Reading Time: 3 minutes
  • राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) ही PARDA यांनी प्रवर्तित केलेली अत्यल्प व्यवस्थापन फी असलेली पेन्शन योजना आहे. जर आपण त्याचे सदस्य असलात तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एका चुटकीसरशी आपणास आपल्या खात्यासंबंधीची माहिती मिळू शकते.
  • पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (PFRDA) यांनी नुकतेच एक नवीन अँप तयार केले आहे. गुगल प्ले स्टोअर आणि अँप स्टोअरवर ते उपलब्ध आहे.
  • या अँपच्या साहाय्याने खातेदारांस आपल्या खात्यासंबंधी सर्व अद्ययावत माहिती एन.पी.एस चे रेकॉर्ड किपर NSDL CRA च्या संकेतस्थळाचा लॉग इन आय डी व पासवर्ड वापरून मिळू शकते. हे अँप गुंतवणुकांदाराना हाताळायला सोपे (users friendly) असून अँड्रॉईड सिस्टीम असलेल्या सर्व मोबाईलमध्ये चालते.
  • हे अँप डाऊनलोड करून क्लिक केल्यावर एन.पी.एस चे सांकेतिक चिन्ह (logo) असलेले पेज येईल. त्याच्या खाली ‘लॉग इन (Log in)’ आणि ‘कोंट्रिब्युशन (Contribution)’ हे पर्याय दिसतील. त्यांच्या मधोमध हिंदी असे लिहलेले असून त्यावर क्लिक केल्यास पेजची भाषा हिंदी होईल. याखालीच तीन वर्तुळाकार गोल असून यातील पहिल्या गोलावर क्लीक केले की ‘नवीन रजिस्ट्रेशन’ करता येते. यातील ‘लॉग इन आय डी’ हा तुमचा एन.पी.एस. खातेक्रमांक असून पासवर्ड CRA च्या वेबपेजचा असेल. येथे आपणास नवीन पासवर्ड तयार करता येईल. याप्रमाणे पासवर्ड तयार केलात की आपण लॉग इन करू शकाल. या शेजारील एक गोल तुम्हाला पेन्शन किती मिळेल हे सांगेल तर दुसरा गोल आपणास उतारा किती मिळत आहे हे दाखवून देईल.
  • येथे आपण आपला लॉग इन आय डी (म्हणजेच आपला NPS खातेक्रमांक) आणि पासवर्ड टाकणे जरुरीचे असून येथेच नवीन पासवर्ड तयार करता येईल. येथे लॉग इन न करता ‘कोंट्रिब्युशन (contribution) हा पर्याय निवडल्यास आपला खातेक्रमांक व जन्मतारीख याची विचारणा करण्यात येईल. त्याची खात्री करून द्यावी लागेल. ती करून दिली की सर्व गोष्टी बायपास करून आपणास Tier I किंवा II खात्यात विविध पर्याय वापरून थेट गुंतवणूक करता येईल.
  • लॉग इन केल्यावर होम पेज उघडेल. येथे उजवीकडे होम, अकाउंट डिटेल्स, प्रोफाइल सेटिंग आणि लॉग आऊट या क्रमाने आयकॉन आहेत. यातील होम आयकॉनवर योजनेतील एकूण गुंतवणुकीचे एकत्रित मालमत्ता मूल्य दिसेल. ते Tier I आणि Tier II असे स्वतंत्ररीत्या पहायची सोय आहे.
  • त्याशेजारील आयकॉनवर क्लिक केले असता आपल्या खात्याचा तपशील समजतो जसे नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल क्रमांक, स्थायी पेन्शन खाते क्रमांक (PRAN), आपली वैयक्तिक खाते माहिती आणि यासंबंधीत तक्रारीची स्थिती हे सर्व समजेल.
  • त्याशेजारी असलेला आयकॉन प्रोफाईल सेटिंगचा असून आपणास येथून कॉन्टॅक्ट डिटेल्स म्हणजे मोबाइल क्रमांक व मेल आय डी बदलता येईल. तसेच सुरक्षितता म्हणजेच आपला पासवर्ड आणि सुरक्षिततेचा प्रश्न बदलता येईल.
  • त्याच्या शेजारी लॉग आऊट असून येथून बाहेर पडता येईल. उजव्या बाजूस तेथे डाव्या वाजूस असलेल्या तीन रेषावर क्लीक केले असता अँपमध्ये प्रवेश होऊन स्क्रीनशॉट मध्ये दाखवल्या प्रमाणे होम, अकाउंट डिटेल्स, कोंट्रिब्युशन, रिसेंट कोंट्रिब्युशन, स्कीम चेंज, ऍड्रेस चेंज,प्रोफाईल सेटिंग,नोटिफिकेशन, टियर II  विथड्रावल, इन्कवायरी आणि ग्रीव्हसेस यासारखे विविध पर्याय येतील.
  • या अँपचा वापर आपण खालील कारणासाठी करू शकतो.
    • आपल्या खात्याची शिल्लक पाहणे.
    • आपल्या खात्यावरील उलाढालीची नोंद आपल्या मेलवर पाठवण्याची विनंती करणे.
    • Tier-I आणि Tier-II खात्यात रक्कम भरणे.
    • योजनेचा प्राधान्यक्रम बदलणे.
    • आधार क्रमांक खात्यास जोडणे
    • पत्यात बदल करणे
    • Tier II खात्यातील रक्कम काढून घेणे.
    • आपल्या खात्याची पूर्ण माहिती पाहणे.
    • शेवटचे ५ व्यवहार पहाणे.
    • मोबाईल क्रमांक ईमेल मधील बदल नोंदवणे.
    • पासवर्ड, कळीचा प्रश्न बदलणे.
    • ओटीपी चा साहाय्याने पासवर्ड बदलणे.
    • एन.पी.एस संबंधित बदलांची नवनवीन माहिती मिळवत राहणे.

एन.पी.एस ही स्वतंत्र योजना असून याविषयीची सर्व माहिती आपण यापूर्वीच्या लेखात करून घेतली आहेच. यावरील गुंतवणुकीवर योजनेच्या अखेरीस काही प्रमाणात  कर लागत असल्याने तसेच यातून किती परतावा मिळेल याची हमी नसल्याने त्यातून भविष्यात १५% हुन अधिक परतावा मिळाला तरच ही योजना फायदेशीर ठरेल, असे होइल की नाही ते येणारा काळच ठरवेल. तूर्तास या योजनेस मिळणारी ५० हजाराची ८०/CCD (१B) अनुसार अधिकची करसवलत त्यातून सर्वाधिक करदेयता असणाऱ्या व्यक्तींचा वाचू शकणारा १५ हजार रुपयांचा कर एवढेच आकर्षण आहे.

©उदय पिंगळे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Gc3de8 )

सुकन्या समृद्धी योजना – भाग १ , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये ,  सुकन्या समृद्धी योजना – भाग ३  आयुष्यमान भारत योजना, आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?

(Disclaimer: येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरते निगडीत विविध माहितीचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. अधिक माहितीसाठी  https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…