अक्षय्य तृतीया: सोने खरेदीचे हे नवीन पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes

अक्षय्य तृतीया

आपल्या संस्कृतीमध्ये अक्षय्य तृतीया या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी केलेली उपासना अक्षय्य राहते अशी मान्यता आहे. आपल्याकडे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या शुभदिनी सोनं विकत घ्यायची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत सोन्याला वेगळं स्थान आहे. सांस्कृतिक गोष्टी बाजूला ठेवल्या तरी गुंतवणुकीसाठी सोन्याला आजही महत्व दिले जाते. गुंतवणूकदारांसाठी सोनं आज देखील आकर्षणाचा विषय आहे. भारतात दर वर्षी अंदाजे 800 टन सोन्याची खरेदी होते आणि जगाचा विचार केला तर जगात बनलेल्या संपूर्ण सोन्याच्या जवळपास 23% सोनं भारतामध्ये तयार केलं जातं. एवढेच नाही भारतीय आभूषणांसाठी देखील सोन्याचा वापर इतर देशांपेक्षा मोठ्या प्रमाणात करतात. 

हे नक्की वाचा: Gold Investment: भारतात सोने गुंतवणुकीचे पाच पर्याय

अक्षय्य तृतीया आणि सोने खरेदी 

 • यावर्षी अक्षय्य तृतीया कोरोनाच्या सावटाखाली आहे. मागील वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सणांचा उत्साह कुठेतरी हरवून गेला आहे. लॉकडाऊनमुळे दुकानेही बंद आहेत. 
 • यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन गुंतवणूक देखील अत्यंत सुरक्षित पर्याय आहे.
 • 2019 आणि 2020 मध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. या काळात सोन्याच्या भावांनी उच्चांकी उसळी मारली परंतु त्यानंतर मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याचे भाव कधीच वाढले नाही. 
 • सध्याच्या परिस्थितीत देखील सोन्याचे भाव फार स्थिर राहतील याची शाश्वती नाही त्याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरसचा वाढणारा प्रादुर्भाव आणि निर्बंध या सर्व गोष्टींचा सोन्याच्या गुंतवणुकीवर किंवा भावावर काय परिणाम होईल याचा अंदाज बांधणं सध्यातरी शक्य नाही.
 • ऑनलाइन पद्धतीने सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये गोल्ड बॉन्ड, एसआयपी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. 

महत्वाचा लेख: हिरे की सोने : गुंतवणूकीचा योग्य पर्याय कोणता? 

अक्षय्य तृतीया: सोने खरेदीचे आधुनिक पर्याय 

१. सुवर्ण सार्वभौम रोखे (Sovereign gold bond – SGB)

 • गोल्ड बॉण्ड  खरेदी करणं देखील सोन्यात गुंतवणूक करण्याचा चांगला मार्ग आहे.
 • हे बॉण्ड भारत सरकार, रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून उपलब्ध करून देते. यामध्ये तुम्हाला वार्षिक 2.5% व्याजदराने परतावा मिळतो. परंतु यावर्षी आरबीआय ने कुठलेही नवीन बॉण्ड  बाजारात आणले नाही.
 • तुम्हाला जर या बॉण्ड मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला मागील वर्षीच्या उपलब्ध असलेल्या बॉण्ड मध्ये गुंतवणूक करावी लागेल.

२. म्युच्युअल फंड

 • अनेकांना प्रश्न पडला असेल की आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो का, तर मित्रांनो होय आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून देखील सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो.
 • हे म्युच्युअल फंड तुम्हाला इतर म्युच्युअल फंड सारखा परतावा जरी देऊ नाही शकले तरीही एक गोष्ट लक्षात घ्या की म्युचल फंड स्टॉक मार्केट वरती आधारित नसतात त्यामुळे त्यात फार मोठ्या प्रमाणात अस्थिरपणा येण्याची शक्यता कमी असते.
 • सर्वात महत्वाचे म्हणजे यात आर्थिक जोखीम इतर म्युच्युअल फंड पेक्षा कमी असते.

३. एसआयपी (SIP)

 • सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या पद्धतीने देखील सोन्यात  गुंतवणूक करू शकता. 
 • एस आय पी किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करण्याचा फायदा असा की तुम्ही अगदी कमीत कमी रक्कम देखील गुंतवू शकता. परंतू सोन्याच्या इतर गुंतवणूक पद्धतीत तुम्हाला ठराविक रक्कम गुंतवावीच लागते.
 • एसआयपी पद्धतीने गुंतवणूक केल्यामुळे अनेक प्रकारचे धोके सहजपणे टाळले जाऊ शकतात. 
 • सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या डिमॅट अकाउंट वरून देखील या एसआयपी बद्दल माहिती जाणून घेऊ शकता आणि गुंतवणूक देखील अगदी सहजपणे करू शकता.

महत्वाचा लेख:  सोनं खरेदी करताय? थांबा, आधी हे वाचा 

भारतामध्ये आर्थिक परिस्थिती सध्या अस्थिर आहे कोरोना व्हायरस  राज्यांमध्ये मोठे नुकसान करत आहे एवढेच नव्हे तर  अनेक नवनवीन  आजार देखील समोर येत आहेत. अशा परिस्थितीत अर्थव्यवस्था थोडी पिछाडीवर जाण्याची लक्षणे आहेत. परंतु सोन्यामधील गुंतवणूक एक असा पर्याय आहे ज्यामध्ये गुंतवणुकीची जोखीम तुलनेने कमी आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल त्यामुळे शक्य असल्यास विविध पर्यायांचा विचार करून सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

टीम अर्थसाक्षरतर्फे अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!!

For suggestions queries – Contact us: info@arthasakshar.com 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

Read – Disclaimer policies 

web search: Akshyya Tritiya Marathi, Akshyya Tritiya Investment Marathi, Akshyya Tritiya Investment in Marathi, Akshyya Tritiya Gold Investment Marathi Mahiti, Akshyya Tritiya Gold Investment in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published.