Arthasakshar Pradhanmantri Mudra Yojana in Marathi
Reading Time: 3 minutes

प्रधानमंत्री मुद्रा योजना

उन्हाळ्याचे तीन महीने पापड बनवून ते विकणार्‍या कमलाला वर्षातले बाकीचे दिवस कसे भागवावे, हा प्रश्नच असायचा.  मात्र मुद्रा योजना त्यांच्या मदतीला धावून आली. या योजने अंतर्गत तिने कर्ज घेतले आणि आता तिचा बारमाही पापड, लोणची, चकली, शंकरपाळी इ. खाद्यपदार्थांचा धंदा तेजीत चालू आहे. ही आणि अशी बरीच उदाहरणे आपण रोजच ऐकत असतो.

काय आहे मुद्रा योजना?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल?

मला कर्ज मिळू शकेल का? मिळाल्यास किती मिळेल?

असे बरेच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले असतील. नाही म्हणायला गुगल महाराज आहेत उत्तर द्यायला, पण बर्‍याच संकेत स्थळांना भेट देऊन देखील म्हणावे तशी समाधानकारक आणि सोप्या भाषेत माहिती मिळेलच असे नाही. आजच्या लेखात आपण मुद्रा योजनेची सोप्या भाषेत माहिती घेऊया.

निवृत्तीपश्चात सुरक्षित मुद्दल आणि नियमित उत्पन्न देणाऱ्या योजना…

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना –

  • देशातील लघूउद्योगाला चालना मिळण्यासाठी त्यांना अर्थसाहाय्य मिळणेही तितकेच महत्वाचे आहे. 

  • हाच उद्देश समोर ठेऊन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA)’ अर्थातच मुद्रा बँक योजना २०१५ मध्ये सुरू केली. 

  • या अंतर्गत लघु उद्याजकांना ५० हजार ते १० लाख पर्यन्त कर्ज अतिशय कमी व्याजदरात उपलब्ध होऊ शकते. यासाठी सरकारने २० कोटी रुपयांची तरतूद देखील केली आहे.

पिक विमा योजनांचे महत्व…

कर्ज मिळण्यासाठीचे निकष –

मुद्रा योजने अंतर्गत कर्जाच्या अनुषंगाने तीन प्रकार पाडले गेलेत. अतिशय सध्या पद्धतीने त्याचे विभाजन शिशु, किशोर आणि तरुण अश्या प्रकारे केले आहे.

शिशु श्रेणी – 

  • नव उद्योजकांना चालना देण्यासाठी “शिशु श्रेणी” आहे. या अंतर्गत तरुण आणि स्त्रियांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी रुपये ५०,०००/- पर्यंतचे कर्ज दिले जाते. 

  • हे कर्ज फेडण्यासाठी जास्तीत जास्त पाच वर्षांचा कालावधी दिलेला आहे. 

  • या अवधीमध्ये जर कर्जफेड करता आली नाही तर, कालावधी वाढवला जातो. अर्थातच अशावेळेस नक्कीच व्याजदर अधिक लागतो.  

आयुषमान भारत योजना नक्की आहे तरी काय?…

किशोर श्रेणी – 

  • ज्या लघु उद्याजकांना उद्योग वाढीसाठी लागणारे साहित्य किंवा इतर खर्च अशा छोट्या कारणांसाठी कर्जाची आवश्यकता असते ते “किशोर श्रेणी” मध्ये येते.

  • या मध्ये लघूउद्योजकांना रुपये ५० हजार ते ५ लाख पर्यंत कर्ज दिले जाते.

तरुण श्रेणी – 

  • काही लघु उद्योजकांना उद्योग वाढीसाठी लागणारी कर्ज रक्कम ही पाच ते दहा लाख दरम्यान असते ते “तरुण श्रेणी” मध्ये येतात.      

  • किशोर आणि तरुण श्रेणीसाठी कर्जाच्या परतफेडीचा कालावधी आणि कर्जाचा हप्ता हे कर्जाच्या रकमेवरून ठरते.

प्रधानमंत्री जन-धन योजनेची माहिती…

मुद्रा बँक योजने अंतर्गत उद्देश / हेतू आणि तरतुदी –

  • भारतामध्ये उपलब्ध होणार्‍या रोजगारामध्ये लघु-उद्योगांचा मोठा वाटा आहे, म्हणूनच या उद्योगांना चालना देण्यासाठी मुद्रा बँक योजना अस्तित्वात आणली गेली.

  • मुद्रा बँकेचे कामकाज रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली चालते. 

  • मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज पुरवणार्‍या बँका, संस्थांची माहिती आपल्या प्रभागानुसार आपल्याला मुद्राच्या संकेतस्थळावर मिळेल.

मुद्रा बँक कर्ज पुढील बाबींसाठी मिळते –

१. दुकानदार, कच्चा माल पुरवठादार, व्यापारीवर्ग आणि इतर सेवा पुरवठादार यांच्यासाठी व्यावसायिक कर्ज

२. भांडवलदारांना मुद्रा कार्डद्वारे कर्ज

३. लघु उद्योगांना यंत्र सामुग्रीसाठी कर्ज

४. दळणवळण/ वाहतुकीच्या व्यवसायासाठी लागणार्‍या वाहनांसाठी कर्ज

५. शेतीशिवाय मात्र शेतीसंबंधित व्यवसाय जसे की कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन इ. साठी कर्ज

६. याशिवाय वस्त्र विक्री, कापड व्यवसाय, ब्युटि पार्लर, सलोन, जिम, ड्राय क्लीन, गॅरेज, औषधालय, डीटीपी, कुरीयर सेवा, खाद्य पदार्थ निर्मिती आणि विक्री इ. चा देखील समावेश कर्ज लाभार्थी मध्ये होतो.

माझी कन्या भाग्यश्री योजना…

मुद्रा कार्ड –

  • मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेणार्‍याला मुद्रा डेबिट कार्ड मिळते. 

  • कर्जांतर्गत भांडवल खेळते राहावे या उद्देशाने हे कार्ड देण्यात येते. 

  • कर्जदाराला या कार्डचा उपयोग कर्ज एक किंवा अधिक वेळा काढण्यासाठी करता येते. 

  • मुद्रा कार्डचा आणखी एक फायदा म्हणजे कर्जाची रक्कम कार्यक्षम पद्धतीने व्यवस्थापित करून व्याजाचा बोजा नियंत्रित करता येतो. तसेच कार्डचा उपयोग केल्याने मुद्रा मधील आपल्या व्यवहाराचे डिजिटायझेशन होते.  

  • डिजिटायझेशनमूळे कर्जाच्या सर्व जुन्या नोंदी बँकेकडे राहतात.

  • कर्जदाराला मुद्रा कार्डचा वापर हा कर्जाच्या रकमेप्रमाणे करता येतो. 

  • हे कार्ड देशात सगळीकडे वापरता येते, तसेच हया कार्डद्वारे कोणत्याही एटीएम मधून पैसे काढता येतात.

Download Arthasaksharr App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: What is Mudra loan in Marathi, Mudra yojana marathi , Mudra Card in marathi, mudra scheme in marathi, PMMY  Marathi 
Share this article on :
1 comment
  1. अतिशय उपयुक्त माहिती मिळाली
    धन्यवाद👏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.