Reading Time: 2 minutes

कोव्हिड-१९ या आजाराचा विळखा वाढत जातोय, त्यामुळे अशा वातावरणात तीव्र झटका टाळण्यासाठी गुंतवणूकदार कमोडिटीजबाबत आक्रमक खेेळी करणे टाळत आहेत. सर्वच मोठ्या देशांनी अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी उपाययोजना केली असली तरी सर्व औद्योगिक कामकाज सुरळीत सुरु होण्यासाठी काही कालावधी लागेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतोय.

गेल्या काही काळात सोन्याचा भाव वेगाने वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गोल्ड फ्यूचर $1460/oz च्या (१६ मार्च २०२० रोजी ) निर्देशांकावरून $1750/oz (१६ एप्रिल २०२० रोजी) च्या आसपास पोहोचला. ही जवळपास २० टक्क्यांची वृद्धी आहे. एमसीएक्सवर १६ मार्च २०२० रोजी गोल्ड फ्यूचर ३८४००/१० ग्रामच्या खालील पातळीवर होते. १६ एप्रिल रोजी ते वाढून ४७,००० अंकांच्या पुढे गेले. यात सुमारे २२ टक्क्यांची वृद्धी दिसून आली.

कोरोना, कोसळणारा शेअर बाजार आणि सामान्य गुंतवणूकदार !

कॉमोडिटीजचे दर –

१. स्पॉट गोल्ड

  • गुरुवारी, स्पॉट गोल्ड सोन्याचे दर ०.११ टक्के वाढून $1717.7 प्रति औसांवर बंद झाले. एका महिन्याच्या लॉकडाउननंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. यामुळे बाजारपेठेच्या भावनांना प्रोत्साहन मिळाले असून सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेची मागणी कमी झाली.
  • तथापि, कोरोनामुळे जगभरात २ दशलक्षहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून १,३६,६६७ जणांचा मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे जागतिक मंदीची चिंता वाढत आहे. परिणामी सोन्याच्या किंमतीही नियंत्रणातआहेत.
  • सोन्याच्या दरात वृद्धी म्हणजे गुंतवणूकदारांना जगातील प्रत्येक धातूच्या तुकड्याची महत्वाकांक्षा असते. मात्र प्रत्यक्षात ते असे करू शकत नाही. पण फ्यूचर ट्रेंडिंग/ इन्व्हेस्टमेंटद्वारे ते ही क्रिया करतात.
  • अनिश्चिततेच्या वेळी सुरक्षित मार्गाची निवड करावी लागल्याने गुंतवणूकदार हैराण आहेत. सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार पिवळ्या धातूकडे पहात आहे.

२. स्पॉट सिल्व्हर

  • स्पॉट सिल्व्हर किंमती ०.९४ टक्क्यांनी वाढून $ १५.६ प्रति औसांवर बंद झाल्या. तर एमसीएक्सचे दर ०.५१ टक्क्यांनी वाढून ४४, २५५ रुपये प्रति किलोवर बंद झाले.

दिवस असे की कोणी माझा नाही….

३. कच्चे तेल 

  • ओपेक प्लस देशांनी उत्पादन कपात केल्याने आणि अमेरिकेने किंमतींना आधार दिल्याने गुरुवारी, कच्च्या तेलाच्या किंमती $१९.९ प्रति बॅरलवर आल्या. असे असले तरी लॉकडाउनमुळे औद्योगिक कामकाज बंद आहे, त्यामुळे तेलाच्या किंमतींवर याचा परिणाम होत आहे. 
  • ओपेक आणि सदस्य राष्ट्रांनी तेलाचे उत्पादन काही काळासाठी दररोज १९.५ दशलक्ष बॅरलनी कमी करण्याचे ठरवले आहे. 
  • मार्च २०२० मध्ये तेलाच्या किंमती १८ महिन्यांमध्ये सर्वात कमी झाल्या होत्या, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्या. विविध देशांनी लॉकडाउन जाहीर केल्याने औद्योगिक मागणी घटली, त्यामुळेही तेलाच्या किंमती प्रचंड प्रमाणात घसरल्या असल्याचे श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. मंदीच्या चिंतेनेही तेलाच्या किंमतींवर परिणाम झाला. तथापि, ओपेक प्लस समूहाने उत्पादन कपातीचा घेतलाला निर्णय तसेच अमेरिकेतील उत्पादन कपात केल्यामुळे तेलावरील संकट काही प्रमाणात कमी झाले आहे.

लॉकडाऊन व अर्थव्यवस्थेतील अपरिहार्य बदल

४. बेस मेटल

  • लंडन मेटल एक्सचेंजमधील बेस मेटलच्या किंमती मात्र  दोलायमान दिसल्या. 
  • औद्योगिक धातूंची मागणी कमी झाल्याने जागतिक मंदीची शक्यता आदी चिंता बाजारासमोर आहेत. 
  • चीनमधील काही सकारात्मक आर्थिक डेटामुळे धातूंच्या किंमतींना आधार मिळाला. तथापि उर्वरीत जगात औद्योगिक कामकाज बंद असणे हे आर्थिक घसरणीचे संकेत असून यामुळे धातूंच्या मागणीत मोठी घट होत आहे.
  • गुरुवारी, एलएमई कॉपरचे दर ०.५६ टक्क्यांनी वाढून प्रति टन ५१४० डॉलरवर बंद झाले. चीनच्या सकारात्मक आकडेवारीमुळे रेड मेटलच्या किंमतींना दिलासा मिळाला. 
  • एलएमई व्हेरिफाइड वेअरहाउसमधील कॉपर इन्व्हेंटरी लेव्हल २०२० च्या सुरुवातीला आघाडीच्या धातूच्या मागणीत घट झाल्याचे दर्शवते.

गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील प्रगल्भ विश्वास

अनिश्चित काळात गुंतवणूक सोन्याकडेच कलणार यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती $१८५०/ औंसपर्यंत वाढू शकतात. तर एमसीएक्स फ्यूचर्समध्ये सोन्याच्या किंमती ५० हजार रुपये/१० ग्रामच्या निर्देशांकाकडे वाढू शकतात. बाजार लवकरच ही उंची गाठेल, अशी अपेक्षा आहे.

– श्री प्रथमेश माल्या 

प्रमुख विश्लेषक -कमोडिटीज व चलन

एंजल ब्रोकिंग लिमिटेड

अर्थसाक्षरचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लीक करा- 

https://play.google.com/store/apps/details?id=com.arthasakshar&hl=en

Disclaimer:आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घ्या –https://arthasakshar.com/disclaimer/ 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…