंजनासाठी खर्च करा. कारण तुम्हाला सतत एक नवी ऊर्जा मिळणे गरजेचे आहे.

मुलांची शालेय वह्या – पुस्तके विकत घेतांना एक रोजमेळ नक्की विकत घ्या. रोजमेळ लिहिण्याचे असंख्य फायदे असतात. दूध – तेल – साखर – पेट्रोल यांचे आकडे तुम्हाला तुमचाच उत्पन्न व खर्च यांच्यातील फरक दाखवून महागाई निर्देशांक मोजायला मदत करतील.

सौ बका, एक लिखा… अशी म्हण उगाचच तयार झाली नसेल.

श्रीमंत होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आणि ती असण्यात काहीच गैर नाही. पण श्रीमंत होणे ही नुसती इच्छा न ठेवता ध्येय बनले तरच ते शक्य आहे. त्यासाठी श्रीमंतीची ‘वही’वाट गरजेची आहे.

बघा पटतंय का?

अतुल प्रकाश कोतकर

9423187598

(लेखक पूर्णवेळ आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी [email protected] वर संपर्क साधू शकतात.)

अर्थसाक्षरद्वारे प्रकाशित होणाऱ्या पुस्तक प्रकाशनाच्या कामात आम्हाला आपलं मोलाचं सहकार्य आवश्यक आहे.  यासाठी फक्त खालील लिंकला क्लिक करून त्यावरील फॉर्म भरून आम्हाला लेखांच्या निवडीसाठी मदत करा.

                  लिंक : http://bit.ly/Question_Form

(अधिक माहितीसाठी आम्हाला [email protected] वर संपर्क करा.)

घरगुती अर्थसंकल्पाच्या ८ महत्वाच्या स्टेप्स,

घरघुती अर्थसंकल्प आणि त्याची तयारी भाग १,

विवाहानंतरचे आर्थिक नियोजन ,

२०१९ साठी आर्थिक नियोजनाच्या ६ सोप्या स्टेप्स…

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.