आपले आवडते ई-वॉलेट कितपत सुरक्षित आहे?

Reading Time: 3 minutes ऑनलाइन व्यवहार जास्तीत जास्त वाढला. याचे फायदे आहेतच पण काही तोटे ही दिसू लागले कारण ऑनलाइन व्यवहारात काही फसवणूकही दिसू लागली. म्हणून आपल्या वापरत असलेले ई-वॉलेट सुरक्षित आहे का? याची पडताळणी करणे आवश्यक आहे. 

मर्यादित भागीदारी संस्था: नियम व वैशिष्ट्ये

Reading Time: 3 minutes व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे हे प्रश्न सुटू शकतात. डॉक्टर्स, सनदी लेखापाल, वास्तुविशारद, वकील, तांत्रिक सल्लागार, कर सल्लागार, वित्तीय सल्लागार यांना आपल्या ज्ञानाचा आणि सहकाऱ्याच्या ज्ञानाचा उपयोग करून मर्यादित भागीदारीमुळे (LLP) आपला व्यवसाय वाढवता येऊ शकेल. अशा प्रकारे मर्यादित भागीदारी असलेली भागीदारी स्थापन करता येणे सोपे आणि कमी खर्चाचे आहे.

वैयक्तिक अपघात विमा – काळाची गरज !

Reading Time: 6 minutes एका माहितीनुसार भारतामध्ये दर तासाला ५५ अपघात होतात. म्हणजे जवळपास मिनिटाला एका अपघाताची नोंद होते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अहवालानुसार २०१६ मध्ये देशात पाच लाख अपघात झाले. परिणामी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक आहे. हे पाहता वैयक्तिक अपघात विमा गरजेचा आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना

Reading Time: 4 minutes केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१४ पासून “बेटी बचाओ-बेटी पढाओ” ही योजनाही सुरु केली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सदर योजनेसाठी मुलींचे जन्मदर कमी असणाऱ्या भारतातील १०० जिल्ह्यांची निवड करून सदर जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. “बेटी बचाओ-बेटी पढाओ” या योजनेच्या धर्तीवरच मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे, मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतीबंध करणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्यसरकारने सध्या सुरु असलेली सुकन्या योजना विलीन करुन “माझी कन्या भाग्यश्री” ही नवीन योजना सुरु केली आहे.

काय आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना?

Reading Time: 3 minutes कोणीही व्यक्ती आयुष्यभर कमाई कशी करू शकेल? म्हणूनच कमवत असतानाच आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आपण करायला हवी.यासाठी बाजारात अनेक बचत व गुंतवणूक योजना उपलब्ध असल्याचं आपल्याला दिसतं.  अशा अनेक योजनांपैकी कोणती निवडावी? तर ती निवड सजगतेने करायला हवी.कारण आपल्या मेहनतीचा पैसा आपण गुंतवणार असतो. अशा सगळ्या योजनांमध्ये सर्वात खात्रीशीर म्हणता येतात, भारतीय टपाल खात्याच्या काही योजना. अशापैकीच एक आहे PPF योजना अर्थात सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी योजना.