नवीन घर खरेदी करताना गृह कर्जाची अतिशय मदत होते परंतु गृह कर्ज ही कर्जदाराच्या डोक्यावरची टांगती तलवार असते. शक्य तितक्या लवकर गृह कर्ज फेडण्याचा कर्जदार व्यक्तीचा प्रयत्न असतो.
-
एखादे वेळी असे होते की कर्जदार व्यक्तीकडे बोनस अथवा इतर माध्यमातून मोठी रक्कम जमा होते. अशावेळी हप्त्यात फेडत असलेले गृह कर्ज एकदम भरून टाकण्याची कर्जदार व्यक्तीची इच्छा असते.
-
गृह कर्जाची वेळेआधी परतफेड तणावातून मुक्त करणारी बाब वाटत असली तरी त्याचे अनेक फायदे -तोटे आहेत.
-
निर्धारित वेळेपूर्वी गृह कर्जाच्या परतफेडीशी संबंधित विविध गोष्टी लक्षात घेऊन विचारपूर्वक निर्णय घेणे योग्य असेल.
-
कर्ज घेताना ते कर्ज परतफेड करण्याची एक विशिष्ट मुदत दिलेली असते. त्या मुदतीआधीच घेतलेल्या कर्जाची पूर्ण रक्कम अथवा त्यातील काही रक्कम एकाच वेळी आगाऊ जमा करता येते. याला प्रिपेमेंट (Prepayment) म्हणतात.
-
कर्जाची काही रक्कम प्रिपेमेंट केल्यास कर्जाची मुळ रक्कम म्हणजे मुद्दल रक्कम कमी होते, साहजिकच ज्यामुळे कर्जाचा मासिक हप्ता (EMI) किंवा कर्जाचा कालावधी कमी होतो. मात्र गृह कर्जाचे प्रिपेमेंट करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात घेतल्या पाहीजेत:
-
कर्जाबद्दलची तुमची मनस्थिती :
-
कर्ज असल्यामुळे तुम्ही अतिशय तणावात आहात की दिलेल्या वेळेत ते कर्ज सहज फेडता येईल असा तुम्हाला विश्वास आहे?
-
कर्ज असणे ही कोणत्याही व्यक्तीसाठी चिंतेची बाब असते. जरी एखादी व्यक्ती कर्जाचे मासिक हप्ते वेळेवर भरत असेल तरी ती व्यक्ती सतत तणावाखाली असू शकते.
-
कर्जाची तलवार डोक्यावर सतत टांगती आहे असे वाटत असेल तर ते कर्ज वेळेआधीच परतफेड करणे उत्तम.
-
अश्या वेळी आपल्याकडील आपत्कालीन गरजेसाठी बचत केलेल्या पैशातून गृह कर्जाची परतफेड करता येईल.
-
त्यामुळे क्रेडिट कार्ड किंवा खाजगी कर्जासारख्या अति उच्च व्याज दर असणारे कर्ज तुमच्या मासिक उत्पन्नावर बोजा टाकणार नाही.
-
-
आपत्ती कालीन आर्थिक नियोजन:
-
जर तुमच्याकडे आपत्कालीन वेळेसाठी सहाय म्हणून काही गुंतवणूक नसेल तर गृह कर्जाच्या प्रिपेमेंट आधी इमर्जन्सी फंड (Emergency Fund) साठी पैशांची बचत करता येऊ शकते.
-
-
इतर कर्ज:
-
खाजगी कर्ज अथवा क्रेडिट कार्डवर घेतलेल्या कर्जापेक्षा गृह कर्जाचा व्याज दर शक्यतो कमी असतो.
-
त्यामुळे डोक्यावर कर्जाचा बोजा राहू नये असे वाटत असेल तर जास्त व्याज दर असणाऱ्या कर्जाची सर्वप्रथम परतफेड केली पाहीजे.
-
-
प्रिपेमेंट शुल्क :
-
जून २०१२ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना अस्थिर व्याज दर असणाऱ्या गृह कर्जाच्या वेळेआधी परतफेडीवर आकारले जाणारे शुल्क रद्द करण्याचे निर्देश दिले.
-
त्या आधी, गृह कर्जाची पूर्ण अथवा काही अंशी रक्कम वेळेआधी जमा केल्यास बँक मूळ कर्जाच्या रकमेच्या २-५ % रक्कम शुल्क आकारत असे. स्थिर व्याज दर असणाऱ्या गृह कर्जाच्या वेळेआधी परतफेडीवर आजदेखील शुल्क आकारले जाते.
-
-
जास्त परतावा देणाऱ्या योजनेत गुंतवणूक :
-
कर परताव्यातून होणारे फायदे देखील लक्षात घेतले पाहीजेत. पीपीएफ (PPF). समृद्धी योजना सारख्या काही योजनातून ६.६५ पेक्षा जास्त वार्षिक कर परतावा मिळतो.
-
जर तुमचे आर्थिक नियोजन व्यवस्थित असेल आणि तुम्ही आर्थिक धोका पत्करू शकत असाल तर गृह कर्जाचे प्रिपेमेंट करण्या ऐवजी अश्या योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करता येईल, जेणेकरून त्यातून अधिक जास्त परतावा प्राप्त होईल.
-
-
गृह कर्जावरील कर लाभ :
-
गृह कर्ज घेणारी व्यक्ती गोंधळात असते की घेतलेल्या गृह कर्जावरील आयकर लाभ प्राप्त करायचे की त्याच गृह कर्जावरील भरावे लागणाऱ्या व्याजाची बचत करायची.
-
गृह कर्जावर प्राप्त होणारे विविध कर लाभ खालील तक्त्यात दर्शविले आहेत.
-
कपात |
कलम |
न्यूनतम कपात |
अटी |
मूळ कर्ज |
80 क |
१.५ लाख |
ताबा मिळाल्यापासून ५ वर्षाच्या आत घराची विक्री करता येणार नाही. |
व्याज |
२४ ब |
२ लाख |
गृह कर्ज हे नवीन घर खरेदी साठी अथवा घर बांधणी साठी घेतलेले असावे. त्याचा उपयोग जागा खरेदी करण्यासाठी करता येणार नाही. गृह कर्ज घेतलेल्या वित्तीय वर्षापासून ५ वर्षाच्या आत घर बांधणी पूर्ण झाली पाहीजे. संयुक्त खातेधारक संयुक्तरित्या कर्जाचे मासिक हप्ते (EMI) भरत असतील तर दोन्ही व्यक्तींना २ लाख रुपये व्याज कपातीचा लाभ घेता येईल. |
व्याज |
80 इ |
५०, ००० |
मालमत्तेचे मूल्य हे ५० लाखांपेक्षा अधिक नसावे व गृह कर्जाची रक्कम ३५ लाखांपेक्षा जास्त नसावी. |
मुद्रांक शुल्क |
80 क |
१.५ लाख |
मुद्रांक शुल्क जमा केलेल्या वर्षातच त्यावरील कर लाभ प्राप्त करता येतील. |
7. गृह कर्जातून कर बचत कशी होते?
-
प्रिपेमेंट चा सर्वात मोठा फायदा हा आहे की भरावे लागणारे व्याज कमी होते. गृह कर्ज मुदतीच्या सुरवातीच्या टप्प्यात ईएमआय (EMI) मध्ये व्याजाची रक्कम जास्त असते. त्यामुळे गृह कर्ज मुदतीच्या मध्य अथवा शेवटच्या टप्यात प्रिपेमेंट केले तर कदाचित त्यातून तुम्हाला व्याज म्हणून भरावी लागणाऱ्या रकमेची जास्त बचत करता येणार नाही .
-
अश्या वेळी, शिल्लक पैसे गृह कर्ज फेडण्यात गुंतवणे योग्य नसेल. त्याच बरोबर गृह कर्जाचे प्रिपेमेंट केल्यास भविष्यात मिळणारे गृह कर्जावरील कर लाभ न प्राप्त करता येण्याची शक्यता वाढते.
8. कर्ज प्रकरण मिटवणे
तुम्ही कर्जाची पूर्ण रक्कम भरली म्हणजे कर्ज प्रकरण मिटले असा त्याचा अर्थ होत नाही. त्यासाठी काही गोष्टींची दक्षता घेतली पाहीजे.
-
कर्जाची पूर्ण रक्कम भरल्यानंतर बँकेत तारण म्हणून जमा केलेली संपतीची सर्व कागदपत्रं परत घेतली पाहीजेत आणि बँकेकडून तशी पोचपावती देखील घेतली पाहीजे.
-
तुमचे क्रेडिट रिपोर्ट (Credit Report) अद्ययावत आहेत का ते तपासा.
-
भारती प्रमाणपत्र म्हणजेच The Encumbrance Certificate (EC) मालमत्तेवर कोणतेही कर्ज अथवा कायदेशीर बोजा नसल्याचे सिद्ध करते. तेव्हा संबंधित अधिकार्यांकडून EC घ्यायला विसरू नका.
गृह कर्जाशी संबंधित वरील गोष्टी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेतल्यास पैशाची बचत करता येऊ शकते.
(चित्रसौजन्य- https://bit.ly/2PLCXax )
(Disclaimer : येथील लेखांचा हेतू हा अर्थसाक्षरतेचा प्रसार करणे असून, सदर विषयांसंदर्भातील निर्णय आपल्या नेहमीच्या वकिल/ चार्टर्ड अकाऊंटंट/ सल्लागार यांच्या सल्ल्यानेच घ्यावेत. Please refer https://arthasakshar.com/Disclaimer.aspx )