Reading Time: < 1 minute

बऱ्याचदा आपल्याला मूळ कागदपत्रांची रंगीत झेरॉक्स करून, ते लॅमिनेट करून बरोबर बाळगायची आणि मूळ कागदपत्र घरी सुरक्षित ठेवायची सवय असते.  पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, गाडीची कागदपत्रं अशा महत्त्वाच्या गोष्टी हरवू नयेत म्हणून आपण हा मार्ग अवलंबतो पण सगळ्याच महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल असं करता येऊ शकत नाही हे यु.आय.डी.ए.आय.(UIDAI) तर्फे जाहीर करण्यात आलेल्या नविन सूचनेवरून समजते. 

युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इन्डिया अर्थात यु.आय.डी.ए.आय. ह्या आधारकार्ड देणाऱ्या संस्थेने नुकत्याच घोषित केलेल्या नविन नियमाप्रमाणे 

  • जर तुम्ही पी.व्ही.सी. किंवा लॅमिनेटेड आधारकार्ड वापरत असाल तर ते अधिकृत सरकारी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. 

  • अशा प्रकारे आधारकार्डची प्रिंट घेताना त्यावर असणारा क्यू.आर. कोड चुकतो किंवा बदलतो आणि त्यामुळे क्यू.आर. कोड प्रणालीचा मूळ उद्देश बिनकामाचा ठरतो. 

  • क्यू.आर.कोडद्वारे तुमची मूळ व खरी माहिती ओळखण्यास मदत होते आणि आधार कार्डवर असा योग्य क्यू.आर. कोड असणेच गरजेचे आहे. 

  • म्हणून साध्या कागदावर छापण्यात आलेलेच आधार कार्ड योग्य आहे आणि तेच ग्राह्य धरले जाईल असे यु.आय.डी.ए.आय. चे सीईओ अजय भूषण पांडे यांनी सांगितले. 

असे मूळ आधार कार्ड झेरॉक्स करून, ते लॅमिनेट करून विक्रीचे काम करणारे दुकानदार किंवा दलाल ह्या कामाचे कोणाच्याही देखरेखीच्या अभावामुळे त्यांच्या मनाजोगते पैसे उकळतात. शिवाय, आधार कार्डचे असे प्लॅस्टिकीकरण करताना तुमच्या खाजगी माहितीचा गैरवापरही होऊ शकतो. त्यामुळे इतर कोणत्याही कागदपत्रासारखे आधारकार्डचे लॅमिनेशन न करता शासनाकडून प्राप्त झालेली मूळ प्रत वापरणेच सोयीचे ठरेल.

हे अधिकृत आहे –

१. साध्या कागदावर आधारकार्डची रंगीत किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट

२. एम.आधारकार्ड(mAadhar)

हे अधिकृत नाही –

१. पि.व्ही.सी. आधारकार्ड

२. लॅमिनेटेड आधारकार्ड

यु.आय.डी.ए.आय. ने जाहीर केलेले सुचना तुम्ही येथे वाचू शकता.

(चित्र सौजन्य- https://cdn.liveindia.live/hindi/userfiles//aadhar%20card%20two.png )

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.