Mock Trading Stock Simulator
Reading Time: 3 minutes

Mock Trading & Stock Simulator

आजच्या लेखात आपण शेअर बाजारातील मॉक ट्रेडिंग आणि स्टॉक सिम्युलेटर (Mock Trading & Stock Simulator) या दोन महत्वपूर्ण संकल्पनांची माहिती करून घेणार आहोत. एखाद्या शनिवारी तुम्ही सहज बिझनेस चॅनल लावता किंवा आपले ब्रोकरकडील ॲप उघडून पाहता तेव्हा तुम्हाला बाजार चालू असल्यासारखे दिसते, काय बरं आहे आज? आज तर लक्ष्मीपूजन नाही मग आज मार्केट चालू कसे, म्हणून तुम्ही आश्चर्यचकित होता. अधिक माहिती मिळवल्यावर तुम्हाला समजते की आज मॉक ट्रेडींग आहे. 

हे नक्की वाचा: Freak Trade: विचित्र व्यापार उडवी हाहाकार

मॉक ट्रेडींग (Mock Trading) –

 • मॉक हा शब्द Multiple Option Checking याचे संक्षिप्त रूप आहे. दर महिन्याच्या कोणत्याही एका शनिवारी सर्व एक्सचेंजेस कडून असे विशेष ट्रेडिंग सेशन घेण्यात येते. याद्वारे दलालांना आपली ट्रेडिंग यंत्रणा व्यवस्थित काम करीत आहे याची तपासणी करता येते. 
 • याच सेशनमध्ये यंत्रणेतील बदल, नवीन प्रॉडक्ट, पूर्वीच्या यंत्रणेतील सुधारणा, संकटमोचक यंत्रणा यांची तपासणी करण्यात येते. 
 • इक्विटी, इक्विटी डेरीव्हेटिव्ह, कमोडिटी डिरिव्हेटिव्ह,करन्सी डिरिव्हेटिव्ह या सर्वप्रकारात ते घेतले जाते. 
 • येत्या वर्षभरात ते नेमके कोणत्या तारखेस घेतले जाईल ते एक्सचेंजकडून आधी जाहीर केले जाते व त्याच वेळात घेतले जाते बहुदा ही चाचणी पहिल्या किंवा दुसऱ्या शनिवारी घेतली जाते.
 • स्क्रीनवरील भावात पडणाऱ्या फरकानुसार आपल्या पोर्टफोलिओच्या मूल्यात कमी अधिक फरक पडतो. 
 • गेल्या चार वर्षांत चालू बाजारात एक्सचेंज बंद पडण्याची एक मोठी घटना आणि चौदा किरकोळ घटना घडल्या यामुळे गुंतवणूकदार विशेषतः ट्रेडर्स लोकांचे नुकसान झाले. 
 • अशा घटना वारंवार घडल्यास लोकांचा या यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होऊ शकतो. सर्वांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा यासाठी उपलब्ध यंत्रणा दोषराहित व्हावी त्याच्याकडून त्वरित प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा असते. 
 • ही चाचणी ठरवलेल्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 3:30 यावेळात घेतली जाते. 
 • नियमित व्यवहाराप्रमाणेच हे चाचणी व्यवहार नोंदवून पुढील कामकाज दिवसापूर्वी उलट करून ते व्यवहार होण्यापूर्वीच्या स्थितीत पुन्हा आणले जातात. 
 • ज्याप्रमाणे आपण व्यवहार करण्यास सक्षम आहोत की नाही याची एक्सचेंज नियमित तपासणी करते, त्याचप्रमाणे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणूकज्ञानाची त्याला माहिती असलेल्या तंत्रांची तपासणी पेपर ट्रेड करून करत असतात. 
 • यातील भाव अधिक अचूक नसल्याने ते जवळपास अंदाजे गृहीत धरावे लागतात.

महत्वाचा लेख: Speculators, Hedgers and Arbitrageurs: सट्टेबाज, व्दैध व्यवहार रक्षक आणि संधीशोधक 

स्टॉक सिम्युलेटर (Stock Simulator) –

 • गुंतवणूकदारांना असे ट्रेड करण्याचा सराव होण्यासाठी अनेकांनी काही आभासी रक्कम देऊन खराखुरा बाजारभाव (Real time market rate) दर्शवून ती रक्कम गुंतवणूक करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याला स्टॉक सिम्युलेटर असे म्हणतात, याचा वापर करून गुंतवणूकदार विविध प्रयोग करून पाहू शकतात व नवीन पद्धतीची तपासणी करू शकतात. 
 • पेपर ट्रेडिंगचीच ही सुधारित आवृत्ती आहे, खोटे खोटे पैसे आणि भाव खरे त्यामुळेच तुमचे नियम गृहीतके बरोबर आहेत ना? हे पारखून घेता येते. 
 • अशी सेवा देणाऱ्या यात मोबदला घेऊन अथवा विनामूल्य दोन्ही प्रकारचे पर्याय असून ग्राहकाने नोंदणी केल्यावर 1 लाख ते 1 करोड आभासी पैसा दिला जातो ते पैसे आणि उपलब्ध करण्यात येणारी खरी माहिती याचा वापर करून आपण गुंतवणूक करू शकता तुमचा आत्मविश्वास वाढला की खऱ्या पैशांचा वापर करून खरीखुरी गुंतवणूक करू शकता.

स्टॉक सिम्युलेटरचे फायदे-

 • डी मॅट, ट्रेडिंग खाते उघडायची जरूरी नाही, कोणत्याही ओळख निवासी पुराव्याची जरूरी नाही.
 • पैशांची जरूरी नाही अनेक विनामूल्य प्लँटफॉर्म उपलब्ध आहेत.
 • खराखुरा बाजारभाव उपलब्ध झाल्याने वेगवेगळ्या शक्यता आजमाऊन पहाता येतात.
 • पैसे न गमावता ट्रेडिंग प्रॅक्टिस करता येते.
 • चूका करण्याची, धोका बिनधोक आजमावून पहायची संधी. 

स्टॉक सिम्युलेटरचे तोटे-

 • वापरलेले पैसे खोटे असल्याने व्यवहारातील खऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता.
 • व्यवहार त्यातील नफातोटा लवकर निरस वाटण्याची शक्यता.

असे असले तरी सराव करण्याच्या दृष्टीने हे प्लॅटफॉर्म उपयुक्त आहेत. जे बाजारात नवीन आहेत त्यांना आपल्या संकल्पना बिनभांडवली पडताळता येतील. ते अधिक आकर्षित करण्यासाठी यातील दैनिक, साप्ताहिक, मासिक विजेते, विविध विभागातील अधिक नफा मिळवणाऱ्या विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे मिळवण्याची संधी सर्वांना उपलब्ध आहे. 

विशेष लेख: Trading Strategies: ट्रेडिंग आणि त्याचे प्रकार  

काही महत्वाचे प्लँटफॉर्म –

ट्रेकइनवेस्ट– 

 • नवोदित गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म, विविध 
 • ऑर्डर्स टाकणे, चार्ट बनवणे मुळातून शिकण्याची सोय. 
 • तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सल्ला आणि अभ्यासासाठी विविध व्हिडीओ याशिवाय गुंतवणूक विषयक अधिक सखोल मार्गदर्शन.

मनीभाई – 

 • moneycontrol.com यांच्याकडून गुंतवणूकदारांना उपलब्ध लोकप्रिय सिम्युलेटर. 
 • मोबाईल नंबर, फेसबुक, गूगल किंवा ई मेल वरून  येथे खाते काढता येणे शक्य. 
 • शेअर कमोडिटी डिरिव्हेटिव्ह व्यवहार शक्य, 
 • आभासी ब्रोकरेज घेतले जाते. 
 • अन्य आभासी गुंतवणूक पर्याय उपलब्ध. 
 • सर्व प्रकारचे व्यवहार करता येणे शक्य. 
 • कधीही बाहेर पडून पुन्हा सुरुवात करता येणे शक्य.

दलाल स्ट्रीट इनवेस्टमेंट जर्नल – 

 • मुंबई शेअर बाजाराच्या सहकार्याने रियल टाइम व्यवहार करता येणारा मंच, 
 • विविध स्पर्धा, रोज आकर्षक बक्षिसे, समविचारी मंडळींचा गट बनवण्याची सोय.

मनीपॉट- 

 • नवोदित, अनुभवी व्यक्ती, कॉर्पोरेट यांना शेअरबाजार व्यवहार शिकण्यास उपयुक्त. 
 • अनेक कॉर्पोरेट गुंतवणूकदार त्याच्या स्टाफला ट्रेनींग देण्यासाठी याचा वापर करतात. 
 • स्टॉप लॉस लावण्याची सवलत येथून मिळत नाही.

चार्टमंत्रा- 

 • हा एक स्टॉक सिम्युलेटर गेम असून तो खऱ्याखुऱ्या बाजारासारखा आहे.  
 • तुमच्या खऱ्या खात्याशी जोडलेल्या सर्व सोई सवलती यावर मिळतात. 
 • आभासी पैसे 1 लाख रुपयेच खातेदारास दिले जातात.

यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. काही प्लॅटफॉर्मवर परदेशी बाजारातील, क्रेप्टो करन्सीमधील गुंतवणूक संधी आजमावण्याची सोय आहेत. शिकण्याची इच्छा असलेल्यांनी ते पहावे, समजून घ्यावे आणि आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्यांचा फायदा करून घ्यावा. 

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Mock Trading & Stock Simulator in Marathi, Mock Trading & Stock Simulator Marathi Mahiti, Mock Trading in Marathi, Mock Trading Marathi Mahiti,  Stock Simulator in Marathi, Stock Simulator Marathi Mahiti 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…