Reading Time: 2 minutes

आजच्या काळात कोणावर कुठलं संकट येईल सांगता येत नाही, त्यामुळे व्यक्तीला बरेचदा आर्थिक मदत हवी असते. त्यामुळे ‘पर्सनल लोन’ची अनेकांना गरज पडते. पर्सनल लोनसाठी बँकेकडे अर्ज करावा लागतो. पण तो अर्ज मान्य होण्यास काही अटींची पूर्तता होणे गरजेचे असतं. त्यात काही चुका निदर्शनास आल्यास वैयक्तिक कर्ज  नाकारले जाते. यामुळे वेळेवर अडचण निर्माण होऊ शकते. वैयक्तिक कर्ज नाकारले जाऊ नये म्हणून काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे.

१. अपुरे उत्पन्न :

  • कर्ज मंजुर करण्यापूर्वी बँक प्रथम अर्जदाराचं मासिक उत्पन्न तपासतं.
  • मासिक उत्पन्न आणि मासिक खर्च याचं गुणोत्तर बघितलं जातं. यावरूनअर्जदाराची कर्ज परत करण्याची पात्रता तपासली जाते.
  • मासिक उत्पन्न सामान्य असेल आणि खर्चही तुलनेने जास्त असेल तर कर्ज मंजूर होण्यास अडचण निर्माण होऊ शकते.
  • अश्यावेळी अर्जदाराने कमी मासिक हप्त्यांचा पर्याय घ्यावा. यामुळे कमी रकम जास्त काळासाठी भरावी लागेल.  
  • यामध्ये ‘सेल्फ एम्प्लॉईड’ व्यक्ती म्हणजे जी फ्री लांस किंवा बिझनेस करत असेल म्हणजे ज्याची मासिक उत्पन्नाची रक्कम पक्की ठरलेली नसते त्यांना पर्सनल लोन मिळण्यास जास्त अडचण येते.

२. पूर्वीचे कर्ज मर्यादेपेक्षा जास्त असणे :

  • कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्ज देणारी बँक अर्जदारावर आधीच कुठले कर्ज आहे का याची पडताळणी करते. समजा अर्जदाराने पुर्वी काही कर्ज घेतलं असेल, त्याचे हप्ते भरणं सुरूच असतील आणि अर्जदाराचे उत्पन्न नवीन कर्जाचे हफ्ते फेडण्यास कमी पडत असेल तर नवं कर्ज नामंजूर होण्याची शक्यता असते.
  • अर्जदाराचं मासिक उत्पन्न , त्याने घेतलेलं कर्ज आणि त्याचे चुकवायचे मासिक हप्ते याचं गुणोत्तर करतो याला फॉइर  (FOIR) म्हणतात.
  • फॉइर पन्नास किंवा त्याहून जास्त असल्यास अश्यावेळी कर्ज नामंजूर होऊ शकतं.
  • यामुळे कमी मासिक उत्पन्न असता एकावेळी अनेक कर्जासाठी अर्ज करू नये.

३. पूर्वी कर्ज नामंजूर झालं असणं:

  • पूर्वी बँकेकडून कर्ज नामंजूर झालं असल्यास दुसरा कर्जदाताही कर्जाचा अर्ज नामंजूर करण्याची शक्यता अधिक असते.
  • एकदा जरी कर्जाचा अर्ज फेटाळला गेला तरीही ‘क्रेडिट रिपोर्ट’वर त्याचा चुकीचा प्रभाव पडतो. यामुळे अर्जदाराच्या प्रतिमेवर परिणाम होतो. यामुळेही कर्ज नामंजूर होण्याची शक्यता असते.  
  • अश्यावेळीअर्जदाराने दुसरीकडे कर्जाचा अर्ज करण्याऐवजी आधीच्या बँकेने आपलं कर्ज नामंजूर का केलं याचं कारण विचारावं किंवा समजून घ्यावं आणि त्यानंतर त्या कारणावर काम करावं. तरच क्रेडिट रिपोर्ट सुधारून भविष्यात कर्ज नामंजूर होण्याची शक्यता कमी होईल.

४. क्रेडिट स्कोअर:

  • “आपला क्रेडिट स्कोअर चेक करा”, अशा प्रकारच्या टीव्हीवर बरेच जाहिराती येत असतात. ती कर्जाच्या संबंधित एक महत्वाची बाब आहे.
  • क्रेडिट स्कोअर’ हे व्यक्तीच्या पतपुरवठया संबंधित संख्यात्मक मूल्यांकन असतं. क्रेडीट स्कोअर हा तीनशे ते नऊशे दरम्यान असतो. व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर सातशे पन्नासहुन कमी असल्यास त्या व्यक्तीचं  कर्ज फेटाळलं जातं.
  • बऱ्याच गोष्टी क्रेडिट स्कोअरला प्रभावित करतात :
   1. जसे मासिक हप्ते उशिरा भरणे,
   2. मासिक हप्ते भरायचे चुकणे,  
   3. एकावेळी बऱ्याच कर्जांसाठी अर्ज करणे.
  • यांमुळे क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. म्हणून व्यक्तीने कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी प्रथम स्वतःचा क्रेडिट स्कोअर बघावा आणि तो ठीक नसल्यास तो उंचावण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावे.

५. नकारात्मक क्रेडिट रिपोर्ट:

  • क्रेडिट रिपोर्टसुद्धा कर्ज मंजूर किंवा नामंजूर होण्याबाबत महत्त्वाची भूमिका निभावतं. यात सीबील रिपोर्ट CIBIL REPORT महत्वाचा असतो.
  • बंद केलेले अकाउंट सुरू असलेले दाखवणे, पेमेंट्सचं रिपोर्टींग चुकीचं दाखवणे. यामुळे सीबील रिपोर्ट कायम तपासत राहणे महत्त्वाचे आहे. त्यामध्ये काही चुका दिसल्या तर त्या वेळेत नीट करता येतील. यामुळे सीबील स्कोअर आणि कर्ज मंजूर होण्याची शक्यता वाढेल.

 

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Esjnyg )

 

सिबिल (CIBIL) – आर्थिक व्यवहारांचा विकिपीडिया,   चांगल्या क्रेडिट स्कोअरचे ४ फायदे ,  सिबिल स्कोअर आणि गैरसमज, 
गृहकर्ज घ्यायचं आहे? मग या गोष्टी तपासून पहा,  होम लोनचं प्रीपेमेंट करताना ह्या बाबींचा विचार जरूर करा

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…