Arthasakshar Characteristics of successful Investors
Reading Time: 2 minutes

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये-२

मागच्या लेखात आपण यशस्वी गुंतवणूकदाराची काही वैशिष्ठ्ये पाहिली. तोच धागा पुढे घेऊन जात, या लेखात आपण अशा आणखी काही मुद्द्यांचा विचार करणार आहोत. यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये कोणती? यशस्वी गुंतवणूकदार काय करावे? हा प्रश्न  जर तुमच्या मनात असेल तर, पुढील गोष्टी अवश्य करा –

यशस्वी गुंतवणूकदाराची वैशिष्ट्ये- भाग १

१. गुंतवणुकी आधीचा अभ्यास 

  • वॉरेन बफेट यांची जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ओळख आहे. 
  • जगभरातील लोक वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचे गुंतवणुकीबद्दलचे विचार, निकष आणि हातोटी याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. 
  • बफेट यांचे  “It’s far better to buy a wonderful company at a fair price than a fair company at a wonderful price.” हे ब्रीदवाक्य त्यांच्या बऱ्याच व्याख्यान आणि मुलाखतीत ऐकायला मिळते आणि तोच त्यांचा गुंतवणुकी बद्दलचा निकष आहे. 
  • गुंतवणुकीआधी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करण्याचा सल्ला बफेट देतात. कंपन्यांच्या जोखमीच्या बाबतीत बफेट सांगतात, “कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना आधी तिच्या गुणवत्तेपासून सुरुवात करा आणि एकदा का त्या कंपनीच्या गुणवत्तेची खात्री झाली की मगच तिच्या समभागांची किंमत आणि तिच्या योग्यतेचा विचार करा.”
  • समभागांची किंमत कितीही चांगली असली तरी जर कंपनीकडे गुणवत्ता नसेल, तर अशा व्यवहारातून केवळ नुकसानच हाती लागते.

राकेश झुनझुनवाल – भारतीय शेअर बाजारातील बादशाह

२.  शेअर बाजाराला काय अनुकूल आहे याचा अभ्यास करा

  • इतर कोणत्याही क्षेत्राप्रमाणे शेअर बाजारातही दिवसागणिक आमूलाग्र बदल होत असतात. 
  • बदलत्या काळानुसार तिथले निकष, निवडी आणि योजनाही बदलत असतात. त्यामुळे बदलत्या काळात बदलत्या नीती नियमांसोबत स्वतःला पुढे नेणे ही देखील काळाची गरज आहे. त्यामुळे शक्य तितकी पुस्तके, व्याख्याने किंवा धडे गिरवत गुंतवणुकीच्या नव्या आयुधांबद्दल स्वतःला अवगत करून घ्या. 
  • अभ्यासाला सुरुवात करताना या क्षेत्राच्या नियोजित माहितीपासून सुरुवात करत पुढे जाणे अधिक योग्य ठरेल, जेणेकरून संबंधित क्षेत्र आणि त्याच्याशी निगडित बाबींविषयी माहिती प्राप्त झाली की त्याला प्रत्यक्ष उतरवणे अधिक सोपे जाईल. 
  • या बाबतीत लक्षात ठेवण्यासारखा नियम असा की “If I cannot understand it, I will not invest in it.” 

गुंतवणूकदारांच्या ५ मूलभूत चुका

३. पूर्ण माहिती काढा

  • कोणत्याही नव्या ध्येयाकडे वाटचाल करताना त्याबद्दल अधिकाधिक माहिती, तिथवर पोहोचण्याचा नकाशा शोधून काढणे कधीही फायद्याचे ठरते. त्याने रस्ता तर सुकर होतोच पण ध्येयापर्यंत जाण्याचे योग्य नियोजन करता येते. तोच नियम शेअर बाजारातही लागू होतो. 
  • शेअर बाजारात गुंतवणुकीला सुरुवात करण्यापूर्वी केवळ इक्विटी मार्केटच नाही, तर बाजारच्या चढ-उताराचाही अभ्यास करणे फायद्याचे ठरते. 
  • त्यासंबंधी बरीचशी माहिती या क्षेत्रातले जाणकार पुस्तकात, इंटरनेटवर किंवा अगदी रोजघडीच्या बातम्यांमधूनही आपल्यापर्यंत पोचवत असतात. त्यासोबतच इतर अनेक नावाजलेले उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या मुलाखती किंवा व्याख्यानांमधूनही तुम्हाला बरीचशी माहिती उपलब्ध होऊ शकते. 

करिअरच्या सुरुवातीला गुंतवणूक करणे का आवश्यक आहे?

४.  दीर्घकालीन नियोजन करा

  • शेअर बाजार किती दोलायमान आहे हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे आजच्या घडीला जरी चांगली- वाईट काहीही परिस्थिती असली ती उद्या तशीच राहील याची शाश्वती देता येत नाही. 
  • केवळ काहीतरी ठराविक ध्येयनिश्चिती करून वाटचाल करताना आलेल्या संधीला नाकारणे हे जरी अयोग्य असले तरी बऱ्याचदा जर आपण आपल्या भावना नियंत्रणात ठेवल्या आणि शेअरच्या बाबतीत सारासार विचारांती निर्णय घेत त्यासंबधी दीर्घकालीन नियोजन केले, तर ते गुंतवणूकदारांसाठी अधिक फायद्याचे ठरू शकेल.

प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुंतवणूक करणे झाले अधिक सुरक्षित

web search – yashaswee Guntvnukadaranchi Vaishishtye, yashaswee guntvanukdaar kse hota yeil, yashaswee guntvnukdar honyasathi kaay karave? 

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimerhttps://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…