शेअर्सची साधी बदलती सरासरी

https://bit.ly/2BJXIhA
1 663

Get real time updates directly on you device, subscribe now.

Print Friendly, PDF & Email
 • शेअर्सच्या भावासंदर्भात प्रामुख्याने साधी बदलती सरासरी किंमत म्हणजेच सिंपल मुव्हिंग एव्हरेज (SMA) हा शब्दप्रयोग वारंवार बोलण्यात येतो. शेअर्सचा भाव किंवा बाजाराची दिशा दाखवणारी ही सोपी किंमत असून याद्वारे ट्रेडर्स बाजार किंवा विशिष्ठ शेअरच्या भावाचा अंदाज बांधू शकतात.
 • संख्याची सरासरी म्हणजे काय? हे आपल्याला माहीत आहेच. दिलेल्या पाच विविध संख्याची सरासरी आपण त्या पाच संख्याची बेरीज करून येणाऱ्या संख्येस पाचने भागून काढतो. याच प्रमाणे शेअरचा किंवा इंडेक्सचा रोजचा खुलता भाव, बंद भाव, विशिष्ठ वेळेचा भाव किंवा दिवसभराच्या भावाची सरासरी अशा वेगवेगळ्या किंमती विचारात घेऊन आपण वेगवेगळ्या सरासरी काढू शकतो.
 • अशी सरासरी काढताना पुढील दिवसाचा भाव विचारत घेऊन जर मागील १५ दिवसांची सरासरी काढायची असेल तर आधीच्या अंशस्थानातील सर्वात जुनी किंमत गाळली जाते आणि नवी किंमत विचारात घेतली जाते. त्यामुळे येणाऱ्या किमतीत थोडाफार फरक पडू शकतो. असा फरक पडतो म्हणूनच याला बदलती सरासरी म्हणतात, अशा तऱ्हेने SMA काढता येतो.  
 • moneycontrol.com किंवा त्याच्या अँपमध्ये कोणत्याही इंडेक्सवर क्लीक केले असता त्यावर त्या निर्देशांकाचा३०,५०,१५०, २००दिवसांचा SMA उपलब्ध असतो त्यावरून विविध काळातील सरासरी भाव कळल्याने त्यावरून अंदाज बांधणे ट्रेडर्सना सोपे जाते.
 • येथे कोणत्याही शेअरला क्लीक केले तर जे पेज येते. त्यावर खाली ‘स्टॉक अलर्ट’ या शीर्षकाखाली, जर या कालावधीतील भावापेक्षा काही फरक असल्यास त्याचे नोटीफिकेशन येते. ट्रेडर्स कडून सर्वसाधारणपणे बंद भाव काढून मिळालेला सरासरी भाव विचारात घेतला जातो.

     

 • या प्रकारच्या किमती विचारात घेऊन आपण त्याचा चक्राकार आलेख (Chart) बनवला तर एका दृष्टिक्षेपात सहज नजर टाकून अंदाज बांधता येणे शक्य आहे. यासाठी किती दिवसांच्या भावाची सरासरी घेऊन अंदाज बांधायचा हे ट्रेडरच्या कौशल्याचे काम आहे. असे अल्पकालीन अंदाज बांधताना आणखी कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्यायेथे एकाच किमतीला सर्वत्र सारखेच प्राधान्य दिले असल्याने काहींच्या मते त्यातून काढलेले निष्कर्ष मर्यादित स्वरूपाचे आहेत.
 • असे असूनही तांत्रिक विश्लेषकांच्या मते या किंमती उपयोगी असून नजीकच्या कालखंडातील बाजाराचा अथवा शेअरच्या भावाचा अंदाज बांधण्यासाठी कमी कालखंडातील ३० ते ५० दिवसांचा SMA तर थोडया दिर्घकाळाच्या किंमतीचा अंदाज बांधण्यासाठी जास्त कालखंडातील १५० ते २०० दिवसांचा SMA उपयुक्त आहे. सर्वसाधारणपणे SMA वाढतोय, याचा अर्थ भाव वाढण्याची शक्यता आहे, तर कमी होतोय याचा अर्थ भाव कमी होण्याची शक्यता आहे. तरीही असा अंदाज बांधण्यापूर्वी अन्य काही कारण असण्याचीही शक्यता असते. त्याचाही शोध घ्यावा. अशा प्रकारे सरासरी मिळवताना खालील गोष्टी विचारात घ्याव्यात.
  • सरासरीचा कालावधी: हा कालावधी काही मिनिटे, तास, दिवस ,आठवडे असू शकतो.
  • हे अंदाज बांधण्याचे साधन आहे, असे होईलच असे नाही.
  • एकाच वेळी अनेक लोकांकडून त्यावर उपाय योजले गेल्याने अल्पकाळात फरक पडू शकतो.
  • अचानक भाव मोठ्या प्रमाणात वाढला किंवा कमी झाला तर एकूण किमतीत बऱ्यापैकी फरक पडतो.
 • दीर्घकालीन गुंतवणुकीच्या हेतूने गुंतवणूकदार याच पद्धतीचा उपयोग करून, जर मार्केट वाढण्याची शक्यता असेल तर एखाद्या शेअर्समधील आपली गुंतवणूक वाढवू शकतात किंवा मार्केट कमी होण्याची शक्यता असल्यास आपल्याकडील होल्डिंग विकून कमी भावात खरेदी करू शकतात.अशाप्रकारे प्राथमिक अंदाज आणि गुंतवणूक निर्णय दोन्हींसाठी ही पद्धत उपयोगी होऊ शकते.

– उदय पिंगळे

(चित्रसौजन्य: https://bit.ly/2BJXIhA )

शेअर्ससंदर्भात आवर्जून वाचावेत असे अर्थसाक्षरचे  अजून काही लेख:-

बोनस शेअर्स आणि करदेयता, शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायकशेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचेशेअर बाजार : डर के आगे जीत है !!!भारतीय स्टॉक एक्सचेंज- काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये? ऍसेट अलोकेशन – शेयर बाजाराच्या उतार चढावावर मात कराएम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन्स- ईसॉप(Employees stock option plans)शेअर्सची पुनर्खरेदी (Shares buybacks)

 

(आपले मत किंवा माहितीचे इतर मुद्दे आम्हाला info@arthasakshar.com वर जरूर कळवा. अर्थसाक्षरचे नवनवीन लेख एका क्लिकवर मिळण्यासाठी 8208807919 हा नंबर ‘अर्थसाक्षर‘ या नावाने सेव्ह करून  ह्या नंबरवर ‘अपडेट’ (Update) असा व्हॉट्सॅप मेसेज करा.)

(Disclaimer:  आमच्या डिस्केलमर पॉलिसीजबद्दल जाणून घेण्यासाठी https://arthasakshar.com/disclaimer/  या लिंकवर क्लिक करा.)

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: https://arthasakshar.com/  | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | Copyright © https://arthasakshar.com | All rights reserved.

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Get real time updates directly on you device, subscribe now.

1 Comment
 1. Sambhaji powar says

  Thanks for information

Leave A Reply

Your email address will not be published.