भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला!

Reading Time: 4 minutes भांडवल, तंत्रज्ञान आणि झुनझुनवाला! भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठे वैयक्तिक गुंतवणूकदार म्हणून…

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मर्यादित दायित्व भागीदारी (LLP) आणि भागीदारी संस्था (Partnership Firm)

Reading Time: 3 minutes स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटलं तर, व्यवसायाचे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. प्रत्येक प्रकारचे स्वतःचे असं वेगळं वैशिष्ट्य व फायदे तोटे आहेत. आजच्या लेखात आपण भागीदारी संस्था (Partnership Firm), मर्यादित दायित्व भागीदारी म्हणजेच लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणजे काय? त्यांची वैशिष्ट्ये, नोंदणी प्रक्रिया व कार्यपद्धतीची माहिती घेऊया.

कोरोना – रिझर्व बँकेकडून अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस

Reading Time: 2 minutes आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी २७ मार्च नंतर लगेचच २० दिवसांनी भारतीय अर्थव्यवस्थेस दुसरा बूस्टर डोस पाजला आहे. कोविड -१९ संकटाशी सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येतील असे यापूर्वीच आरबीआय कडून जाहीर करण्यात आले होते. यामुळे होणाऱ्या परिणामांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी ९० तज्ञाची कमिटी (war room) स्थापन करण्यात आली आहे. आज सकाळी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय व त्याचे परिणाम-

One Person Company: सर्वसामान्यांचे व्यावसायिक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारी एकल कंपनी

Reading Time: 3 minutes खाजगी मर्यादित कंपनी स्थापन करण्यास किमान दोन व्यक्तींची गरज असते. यासाठी व्यवसायात आपल्या मनाप्रमाणे भागीदार मिळणे हे सुयोग्य जीवनसाथी मिळण्याएवढे कठीण आहे. एकल कंपनीचे स्वतंत्र आणि कायदेशीर अस्तित्व मान्य  केल्याने त्यानुसार उपलब्ध सोई सवलती यांचा लाभ घेता येतो. व्यवसायवृद्धीकरिता याचा फायदा होतो. कराचा बोजा कमी होतो.

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग २

Reading Time: 2 minutes विना भांडवल व्यवसायाचे असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. परंतु अनेक वेळा हे काय करायचं? असं म्हणून या छोट्या पण चांगला नफा मिळवून देणाऱ्या व्यवसायांकडे दुर्लक्ष करतो. मॅक्डोनल्ड, पिझ्झा हट, डॉमिनोज यासारख्या फूड चेन किंवा मॉन्जिनीजसारख्या केक शॉपनी आज भारतातल्या छोट्या शहरातही आपले जाळे पसरायला सुरुवात केली आहे. फिटनेस, न्यूट्रिशन या क्षेत्रांतील व्यक्तींना मोठमोठे सेलिब्रिटी विशेष मान देतात. ऋजुता दिवेकर यांनी याच क्षेत्रात काम करून स्वतःचं करिअर घडवलं आहे. “कुठलंही काम सोपं नसतं आणि कमीपणाचंही नसतं.” जेव्हा ही गोष्ट तुम्हाला पटेल तेव्हा तुमच्या व्यावसायिक होण्याच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास सुरु होईल. 

विनाभांडवल व्यवसायाचे स्मार्ट पर्याय – भाग १

Reading Time: 3 minutes अगदी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांपासून ते निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांपर्यंत अनेकांना छोटासा का होईना पण व्यवसाय करायची इच्छा असते. तसंच, काहींना पर्यायी उत्पन्न म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरु करावा असं वाटत असतं. पण करायचं काय? त्यासाठी  लागणारं भांडवल कुठून आणायचं? असे अनेक प्रश्न समोर उभे राहतात. म्हणूनच या लेखात आपण वेगवेगळ्या व्यवसायांची माहिती घेणार आहोत ज्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज लागणार नाही व तुम्ही तुमची नोकरी सांभाळूनही  हे व्यवसाय करू शकता व त्यात यश मिळाल्यानंतर ते वाढवून यशस्वी व्यावसायिकही बनू शकाल. 

म्युच्युअल फंड क्या है? – भाग १

Reading Time: 4 minutes शेअर घेऊ की रोखे की कमोडीटी घेऊ याचा गुंतवणूकदाराने विचार करण्यापेक्षा पात्रताधारक फंड व्यवस्थापक गोळा झालेल्या रकमेचे नियोजन करत असतात. वैयक्तिक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडातील एकरकमी गुंतवणूक किमान १,००० रुपयांपासून तर मासिक गुंतवणूक किमान ५०० रुपयांपासून सुरु करू शकतो. काही फंड घराणी मासिक १०० रुपयांपासून देखील गुंतवणूकीची सुविधा देतात. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक रोकड सुलभ असून गरज पडल्यास विना थांबा तुम्ही काढू शकता. म्युच्युअल फंडा व्यतिरिक्त इतर गुंतवणूक साधनांमधे एकल जोखीम – एकल परतावा असे धोरण दिसून येते.