Reading Time: 3 minutes

आयुष्यमान भारत ही भारत सरकारची महत्वाकांक्षी आरोग्यविमा योजना असून, त्यामधून १०.३६ कोटी अल्प उत्पन्न असलेल्या गरीब कुटुंबांतील साधारणपणे ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्यविम्याचे संरक्षण दरवर्षी मिळेल. २३ सप्टेंबर २०१८ रोजी ही योजना सर्व भारतभर अमलात आली आहे. ही जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्यविमा योजना ठरली आहे.

या योजनेची वैशिष्ठ्ये–

 1. या योजनेनुसार गरीब कुटुंबाला ५ लाख रुपयांचा आरोग्यविमा दरवर्षी मिळेल.
 2. यात सुमारे १०.३६ कोटी गरीब कुटुंबे आणि ५० कोटीच्या आसपास व्यक्तींना विमासंरक्षण मिळेल.
 3. मुली, स्त्रिया आणि जेष्ठय नागरिक यांच्यावर मोफत आणि प्राधान्याने , सरकारी अथवा मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयात विनामूल्य उपचार केले जातील.
 4. यामध्ये हॉस्पिटलमध्ये भरती करून अत्यावश्यक  उपचार आणि आवश्यकता असल्यास विशेष उपचार केले जातील.
 5. या उपचारात १३५० विविध शस्त्रक्रिया, वैद्यकीय आणि अल्पकालीन उपचार ,औषधोपचार आणि तपासण्या यांचा सामावेश आहे.
 6. आधी असलेल्या आजारामुळे आजार उद्भवला या कारणाने नकार देता येणार नाही.
 7. यासुविधा घेण्यासाठी कागदपत्रांची आणि रोख रकमेचा वापर करावा लागणार नाही.
 8. रुग्णालयाला यात ठरवल्याप्रमाणे दरानेच उपचार करावे लागतील. अधिक पैशांची मागणी करता येणार नाही.
 9. याचे लाभार्थी, संपूर्ण भारतात कुठेही उपचार घेता येतील.

योजनेचे स्वरूप–

 • या योजनेचे लाभार्थी कुटुंबीय २०११ च्या जनगणना उत्पन्नआणि जात नोंद या आधारे निश्चित करण्यात येतील. यात कुटूंबातील सदस्य संख्या आणि सदस्यांचे वय यामुळे काहीही फरक पडणार नाही.
 • सध्या एका कुटुंबातील ५ सदस्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील लाभार्थी निश्चित करण्यासाठी कच्च्या घरात राहात असणारी कुटुंबे, अशी कुटुंबे जी केवळ महिलांच्या कमाईवर चालतात, एखादी व्यक्ती अपंग आहे, निराश्रित आणि निराधार व्यक्ती, केवळ मोलमजुरी करणाऱ्या व्यक्ती यांचा समावेश असेल.
 • कुटूंबाचे मासिक उत्पन्न १० हजाराहून अधिक नसेल. शहरी भागातील कुटुंबाची पात्रता निश्चित करण्यासाठी  कचरा वेचणाऱ्या व्यक्ती, घरकाम करणाऱ्या व्यक्ती, छोटे उद्योग मोलमजुरी करणारी कुटुंबे ज्यांचे मासिक उत्पन्न १० हजाराहून अधिक नसेल यांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
 • दुर्बल जाती आणि समाजातील वंचित यांचा विचार केला जाईल.अशा प्रकारे या योजनेचा लाभ होऊ शकेल अश्या कुटूंबाची यादी बनवून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल असे पत्र पाठवण्यात येईल.एक संकेतांक त्यांना देण्यात येईल.सामायिक सेवा केंद्रातून ही माहिती त्यांच्यापर्यंत गावातील मान्यवर लोकामार्फत पोहचवण्यात येईल. जरी असे पत्र आले नसेल तरीही पात्र व्यक्तीवर मोफत उपचार होतील. यासाठी आपल्याकडे उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र किंवा योजनेचे इ कार्ड असणे जरूर आहे.
 • उपचार घेण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये असलेल्या आयुष्यमान / आरोग्य मित्राशी संपर्क करावा. आपली ओळख पटवून द्यावी आणि कुटूंबाशी असलेले नाते सांगावे. ही ओळख पटवून दिल्यावर त्याच्याकडून एक फोटो घेण्यात येईल. ही सर्व माहिती नोंदवून एक तात्पुरते ओळखपत्र दिले जाईल. या माहितीची सत्यता पडताळून घेऊन त्या कुटूंबास योजनेचे ई कार्ड देण्यात येईल.
 • या योजनेतील लाभार्थी कुटूंब आणि त्यातील सदस्यांची यादी सरकारकडून प्रसिध्द करण्यात आली असून त्यात आपण अथवा आपले कुटुंब आहे की नाही याची पडताळणी करता येते.
 • यासाठी mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपला मोबाईल क्रमांक ओटीपी (one time passward) घेऊन नोंद करावा लागेल. यानंतर उघडणाऱ्या पेजवर जाऊन काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल यानंतर सर्च हा पर्याय निवडून ते बटन क्लिक केले तर आपले किंवा कुटुंबाचे लाभार्थी म्हणून नोंद झाली असेल तर सर्व तपशील समोर येईल.
 • हीच माहिती १४५५५ या टोल फ्री क्रमांकास फोन करून अथवा स्थानिक स्वराजसंस्थेच्या कार्यालयात जाऊनही  मिळवता येईल. योजनेत नाव नसेल आणि आपली पात्रात असेल, तर आरोग्यमित्राच्या मदतीने या योजनेचा लाभार्थी म्हणून आपल्या नावाची नोंद करता येईल.
 • आजारपणामुळे एखाद्या गंभीर आजारामुळे कुटूंबाची पूर्ण वाताहत होऊ शकते. मध्यम परिस्थितीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मित्र नातेवाईक यांची मदत होऊ शकते.  उच्च उत्पन्न असलेली कुटुंबे जागरूक असल्याने आरोग्यविमा घेतात. अत्युच्च उत्पन्न असलेल्या लोकांना या गोष्टीमुळे फारसा काही फरक पडत नाही.
 • अनेक सरकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत न पोहोचल्याने ते यापासून वंचित रहातात. आपल्या माहितीत या योजनेचा लाभ होऊ शकेल अशी कुटुंबे असल्यास ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची नावे लाभार्थी म्हणून आहेत का हे शोधण्यात, नसेल तर नवीन नोंदणी करण्यास त्यांना मदत करून, आपली सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी.

– उदय पिंगळे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2Eilfdd )

 

आयुष्मान भारत योजना नक्की आहे तरी काय?,  सुकन्या समृद्धी योजना – भाग १ , सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.
Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.