Trading Strategies
Reading Time: 2 minutes

Trading Strategies

शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग हा शब्द अतिशय महत्वपूर्ण आहे. आजच्या लेखात आपण ट्रेडिंगचा विविध प्रकारांची (Trading Strategies) माहिती घेऊया.  ट्रेडिंग करणे म्हणजे व्यापार करणे होय. शेअर बाजारामधील शेअर्स, बॉण्डस, युनिट, इंव्हीट, रिट्स यांचे तसेच त्यांचे वेगवेगळे इंडेक्स त्यातील एफएनओचे (FNO) व्यवहार पूर्ण करण्याच्या क्रियेला ट्रेडिंग म्हटले जाते. तरीही तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने जे व्यवहार केले जातात त्यांना ट्रेडर्स म्हणतात. गुंतवणूकदार अशा ट्रेडर्सना कमी दर्जाची वागणूक देतात. शेअर बाजारात वेगवेगळ्या स्वरूपात भांडवलाची देवाण घेवाण होते. प्राथमिक बाजारातून उद्योजक, सेवा पुरवठादार यांना भांडवल मिळते तर गुंतवणूकदारांना व्यवसायात मालकी हक्क मिळतो झालेल्या तोट्याची जबाबदारी त्यांच्यावर नसते तर या दुय्यम बाजारातुन गुंतवणूकदारांना भांडवलाचा पुरावा म्हणून मिळालेल्या मालमत्तेची विक्री करता येते. त्यामुळे गुंतवणुकदार, ऐसेट मॅनेजमेंट कंपन्या, बँका, बँकेतर वित्तीय संस्था, विमा कंपन्या, पेन्शन फंड, विदेशी वित्तसंस्था यांना गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध होतात. 

हे नक्की वाचा: शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे? मग हे नक्की वाचा

Trading Strategies: ट्रेडिंग व्यवहाराचे पाच प्रमुख प्रकार –  

१. स्काल्प ट्रेडिंग (Scalp Trading) 

 • हा ट्रेडिंग मधील महत्वाचा प्रकार आहे. यामध्ये ट्रेडिंग खुप जलद म्हणजे शेअर्स खरेदी केल्यापासून काही सेकंदात किंवा काही मिनिटांच्या आत विकले जातात. 
 • यासाठी चार्टचा वापर केला जातो व योग्य स्टॉपलॉस लावला जातो. 
 • अतिशय सावधतेने पण जलद गतीने ऑर्डर्स टाकल्या जातात. यासाठी काही सॉफ्टवेअर्सची मदत घेतली जाते.

२. इन्ट्रांडे ट्रेडिंग (Intraday Trading) 

 • इन्ट्रांडे ट्रेडिंग म्हणजे खरेदी/ विक्री  केल्यापासून काही मिनिटे ते काही तासात परंतू त्याच दिवसात ठरलेल्या वेळेत शेअर विक्री/ खरेदी करणे. यालाच डे ट्रेडिंग असेही म्हणतात. 
 • हा ट्रेडिंगचा प्रकार सर्वात लोकप्रिय आहे कारण कमी पैशाने ब्रोकरकडून अधिक रकमेचे व्यवहार करण्याची परवानगी मिळते त्यामुळे अधिक उलाढाल पर्यायाने अधिक फायदा किंवा तोटा होण्याची शक्यता असल्याने त्याकडे लोक जास्त आकर्षित होतात. 
 • या ट्रेडिंगमध्ये अधिक धोका असल्यामुळे नविन लोकांनी पूर्ण अभ्यास करुनच असे व्यवहार करावे.

 ३. स्विंग ट्रेडिंग (Swing Trading ) 

 • स्विंग ट्रेडिंग म्हणजे शेअर्स खरेदी केल्यापासून ते शेअर्स काही दिवसांसानी अथवा आठवड्यात विकणे यामध्ये ट्रेडिंग रिस्क कमी असते. 
 • स्विंग ट्रेडिंगमुळे कमी कालावधीत पाच ते दहा टक्के परतावा मिळावा हेतु असतो.असे शेअर शोधून काढणे हे कौशल्याचे काम आहे. 

विशेष लेख: शेअर बाजारातील विक्रेत्यांची मानसिकता

४. पोजीशनल ट्रेडिंग (Positional Trading) 

 • पोजीशनल ट्रेडिंग (Positional Trading)मध्ये आपण खरेदी केलेले शेअर्स काही महिने ते जास्तीत जास्त एक वर्षाच्या कालावधीत विकले जातात. 
 • या ट्रेडिंगसाठी आपणास तांत्रिक (Technical) व मूलभूत (Fundamental) ज्ञान असणे आवश्यक आहे.

५. बीटीएसटी एसटीबीटी ट्रेड (BTST- STBT Trading) 

 • बीटीएसटी एसटीबीटी ट्रेडमध्ये शेअर्स आज खरेदी उद्या विक्री किंवा आज विक्री उद्या खरेदी या पद्धतीने व्यवहार करता येतात. 
 • असे व्यवहार मर्यादित शेअर्समध्ये करता येत असल्याने ते कोणत्या शेअर्समध्ये करता येतील यांची माहिती व्यवहार करण्यापूर्वी ब्रोकरकडून घ्यावी.

या सर्व पद्धतींशीवाय दीर्घकाळ गुंतवणूक (Long Term Investment) करणे हा व्यवहारही  तांत्रिकदृष्ट्या ट्रेंडिंगच आहे. यांना ट्रेडर न म्हणता गुंतवणूकदार असे म्हटले जाते. आयकर कायद्यानुसार एक वर्षांहून अधिक काळ केलेली गुंतवणूक दीर्घकाळ समजली जाऊन त्यातून होणाऱ्या एक लाख रुपये  नफ्यावर कर नाही तर त्याहून अधिक नफ्यास १०% या विशेष दराने करआकारणी होते. अशा गुंतवणुकीतून दिर्घकाळात अल्प गुंतवणुकीतून बोनस शेअर, डिव्हिडंड मिळून भरघोस फायदा झाल्याची उदाहरणे आपण वाचतो अशा व्यक्तींचे प्रमाण अल्प आहे सर्वसाधारण व्यक्ती इतक्या संयमतेने भरपूर फायदा दिसत असताना मोह टाळू शकत नाही. या शिवाय यामुळे भरपूर फायदा गमावून नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे आहेत तेव्हा आपल्या गुंतवणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून त्याचा आढावा घेऊन गुंतवणुकीबाबत निर्णय घ्यावा.

शरद गोडांबे

9657980309

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Web search: Trading Strategies in Marathi, Trading Strategies Marathi Mahiti, Trading Strategies Marathi, Trading Strategies mhanaje kay?

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…