सरल जीवन विमा योजना
Saral jeevan vima yojana in Marathi
Reading Time: 3 minutes

सरल जीवन विमा योजना

सध्याच्या परिस्थीतीचा विचार करून खूप मोठ्या व दुर्लक्षित वर्गाची मूलभूत गरज पूर्ण करेल अशी मुदतीच्या विम्याची योजना म्हणजेच ‘सरल जीवन विमा’ योजना. ही योजना 1 जानेवारी 2021 पासून अमलात आणण्यात येणार आहे.

आर्थिक क्षेत्रात असलेले वेगवेगळे नियामक त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या विविध योजनांवर लक्ष ठेवून असतात. सर्वसामान्य धारकांच्या अधिकाराची पायमल्ली होऊ नये त्याचप्रमाणे त्यांचा अन्यायाविरुद्ध दाद मागण्याच्या अधिकाराची जपणूक त्यांनी करावी असे अपेक्षित आहे. यातील काही नियामाकांच्या कार्यक्षमतेविषयी गंभीर आक्षेप असून या सर्वांवर  एखादा महानियामक असावा का? या विषयावर चर्चा रंगतात. अधिकार असले तरी ते पूर्ण क्षमतेने वापरले नाहीत तर त्याचा काहीच उपयोग नसतो. या सर्वात, या वर्षी विमा नियामकानी जे आदेश दिले त्यामुळे त्यांचे वेगळेपण ठळकपणे लक्षात येते. 

हे नक्की वाचा: काय आहे आरोग्य संजीवनी योजना?  

कोविड-19 आणि आरोग्यविमा –

  • सर्व जगालाच कोविड-19 ने विळखा घातल्याने त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम सर्वानाच भोगावे लागले. 
  • याची झळ आपल्याला किंचित उशिरा म्हणजे मार्चच्या सुरुवातीला बसण्यास सुरुवात झाली.
  • यापूर्वीही मंदीच्या विळख्यात उद्योगधंदे होतेच, पण पूर्ण मागणीच ठप्प झाल्याने त्यात भर पडली. 
  • गरीब आणि मध्यमवर्ग यांना याची तीव्रता जास्त जाणवली. त्यात आरोग्यावरील खर्चात भर पडल्याने त्यांचे कंबरडेच मोडले. 
  • ज्यांचा आरोग्यविमा होता त्यांचे सुरुवातीचे दावे लगेच मंजूर झाले नंतर दावेदारांचे प्रमाण वाढल्यावर अनेक कंपन्यांनी ते मंजूर करण्यास खळखळ करण्यास सुरुवात केली.
  • याबाबत तक्रारी येण्यास सुरुवात झाल्यावर विमा नियामकांनी त्यात हस्तक्षेप करून सर्व विमा कंपन्यांना दावे त्वरित निकाली काढण्याचे आदेश दिले. 
  • सर्वसाधारण आरोग्यविमा योजनेत कोविड-19 वरील उपचारही समाविष्ट असतील असे सांगितले, सुयोग्य कारणाव्यतिरिक्त दावे नाकारू नयेत असा मानवतावादी दृष्टिकोन घेतला. फक्त याच आजारावरील खर्चाची भरपाई होईल अशा वेगळ्या विशेष विमा योजना आणाव्यात असे आदेश दिले. 
  • विमा नियामकांनी लोकांनी आरोग्यविमा स्वतःहून घेण्यासाठी सर्वांसाठी सारखी एकसमान मूलभूत आरोग्य विमा योजना तयार केली. त्यास आरोग्य संजीवनी योजना असे नाव देऊन  1 एप्रिल 2020 पासून सर्वच विमा कंपन्यांना सर्वाना परवडेल अशी कमी प्रीमियम असलेली किमान एक योजना सुरू करण्याचे आदेश दिले. 
  • नियमित योजनांपेक्षा याचा हप्ता खूपच कमी असून त्यामुळे अनेकांना आरोग्यविम्याचा एक स्वस्त आणि मस्त पर्याय उपलब्ध झाला आहे जो कोणत्याही विमा कंपनीकडे उपलब्ध आहे. 
  • वाहनांच्या वापरानुसार वाहनविमा आणि विमा भेटकार्ड यासारख्या अभिनव योजनांना त्यांनी मंजुरी दिली.

 विशेष लेख: आरोग्यदायी भारतासाठीचे ‘हेल्थ कार्ड’ 

मुदतीचा विमा –सरल जीवन विमा

  • आरोग्य विम्याप्रमाणेच मुदतीचा विमा ही अनेक मध्यमवर्गीयांची मूलभूत गरज आहे.
  • आपले कसेतरी भागवू शकणारी मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्ती निधन पावल्यास त्या कुटूंबाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटते. 
  • या सर्वाचा विचार करून खूप मोठ्या व दुर्लक्षित वर्गाची मूलभूत गरज पूर्ण करेल अशी एक मुदतीच्या विम्याची योजना 1 जानेवारी 2021 पासून आणण्याचे आदेश देऊन आणखी एक भविष्यवेधी पाऊल टाकले आहे. 
  • या योजनेस ‘सरल जीवन विमा’ असे नाव दिले असून याच्या नियम अटी ठरवून दिल्या असून त्या सर्वत्र सारख्या असल्याने एक नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आपल्या कुटूंबाची काळजी असणारे अनेकजण त्यांच्या गरजेनुसार अशी उपयुक्त योजना नक्किच खरेदी करतील.

हे नक्की वाचा: तुम्हाला विमा भेट कार्डबद्दल माहिती आहे का?

सरल जीवन विमा योजना – नियम व वैशिष्ट्ये

  • सर्वत्र सारख्याच नियम अटी असलेली स्वस्त व मस्त मुदत विमा योजना. 
  • नियम अटी साध्या, सोप्या, सुटसुटीत, योजना हप्ता कंपनीनुसार वेगवेगळा त्यामुळे धारकास विविध पर्याय उपलब्ध.
  • योजनेची निर्मिती विमा नियमकाकडून, सर्व विमा कंपन्यांना अशी योजना आणणे सक्तीचे. ‘सरल जीवन विमा’ या नावानेच तिची विक्री करता येणार. 
  • विमा सुरक्षा 5 ते 25 लाख याहून जास्त सुरक्षा कवच देण्याचे विमा कंपन्याना स्वातंत्र्य.
  • पात्र वयोगट 18 ते 65 वर्ष, योजनेची मुदत 5 ते 40 वर्ष.
  • योजनेचा हप्ता नियमित स्वरूपात, फक्त 5 किंवा 10 वर्ष काळात अथवा एकरकमी भरण्याची सोय.
  • विमा सुरक्षा कवच योजना खरेदी केल्यापासून 45 दिवसांनी लागू. यास केवळ अपघाती मृत्यू हा अपवाद. 
  • व्यक्तीचे लिंग, व्यवसाय, उत्पन्न, निवास, शिक्षण, वर्तणूक यावरून भेदभाव करता येणार नाही. 
  • आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्यास, योजना लाभ मिळण्यास अपात्र.
  • योजना ऑनलाईन/ ऑफलाईन खरेदी करण्याचे पर्याय.
  • केवळ निवासी भारतीय व्यक्तींना ही योजना उपलब्ध.
  • आयुष्यात प्रथमच विमा घेणाऱ्या व्यक्तींसाठी एक सुयोग्य विमा योजना.
  • इतर सर्व योजनांच्या प्रमाणे आपला ग्राहक ओळखीचा पुरावा (KYC) म्हणजेच अधिवास व वय याचा पुरावा, फोटो, प्रीमियम रक्कम, मोबाइल क्रमांक याची गरज लागेल. 
  • ज्यांचे ई इन्शुरन्स खाते आहे त्यांना केवळ खातेक्रमांक व योजनेचा हप्ता देऊन यात सहभागी होता येईल. 
  • खर्च आटोक्यात ठेवण्याच्या दृष्टीने आरोग्य संजीवनी योजनेप्रमाणे सर्वच विमा कंपन्या या दोन्ही योजनांचा प्रसार आणि प्रचार करण्यात हात आखडता घेतील, परंतु आपण अधिकाधिक लोकांपर्यंत याची माहिती पोहचवायचा प्रयत्न करूया.

– उदय पिंगळे

For suggestions queries – Contact us: [email protected] 

Subscribe our YOUTUBE Channel : CLICK HERE

 Download Arthasakshar App – CLICK HERE

Read – Disclaimer policies 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.