Reading Time: 2 minutes

रिअल इस्टेट क्षेत्रातील मुंबईस्थीत प्रसिद्ध ब्रँड म्हणजे “रुस्तमजी ग्रुप”! ही कंपनी आयपीओ मधून ६३५ कोटी रुपये उभे करणार आहे. 

 

रुस्तमजी ग्रुप काय काम करतात – (Rustomjee company works)

 • किस्टोन रिअल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रुस्तमजी नावाने व्यवसाय करते. 
 • बोमन आर इराणी हे रुस्तमजी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. 
 • रुस्तमजी कंपनी कौटुंबिक आणि अपार्टमेंट पद्धतीच्या घरांचे बांधकाम तसेच बिझनेस पार्क उभारणी करते. 
 • रुस्तमजी कंपनी भारत आणि दुबई मधील ग्राहकांना सेवा देते. 
 • रुस्तमजी कंपनीचे आतापर्यंत ३२ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे. कंपनीचे सध्याच्या घडीला १२ प्रकल्पांवर काम चालू आहे. कंपनीने आतापर्यंत २ कोटी स्क्वेअर फूटांपेक्षा जास्त बांधकाम पूर्ण केले आहे. 
 • मुंबई महानगर क्षेत्रात कंपनीने १९ प्रकल्पांची योजना आखली आहे.
 • रुस्तमजी कंपनी परवडणाऱ्या आणि मध्यमवर्गीय घरांची आणि प्रीमियम, सुपर प्रीमियम ऑफिसची विक्री करत असते. 

नक्की वाचा : आयपीओमध्ये गुंतवणुकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष 

रुस्तमजी कंपनीच्या आयपीओ बद्दलची माहिती – (Rustomjee Company Information)

 • किस्टोन कंपनीचा आयपीओ १४ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरच्या दरम्यान विक्रीला खुला असणार आहे. 
 • या आयपीओ मधून प्रति समभाग ५१४ रुपये ते ५४१ रुपये दरम्यान बोली लावून गुंतवणूकदारांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. 
 • रुस्तमजी कंपनी आयपीओ मधून ६३५ कोटी रुपये उभारणार आहे. पूर्वीच्या नियोजनानुसार कंपनी ८५० कोटी रुपये उभारणार होती पण प्रत्यक्षात ६३५ कोटी रुपये उभारण्याचाच कंपनीने निर्णय घेतला. 
 • गुंतवणूकदारांना कमीत कमी २७ आणि जास्तीत जास्त २७ च्या पटीत शेअर्सची खरेदी करावी लागणार आहे. 
 • कंपनीचे इक्विटी शेअर्स २४ नोव्हेंबर रोजी मुंबई स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज या दोन्ही ठिकाणी लिस्ट केले जाणार आहेत. 

 

आयपीओ खुला  १४ नोव्हेंबर २०२२
आयपीओ बंद  १६ नोव्हेंबर २०२२
शेअर बाजारात लिस्टींग दिनांक  २४ नोव्हेंबर २०२२

 

रुस्तमजी कंपनी आयपीओचा करणार असा वापर –

 • रुस्तमजी कंपनीवर ३४१.६ कोटी रुपयांचे कर्ज आहे. आयपीओमधून आलेल्या पैशातून कंपनी रिपेमेंट/प्रीपेमेंटची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. 
 • भविष्यातील रिअल इस्टेट प्रोजेक्ट आणि ऑफिसेसच्या बांधकामासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. 
 • आयपीओ मधील ५० टक्के भाग हा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ३५ टक्के भाग हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी आणि १५ टक्के भाग हा गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. 

नक्की वाचा : आयपीओबद्दलचे हे नवीन नियम माहित आहेत का? 

तुम्ही काय कराल?

 • जर तुम्हाला कंपनीचे बिझनेस मॉडेल आवडत असेल आणि जोखीम स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल, तर IPO सबस्क्राईब करू शकता, मात्र ते तुमच्या एकूण पोर्टफोलिओच्या 1% पर्यंतच मर्यादित ठेवा. 
 • जर तुम्ही लिस्टिंगमधील नफा शोधत असाल तर IPO च्या पहिल्या दोन दिवसाचे सबस्क्रिप्शन तपासा. जर IPO पूर्णपणे किंवा ओव्हरसबस्क्राइब झाला असेल तर तुम्ही सबस्क्रिप्शन घेण्याचा विचार करू शकता. कमी-सबस्क्रिप्शनमुळे नफा लिस्टिंग होण्‍याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.

कंपनीचे RHP वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…