Reading Time: 3 minutes

शेअर मार्केटमधे गुंतवणूक करणं जोखमीचं असलं तरी आजकाल बरेच जण ही जोखीम घ्यायला तयार असतात. यामागचं कारण म्हणजे शेअर मार्केटमधे होणारी फास्ट रिकव्हरी. गेल्या काही महिन्यातले शेअर मार्केटमधले चढ उतार पहिले असता एक गोष्ट लक्षात येईल की कुठल्या ना कुठल्या कारणाने मार्केट खाली आले तरी पुन्हा आधीच्या लेवलला म्हणजे जिथून मार्केट अचानक खाली आले तिथे पुनः येण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. उदाहरण घ्यायचे झाले तर निफ्टी 25000 वर असताना अचानक एखाद्या वाईट बातमीमुळे (निफ्टी) 24000 च्या खाली आले. मात्र 24000 वरून पुनः 24400 जायला जास्त कालावधी लागत नाही ए ,  हा कमी लागणारा वेळ म्हणजे शेअर मार्केटची ताकद म्हणावी लागेल. 

एका सर्वेनुसार भारतातील लोकसंख्येच्या केवळ 3% लोक हे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. अर्थात यामध्ये नवीन लोकांची संख्या वाढत आहे मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना बऱ्याच वेळा कुठला शेअर विकत घ्यावा किंवा कुठल्या कंपनीतला शेअर हा दीर्घ कालावधीसाठी योग्य ठरेल? हे काही साधे प्रश्न गुंतवणूकदारांना पडत असतात. आजच्या या लेखामधे आपण लार्ज कॅप फंड बद्दल माहिती घेणार आहे.

  1. लार्ज कॅप, मिडकॅप की स्मॉल कॅप ?
  • त्यातही कंपनी निवडताना लार्ज कॅप, मिडकॅप की स्मॉल कॅप मधून निवडावी हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न असतोच. 
  • पैशाची गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने गुंतवणुकीचा आराखडा तयार करणं गरजेचं आहे. 
  • उदाहरणार्थ गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीसाठी की छोट्या कालावधीसाठी पैशाची गुंतवणूक करावी?
  • पैसे गुंतवण्याचा नेमका हेतू काय आहे? जेव्हा गरज असेल तेव्हा तुमचे पैसे अडकून न राहता  सहजपणे तुम्हाला मिळू शकतील का ? या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर शेअर मार्केटमधे पैसे गुंतवणे सोपे जाऊ शकेल.
  • कोणताही फंड किंवा शेअर हा दीर्घ कालावधीसाठी निवडला आणि गुंतवणूक केली तर इतर म्हणजे मिडकॅप आणि स्मॉल कॅपच्या तुलनेने ही गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा द्यायला मदत करू शकतो . असे  का ? तर याचे कारण आपण पुढे बघणार आहे.

गुंतवणूक : इरेडा कंपनीची माहिती 

  1. लार्ज कॅप फंड
  • ज्या कंपन्यांचे मार्केट मधले भांडवली मूल्य अधिक आहे, अशा कंपनी लार्ज कॅप फंडमधे मोडतात. यात टॉपच्या 100 अशा कंपन्यांमधे लार्ज कॅप फंड गुंतवणूक करत असतात.यांना ब्लु-चिप कंपन्या असंही म्हटलं जातं. 
  • लार्ज कॅप फंडमधली गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम अशी गुंतवणूक मानली जाते. कारण या कंपन्यांमधे स्थिर परतावा देण्याची क्षमता असते. दीर्घकाळासाठी म्हणजे कमीतकमी 3-5 वर्षे तरी पैसे गुंतवण्याची तयारी हवी.  
  • मिडकॅप आणि स्मॉल कॅप या दोघांच्या तुलनेत लार्ज कॅप फंड हा गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानला जातो. शेअर बाजारातल्या चढ आणि उताराचा या कंपन्यांवर तुलनेने कमी प्रभाव पडतो असे म्हणता येईल.
  • लार्ज कॅप फंडमध्ये विविध क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदाराचे पैसे गुंतवले जातात. त्यामुळे जोखीम कमी होते आणि नुकसान कमी होऊन चांगल्या परताव्याची शक्यता वाढते.
  • अधिक परतावा अधिक जोखीम : 
  • वर म्हटल्याप्रमाणे शेअर मार्केटमधे गुंतवणूक करायची म्हणजे जोखीम असणार हे लक्षात घेऊनच पुढे जावे. 
  • लार्ज कॅप मध्ये परतावा जास्त असल्यामुळे जोखीमही अधिक असते त्यामुळे पैसे गुंतवताना आर्थिक क्षमतेचा विचार करून दीर्घकाळासाठी गुंतवणूक करावी.
  • क्षमतेच्या बाहेर केलेली गुंतवणूक मानसिक आणि आर्थिक नुकसानाला निमंत्रण देऊ शकते. 
  • सध्याच्या मार्केटमध्ये काही लार्ज कॅप फंड आहेत, ज्यांनी मागच्या आर्थिक वर्षात म्हणजे 2023 मधे चांगला परतावा दिला आहे. ते खालील प्रमाणे..

गुंतवणूक उत्तरायुष्याची 

फंड चे नाव आणि परतावा

  • निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड – 28.85 %
  • बँक ऑफ इंडिया  ब्लू चिप फंड – 27.5 % 
  • एचडीएफसी टॉप हंड्रेड फंड – 26.61%
  • जे एम लार्ज कॅप फंड – 26.16%
  • इन्व्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड – 24.45%

म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करताना आणि कुठलाही फंड निवडताना,  त्या विशिष्ट  फंडाची कामगिरी लक्षात घ्यावी. मागच्या काही वर्षांमधे चांगला परतावा दिलेला म्युच्युअल फंड भविष्यात देखील तशीच उत्तम कामगिरी करेल याची खात्री करून घ्या. यामधे म्युच्युअल फंड मॅनेजर महत्त्वाचा रोल पार पाडत असतो. तेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडची केवळ एनएव्ही कमी आहे म्हणून तो म्युच्युअल फंड खरेदी करावा असे न करता सर्व गोष्टींची तपासणी करून मगच म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करावी. तसेच म्युच्युअल फंडच्या  एंट्री आणि एक्झिटसाठी लागणाऱ्या फीस ची आणि लॉक-इन पिरेडची माहिती घ्यावी.

वरील लार्ज कॅप फंड हे महितीकरता दिले आहे, त्याच्या खरेदीसाठी कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला आमच्याकडून दिला जात नाही. याची कृपया नोंद घ्यावी. 

#अधिक परतावा अधिक जोखीम # म्युच्युअल फंड एंट्री -एक्झिट
#लार्ज कॅप फंड #लॉक-इन पिरेड #म्युच्युअल फंड

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutesभारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes  सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutesकंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutesभाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.