Arthasakshar Lockdown effects on crude oil
Reading Time: 2 minutes

कच्चे खनिज तेल खरेदी केल्याबद्दल खरेदीदाराला पैसे?

कोविड-१९ या महासंकटामुळे अनेक देश लॉकडाऊन झाल्याने वाहतूक मंदावली त्यामुळे मागणीत खूप मोठी घट झाली साहजिकच याचा परिणाम कच्या तेलाच्या (Crude Oil)  मागणीवर होऊन जगाच्या इतिहासात प्रथमच कच्या तेलाची वायद्यातील किंमत प्रति बॅरल शून्य डॉलरच्या खाली गेली. याचा अर्थ आता पेट्रोलियम पदार्थ फुकट मिळतील असा नसून जगभरात मंदीमुळे  मागणीत मोठी घट झाल्याने कच्चे तेल साठवून ठेवण्याची क्षमता संपली असून, आता हे उत्पादक ग्राहकांना कच्चे तेल नेण्याबद्दल पैसे देऊ करीत आहेत. 

पुन्हा एकदा सुरक्षित गुंवतणुकीकडे कल, पिवळ्या धातूची चमक कायम !

  • २० एप्रिल २०२० रोजी West Texas Intermediate (WTI) चा मे २०२० मधील वायदे करार प्रति बॅरल -$४०.३२ एवढा खाली जाऊन -$३७.६३ वर स्थिरावला. बेंट खनिज तेलाची जगभरातील विविध ठिकाणी असलेली साठवणूक क्षमता व तेथून सहज वाहून नेण्याची सोय उपलब्ध  असल्याने त्याचे भाव ९% ने घसरून प्रति बॅरल $२५.५७ वर स्थिरावले. 
  • आज २१ एप्रिल २०२० रोजी ब्रेंट कच्या तेलाची किंमत २५% ने कमी येऊन प्रति बॅरल $१९ झाली आहे. हा  गेल्या १८ वर्षातील नीचांक असल्याचे गार्डीयन या वृत्तपत्राचे म्हटले आहे. 
  • कच्चे तेल आणि त्यापासून मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा दर्जा हा American Petroleum Institute (API) ने ठरवून दिलेल्या  मानकानुसार त्याची घनता व त्यात असलेल्या गंधकाच्या प्रमाणावरून ठरवला जातो. 
  • WTI मध्ये गंधकाचे प्रमाण कमी ०.२४% असून ब्रेंट मध्ये हे प्रमाण थोडे जास्त म्हणजे०.३७%असते हे दोन्ही कमी घनता असलेले कच्या तेलाचे दर्जेदार प्रकार असून त्यांना गोड तेल (Sweet Oil) असे संबोधले जाते.

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

  • ब्रेंट तेलाची घनता WTI पेक्षा किंचित जास्त आहे. जगभरातील तेल उत्पादन करणारी राष्ट्रे यांची संघटना (The Organization of Petroleum Exporting Countries) म्हणजेच ओपेक सदस्य देश ब्रेंट खनिज तेलाची बाजारातील कच्या तेलाची आधारभूत किंमत समजतात जगभरातील ६७% कच्या खनिज तेलाचे तेल व्यवहार ओपेकच्या माध्यमातून होतात मध्यपूर्वेतील देश, युरोप, आफ्रिका येथे उत्पादित होते. तर ३३% व्यवहार WTI खनिज तेलाच्या माध्यमातून होतात यावर अमेरिकेतील खनिज तेलाचे भाव ठरतात.
  • जगभरातील घडामोडींचे विशेषतः अरब देशांतील घडामोडीचे परिमाम ब्रेंट खनिज तेलाच्या भावावर तुलनेने पटकन होतात. यातील व्यवहाराचे मुख्य वायदा केंद्र लंडनमधील Intercontinental Exchange (ICE) हे असून WTI खनिज तेलाच्या व्यवहाराचे मुख्य वायदा केंद्र New York Mercantile Exchange (NYMEX) आहे. 
  • ब्रेंच खनिज तेलाचे मूळ उत्पादन क्षेत्र उत्तर समुद्रातील शेटलेंड बेट व नॉर्वे असल्याने त्याच्या विहिरी समुद्रात असल्याने त्याचा साठा सागर किनाऱ्यावर असल्याने त्याची साठवणूक व वाहतूक स्वस्त व जलद होते. तर WTI खनिज तेलाचे उत्पादन क्षेत्र हे ते टेक्सास, लौशिअना, डकोबाचा दक्षिणेकडील डोंगराळ भागातील खनिज तेलाच्या खाणीमध्ये असल्याने तेथील साठवणूक क्षमता मर्यादित असून त्याची वाहतुक खर्चिक आहे.

कोरोना व्हायरसचा कमोडिटीजच्या किंमतीवरही मोठा परिणाम

  • भारत हा ओपेक सदस्य राष्ट्रांकडून खनिज तेल घेत असल्याने खनिज तेलाचे भाव कमी आल्यास आयात खर्च कमी होईल. कुलूपबंद परिस्थितीमुळे आपल्या मागणीवर परिणाम होऊन आपली मागणीही कमीच राहणार असून मागणीत वाढ झाल्यास त्यावरील कर वाढवून अर्थसंकल्पीय तूट आणि आकस्मित खर्चाची भरपाई करता येईल. आखाती देशांची अर्थव्यवस्था ही कच्या तेलावर अवलंबून असून ओपेकनेआपल्या उत्पादन क्षमतेत १०% घट करण्याचे ठरवले आहे. 
  • तेथे काम करणाऱ्या अनेक भारतीयांचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे. येथे काम करणारे ८० लाख लोक दरवर्षी ५० अब्ज डॉलर्स एवढी मोठी रक्कम भारतात पाठवतात. त्यामुळेच खनिज तेलाचे भाव कमी होऊन त्यांच्या नोकऱ्याही टिकून राहणे हे भारताच्या फायद्याचे आहे. 

(आधारित)

– उदय पिंगळे

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

UPI : युपीआय म्हणजे काय?

Reading Time: 2 minutes नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) निर्मिती…

गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड कशी करावी?

Reading Time: 3 minutes तुम्हाला गुंतवणूक करायची आहे आणि समजा एखाद्या व्यक्तीने ती पद्धतशीरपणे करून दिली…

शेअर बाजारात ६ गोष्टींपासून कायम राहा लांब !

Reading Time: 2 minutes कोरोनाच्या कालावधीत अनेक गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. पण काही गुंतवणूकदारांनी…