Reading Time: 3 minutes

“गुरुवारी पाणीपुरवठा बंद”

मंगळवारच्या पेपरमध्ये बातमी !

अशी बातमी वाचल्यावर काय करतो आपण? तर गुरुवारच्या पूर्ण दिवसभर आणि शुक्रवारी पाणी येईपर्यंत पूर्ण घराला पुरेल एवढं पाणी घरात साठवून ठेवतो.

बुधवारी खूप वेळ नाही मिळाला तर? म्हणून मग, मंगळवार बुधवार मिळून थोडं थोडं पाणी २ दिवसांसाठी साठवून ठेवतो. हे असतं आपलं पाण्याचं भविष्यासाठीचं नियोजन! अशीच काळाची पावलं ओळखून आपल्याला आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी सुद्धा थोडे थोडे करत आर्थिक नियोजन करणं भाग असतं.

कोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं. 

अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना. 

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी किंवा Public Provident Fund (PPF):

  • ही योजना भारत सरकारने १९६८ मध्ये सुरू केली होती. ही एक बचत ठेव योजना आहे.
  • या योजनेद्वारे आपण आपले पैसे बचत म्हणून सरकारकडे जमा करतो आणि योजनेचा कालावधी संपल्यावर सरकार आपले पैसे व्याजासहित परत करते.
  • या योजनेमागचा सरकारचा मुख्य उद्देश लोकांमध्ये बचतीची सवय वाढवणे हा आहे.
  • या योजनेसाठीचे आपले खाते आपण जवळचे पोस्ट ऑफिस, भारतीय स्टेट बँक वा कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेमध्ये सुरू करू शकतो.

योजनेची वैशिष्ट्ये:-

  • या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य असे की ही एक कर बचत योजना आहे. अर्थात या योजनेद्वारे आपण आपली वार्षिक करपात्र उत्पन्नाची रक्कम कमी करू शकतो. कलम ८० सी अंतर्गत या योजनेतील आपली वार्षिक रक्कम आपल्या वार्षिक करपात्र उत्पन्नातून वगळली जाते.
  • शिवाय या योजनेतून मिळणारा परतावा सुद्धा पूर्णपणे करमुक्त असतो.
  • मिळणारे व्याज व हाती येणारी एकूण रक्कमही पूर्णपणे करमुक्त असते. मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) सुद्धा कापला जात नाही.

आवश्यक कागदपत्रे:-

या योजने अंतर्गत खाते सुरू करण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक असतात. व्यक्तीची सामान्यतः सर्व माहिती , ओळख – पत्ता याविषयी , देणारे पुरावे लागतात.

  • सामान्य केवायसी (KYC)
  • पॅन कार्ड
  • पत्त्याचा कोणताही एक पुरावा
  • १ फोटो
  • बँक खात्याचे तपशील

योजनेचे नियम व अटी:-

  • या योजनेचा पूर्ण कालावधी १५ वर्षे असतो. खर्चासाठी हवे म्हणून १५ वर्षाच्या आत या योजनेतील रक्कम आपण काढून घेऊ शकत नाही. हा कालावधी संपूर्णतः लॉक इन कालावधी (lock in period) असतो.
  • मात्र योजनेची ३ वर्षे पूर्ण झाल्यावर आपण त्या जमा रकमेवर कर्ज घेऊ शकतो.
  • या योजनेमध्ये आपण किमान ५०० ते कमाल १.५ लाख रुपये  वार्षिक गुंतवणूक करू शकतो. याचा अर्थ एका वर्षात रु ५०० ते १.५ लाख यापैकी आपल्या सोयीने एक रक्कम ठरवून ती प्रत्येक वर्षी जमा करायची.
  • ही वार्षिक रक्कम आपण वर्षातून एकदा एकाच वेळी किंवा प्रत्येक महिन्याला अशी १२ हप्त्यात भरू शकतो.

योजनेतील व्याजदर

  • या योजनेत साधारण बँक बचत खात्यापेक्षा जास्त व्याजदर मिळतो.
  • प्रत्येक ३ महिन्यांनी सरकार यातील व्याजदराचा आढावा घेते.
  • सध्या १.१.२०१९ पासून लागू असलेला व्याजदर वार्षिक ८% आहे.  

परतावा: एका दृष्टिक्षेप

या योजनेतून मिळणाऱ्या परताव्याचे उदाहरण पाहू.

रु ५०० ते १.५ लाख मधील कोणतीही रक्कम आपण वार्षिक हप्ता म्हणून निवडू शकतो. १५ वर्षांनंतर आपली १५ वर्षांतील जमा रक्कम आणि त्यावर मिळालेले व्याज असे दोन्ही मिळून आपला एकूण परतावा असतो.

वार्षिक रक्कम(रु)                                                    

कालावधी (वर्षे) व्याजदर (%) एकूण परतावा(रु)
१०, ००० १५ ८% २,९३,२४२
२५,००० १५ ८% ७,३३,१०७
५०,००० १५ ८% १४,६६,२१४
१,००,००० १५ ८% २९,३२,४२९
१,५०,००० १५ ८% ४३,९८,६४३

पीपीफ योजनेचे फायदे/तोटे:

  • पोस्ट ऑफिसची  पीपीएफ योजना ही कर सवलतीस पात्र आहे, तसेच निश्चित परतावाही देते.
  • ही सरकारची योजना असल्यामुळे या गुंतवणुकीमध्ये कोणताही धोका नाही. त्यामुळे यात पैसे गुंतवणे फायद्याचे आहे.
  • याचा व्याजदर मात्र  पंधरा वर्षांच्या लॉकिंग पिरेडच्या मानाने कमी वाटू शकतो. यामुळे ज्याला जास्त रिटर्न्स हवे आहेत त्यांना पीपीएफ योजना रुचेलंच असं नाही.
  • गुंतवणुकीची कमाल मर्यादा निश्चित केलेली असल्यामुळे त्यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही.

सुकन्या समृद्धी योजना वि. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी,

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी – मुदतपूर्तीनंतरचे विविध पर्याय

महिन्याच्या ५ तारखेआधी पीपीएफमधील गुंतवणूक फायदेशीर,

सुकन्या समृद्धी योजना- नियम व वैशिष्ठ्ये

आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला [email protected] वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर’ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘Hi’ असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.