Reading Time: 2 minutes

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून मारुती सुझुकीला ओळखले जाते. बुधवार २ नोव्हेंबर २०२२ रोजी कंपनीकडून एक घोषणा करण्यात आली. त्यात सांगण्यात आले की आतापर्यंत २.५ कोटी गाड्यांचे उत्पादन कंपनीकडून करण्यात आले आहे. प्रवासी वाहन उत्पादनात एवढा मोठा टप्पा गाठणारी ही एकमेव देशी कंपनी ठरली आहे. (Maruti Suzuki Marathi)

१९८३ मध्ये मारुती आणि सुझुकी या दोन कंपन्यांनी सोबत काम सुरु केले होते. या कंपनीने १९९४ पर्यंत १० लाख गाड्यांच्या उत्पादनाचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर मार्च २०११ मध्ये १ कोटी आणि  जुलै २०१८ मध्ये २ कोटी गाड्यांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला. कंपनीचा पहिला कारखाना गुरुग्राम, हरियाणा येथे सुरु करण्यात आला होता. 

आता कंपनीने गुरुग्राम सोबत मनेसर येथेही कारखाना चालू केला आहे. या ठिकाणी वार्षिक १५ लाख गाड्या बनवण्याचे युनिट स्थापित करण्यात आले आहे. लवकरच कंपनी खरखोडा, हरियाणा येथे तिसरा कारखाना सुरु करणार आहे. कंपनी १६ प्रवासी वाहने बनवत असून १०० देशांमध्ये त्यांना निर्यात करते. मारुती सुझुकीचे संपूर्ण देशात सर्व्हिसिंगचे जबरदस्त नेटवर्क आहे. 

 

मारुती सुझुकी शेअरने गुंतवणूकदारांना छप्पर फाड के परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांत दर वर्षी २०% दराने मारुतीचे शेअर्स वधारले आहेत. जवळपास २.७५ लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणाऱ्या मारुतीकडे ४०% पेक्षा जास्त प्रवासी वाहनाचा बाजार हिस्सा आहे. (Maruti Suzuki Share information marathi)

 

मारुती सुझुकी गाडी यशस्वी का झाली हे खालील मुद्यांच्या आधाराने समजून घेऊयात. 

१. मारुती सुझुकी ब्रँडवरची निष्ठा – (Maruti Suzuki Brand)

 • मारुती सुझुकी कंपनीच्या जाहिराती घराघरात पोहोचलेल्या आहेत. अजूनही ‘घर आ गया हिंदुस्थान’ ही जाहिरात सर्वांच्या आठवणीत आहे. बरेच वर्ष झाले तरी हे गाणे अजूनही कंपनीची गाडी समोरून गेली तर गुणगुणावेसे वाटते. 
 • मारुती सुझुकी कंपनी प्रत्येक ग्राहकाला आपलेपणाची जाणीव करून देते. एखादा ग्राहक मारुती सुझुकी  कंपनीशी जोडला गेला की परत तो दुसऱ्या कंपनीची गाडी शक्यतो घेत नाही. 

२. चांगले मायलेज – (Good Mileage)

 • जर तुमच्याकडे मारुती सुझुकी गाडी असेल तर चांगले मायलेज हमखास मिळते. या कंपनीच्या कारमध्ये अत्याधुनिक सुविधा कमी दिलेल्या असल्या तरी चांगले मायलेज देणे हा कंपनीचा यूएसपी आहे. 
 • चांगले मायलेज देणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या सामान्य माणसांसाठी वरदान आहेत. 

नक्की वाचा : एशियन पेंट्स – ८०  वर्षांची यशोगाथा 

३. मारुती सुझुकी कंपनीच्या बजेटमधील गाड्या – (Maruti Suzuki Badget Cars)

 • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सामान्य माणसाला गाडी घेता येत नव्हती कारण गाड्यांच्या किंमती खूप जास्त होत्या. 
 • त्यानंतर मारुती सुझुकी कंपनी बाजारात आली आणि अनेक जणांचे गाडी घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 
 • अनेक सर्वसामान्य घरांमध्ये पिढ्यानपिढ्या कौटुंबिक कार म्हणून मारुती सुझुकी गाड्यांचा वापर केला जातो. 
 • कमी किंमतीच्या गाड्यांमध्ये मारुती सुझुकी कंपनी आघाडीचे स्थान टिकवून आहे.

४. कंपनीच्या हॅचबॅक गाड्या – (Maruti Suzuki Hatchback Cars) 

 • भारतीय रस्त्यांवर सर्वसामान्यपणे मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या वापरल्या जातात. कंपनीच्या हॅचबॅक गाड्या जवळपास सगळीकडेच रस्त्यावरून धावताना दिसून येतात. 
 • देशात हॅचबॅक हा गाडीचा प्रकार सर्वात जास्त विकला जातो. हॅचबॅक गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते.  
 • मारुती सुझुकी कंपनीची हॅचबॅक अल्टो गाडी सर्वात जास्त विकली जाणारी गाडी आहे. 

५. कमी देखभाल खर्च –

 • मारुती सुझुकी गाडीचा देखभाल खर्च इतर गाड्यांपेक्षा खूपच कमी आहे. 
 • कंपनीच्या दररोज मोठ्या प्रमाणावर गाड्या सर्व्हिसिंग होऊन जातात आणि येतात. 
 • ग्राहकाला कंपनीचे सर्व्हिस सेंटर जवळ असल्यामुळे कमी देखभाल खर्चात गाडीची सर्व्हिसिंग करून मिळते. 

६. काहीतरी अधिक 

 • कमी किमतीतील डिझाईमध्ये मारुती सुझुकी कधीच तडजोड करत नाही. नवीन बाजारात येणाऱ्या कंपनीच्या गाड्या आकर्षक असतात. 
 • तुम्ही आधीपासून मारुती सुझुकी कंपनीची गाडी वापरत असाल तर कंपनीची नवीन गाडी घेताना अतिरिक्त टॅक्स भरावा लागत नाही. 
 • त्यामुळे भारतीय लोकांना मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर आवडतात. 

 

 

निष्कर्ष : 

 • मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या सर्व्हिस सेंटर सोडून इतर ठिकाणीही सहज सर्व्हिसिंग करून मिळतात. 
 • मारुती सुझुकीच्या गाड्यांची वेळेवर देखभाल केली की त्या वर्षोनुवर्षे व्यवस्थित चालतात. 
 • तुम्हालाही पहिलीच गाडी घ्यायची असेल तर, मायलेज आणि बजेटमधील कार म्हणून मारुती सुझुकी कंपनीच्या गाडीला पहिली पसंती द्यायला हरकत नाही. 

 

नक्की वाचा : आयटीसी ची यशोगाथा

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…