Reading Time: 3 minutes
  • माणूस म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या विविध गरजा असतात. त्यामधील काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कर्जाची गरज लागते तेव्हा सर्वात आधी त्याचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. तो तपासून गृह कर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जाचे वितरण केले जाते. जेव्हा या कर्जापेक्षा जास्त रक्कम हवी असेल तेव्हा वैयक्तिक कर्ज हा एकच मार्ग उपलब्ध असतो. 
  • वैयक्तिक कर्ज अतिशय सोप्या पद्धतीने मिळून जाते आणि यासाठी कोणतेही तारण नसते. जेव्हा वैयक्तिक कर्ज घेतले जाते तेव्हा वाहन किंवा गृह कर्जापेक्षा या कर्जावरील व्याजदर जास्त असतो. या कर्जावर इएमआय अधिक असल्यामुळे ते लवकर भरले जावे अशी कर्जदाराची इच्छा असते. वैयक्तिक कर्जावर व्याज ११ ते १८ टक्याच्या दरम्यान आकारले जाते. 
  • समजा तुम्ही २,००,००० रुपये १४ टक्यांनी ५ वर्ष मुदतीसाठी घेतले तर अंतिमतः २,७९,२२० रुपयांची परतफेड करावी लागेल. व्याजाची रक्कम ७९,२२० रुपये असून ती खूपच जास्त असते. त्यामुळे कर्ज बंद करण्याच्या सहज सोप्या उपायांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कर्जावर प्रीपेमेन्ट आणि पार्ट पेमेंट करणे हा सर्वात सोपा उपाय आहे. 

 

वैयक्तिक कर्ज प्री पेमेंट आणि पार्ट  पेमेंट 

  • समजा तुम्ही एकदा कर्ज घेतले तर ते कर्ज तुम्हाला मासिक हप्त्यांमध्ये (EMI) परत करावे लागते. प्री पेमेंट म्हणजे कर्जफेडीची मुदत संपण्यापूर्वी संपूर्ण कर्ज किंवा काही भाग भरून पूर्ण करणे. काही बँका तुम्हाला एक वर्षानंतर थकबाकी परतफेड करण्याची सूचना देतात, त्यामुळे व्याज शुल्कात बचत होते. 

 

मी कर्जाच्या कालावधी दरम्यान कोणत्याही वेळी वैयक्तिक कर्जाची प्रीपेमेंट भरू शकतो का?

  • काही कर्जांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही कालावधीदरम्यान दंडाशिवाय प्रीपेड किंवा काही भाग भरण्याची सोय करून दिली आहे. परंतु वैयक्तिक कर्जासाठी ही योजना नाही कारण ते निश्चित दर आधारित कर्ज आहे. 

 

वैयक्तिक कर्ज प्रीपेमेंटचे फायदे 

वैयक्तिक कर्ज प्रीपेमेंटचे अनेक फायदे आहेत ते खाली दिलेले आहेत. 

  • हे कर्जावरील एकूण व्याज कमी करण्यासाठी मदत करते. 
  • हे तुम्हाला कर्ज लवकर फेडण्याचे स्वातंत्र्य देते. 
  • हे कर्ज फेडल्यानंतर तुम्ही वैयक्तिक व्याज शुल्काच्या ओझ्यातून लवकर सुटू शकता. 

 

आपण हे उदाहरणाने समजून घेऊयात. 

समजा तुम्ही ५०,००० रुपयांचे कर्ज १२ टक्के व्याजदराने दोन वर्षांसाठी घेतले आहे. एक वर्षानंतर संपूर्ण कर्जाची रक्कम प्रीपे करायची ठरवल्यास ६,००० रुपये व्याज द्यावे लागते. पण जर कर्जाचे परिपेमेंट न करता दोन वर्षांसाठी इएमआय भरणे चालूच ठेवले तर १२,००० रुपये व्याज भरावे लागते.  

 

कमी क्रेडिट स्कोअर असताना वैयक्तिक कर्ज कसे मिळवाल?

 

वैयक्तिक कर्जाचे पार्ट पेमेंट 

वैयक्तिक कर्ज फेडण्यासाठी जेव्हा तुमच्याकडे एकरकमी रक्कम असते पण ती संपूर्ण थकबाकी रकमेच्या तुलनेत समतुल्य नसते तेव्हा त्याला पोस्ट पेमेंट  म्हटले जाते. 

 

वैयक्तिक कर्जाच्या पार्ट पेमेंटचे फायदे 

वैयक्तिक कर्जाचे पार्ट पेमेंट तुम्हाला खालील प्रकारे मदत करू शकते. 

  • वैयक्तिक कर्जामुळे इएमआय वर पैसे वाचवायला मदत मिळते. 
  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये आर्थिक लवचिकता मिळते. 
  • पार्ट पेमेंट तुम्हाला तुमचे कर्ज लवकर फेडण्याची परवानगी देते. 
  • समजा तुम्ही दोन वर्षांसाठी ५०,००० रुपयांचे कर्ज १२ टक्के व्याज दराने घेतले असेल आणि एका वर्षात तुम्ही २५,००० रुपयांची कर्जबाकी जर भरली तर उरलेल्या कालावधीमध्ये तुमचे कर्ज कमी होऊन त्याचा परिणाम व्याजदरावर होईल. 
  • लॉक इन कालावधीनंतर जर पार्ट पेमेंट केले तर व्याजाच्या रकमेत मोठी बचत होते. 
  • इएमआयची रचनाच अशी केलेली असते की सुरुवातीच्या काळात जास्त व्याज देयके असतात. त्यामुळे पार्ट पेमेंट  केल्यामुळे जास्त व्याज देणे टाळले जाऊ शकतो. 

वैयक्तिक कर्जाचे प्री पेमेंट केल्यावर त्याचा क्रेडिट स्कोअरवर काही परिणाम होतो का?

प्रीपेमेंटचा तुमच्या क्रेडिट स्कोअरवर लगेच परिणाम होत नाही. तुमचे कर्ज बंद झाल्यास त्याचा परिणाम स्कोअरवर योग्य वेळी दाखवला जातो. तुम्ही कर्जाची रक्कम लवकर भरल्यास क्रेडिट स्कोअर सकारात्मक होतो. 

 

मी वैयक्तिक कर्जाचे प्रीपेमेंट करतो तेव्हा सरासरी प्रीपेमेंट शुल्क किती असते?

प्रीपेमेंट शुल्क हे तुमच्या कर्जावर पूर्ण केलेल्या एकूण कालावधीवर अवलंबून असते. कर्जाचा कमी कालावधी शिल्लक असल्यास कमी शुल्क भरावे लागते. सरासरी प्री पेमेंट शुल्क हे एकूण थकबाकीच्या २-४ टक्यांच्या दरम्यान असते. 

 

तुमच्या वैयक्तिक कर्जाचे काही भाग भरणे खरोखर फायदेशीर आहे का?

हो. तुम्ही वैयक्तिक कर्जाचे काही भाग भरल्यास तुमची कर्जबाकी कमी होते आणि त्यामुळे व्याजाची रक्कम कमी होते.

 

कर्जाच्या कालावधीमध्ये मी वैयक्तिक कर्जाचे कधी प्रीपेमेंट करू शकतो?

वैयक्तिक कर्जाची अशी अट आहे की तुमचे १२ इएमआय झाल्यानंतरच तुम्ही प्रीपेमेंट भरू शकता. बँकेनुसार ही अट बदलते. 

 

अर्धवट प्रीपेमेंटमुळे माझी EMI रक्कम कमी होईल का?

तुम्ही प्रीपेमेंट केल्यास बँकेशी बोलू शकता. त्यांना कर्जाचा कालावधी कमी करण्याचा आणि इएमआय रक्कम कमी करण्याची विनंती करू शकता

 

 

लक्षात ठेवा, खर्चात बचत म्हणजे उत्पन्नात एकप्रकारची वाढ असते. त्यामुळे तुमच्याकडे पैसे असतील तर त्यातून आणि नसतील तर बचत करा पण सर्व प्रकारच्या कर्ज लवकर संपवा. व्याज वाचवा आणि सुखी व्हा !

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

व्यवसाय कर्ज घेऊन आपण यशस्वी स्वप्ने कशी पूर्ण करू शकतो?

Reading Time: 3 minutes उद्योजकता हा भारताच्या आर्थिक विकासातील महत्वाचा घटक आहे. देशातील उद्योग धंदे वाढीस…

“आधी खरेदी मग पैसे द्या” पेक्षा क्रेडिट कार्ड पद्धत चांगली आहे का ?

Reading Time: 2 minutes “खरेदी करा आणि पैसे नंतर द्या” म्हणजेच Buy Now, Pay Later ही…

कर्ज घेताय? तुम्हाला कर्जामुळे निर्माण होणाऱ्या या 9 समस्या माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes थोडं कर्ज (Loan) घेतलं तर काही बिघडतं? लोक क्रेडिट कार्ड तसेच वैयक्तिक…