Reading Time: 2 minutes

सुला कंपनीला सेबीकडून आयपीओसाठी  फंड जमा करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सुला  कंपनीने जुलै २०२२ मध्ये ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला होते. 

आयपीओ आल्यानंतर  इक्विटी शेअर्स बीएसई किंवा एनएसई वर लिस्ट केले जाणार आहेत. 

 

नक्की वाचा : काय फरक आहे बीएसई आणि एनएसई मध्ये? 

 

कंपनीचा इतिहास 

  • सुला कंपनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे.  
  • सुला हा भारतामधील वेगाने वाढणारा वाईनरीजचा ब्रँड आहे. 
  • सुला वाईनयार्ड कंपनीचे प्रक्रिया उद्योग नाशिक, दिंडोरी, बंगळूर आणि बसवकल्याण येथे आहेत. 

 

सुला कंपनीच्या आयपीओबद्दलची माहिती

  • सुला वाईनयार्ड कंपनीला ३ नोव्हेंबर २०२२ रोजी सेबीकडून परवानगी प्राप्त झाले आहे. कंपनीने १८ जुलै २०२२ ला बाजार नियमकाकडे आपला मसुदा प्रॉस्पेक्ट्स सादर केले होते. 
  • यामधील इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य २ रुपये प्रति इक्विटी शेअर इतके आहे. 
  • कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, CLSA इंडिया आणि IIFL सिक्युरिटीज सारख्या कंपन्या आयपीओ साठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. 
  • तर KFin Technologies ऑफरचे रजिस्ट्रार आहेत. इंडियन वाईट मार्केट मधील सूला ही सर्वात मोठी उत्पादक आणि विक्री करणारी कंपनी आहे
  • २००९ पासून वाईन इंडस्ट्रीमध्ये सुला वाईन त्यांचा प्रथम क्रमांक टिकवून आहे. 

 

सुला कंपनीची वाटचाल : 

  • सुला कंपनीने १९९६ मध्ये द्राक्षबागेची स्थापना केली होती. कंपनीने ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये सॉव्हिग्नॉन ब्लँक, चेनिन ब्लँक, झिन्फँडेल, रिस्लिंग, रेड स्पार्कलिंग आणि डेझर्ट वाइन या वाईनरीजचे प्रकार भारतात सादर केले होते. 
  • सुला कंपनीने २००५ साली महाराष्ट्रामधील नाशिक येथील वायनरी मध्ये भारतातील पहिली वाईन टेस्टिंग रूम तयार केली होती. 
  • २००८ साली देशातील पहिले द्राक्ष रिसॉर्ट कंपनीच्या वतीने तयार करण्यात आले. त्यांनी भारतातील पहिला वाईन थीम वर आधारित संगीत महोत्सव साजरा केला होता. 

 

सुला वाईनची मार्केटमधील ओळख 

  • लाल, पांढऱ्या आणि आणि स्पार्कलिंग वाईनसह इतर वाईन प्रकारांमध्ये सुलाला वाईन मार्केट लीडर म्हणून ओळखले जाते. 
  • वर्ष २०२१ मध्ये सुला वाईन सर्वात जास्त विकली जाणारी वाईन बनली होती. त्याच्या विक्रीतून ४१७.९६  कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळाला होता. वर्ष २०२२ मध्ये ८.६० टक्के वाढ झाली आहे. 
  • वर्ष २०२२ मध्ये सुला वाईनयार्ड कंपनीचा महसूल ४५३.९२ कोटी रुपये झाला आहे. 
  • कंपनीच्या ब्रँड अंतर्गत सुला कंपनीत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीत वाढ, निवडक ब्रँड आणि बाजारपेठीतील वाईनच्या विक्रीच्या किंमतीमध्ये वाढ, कंपनीने प्रीमियमवर लक्ष केंद्रित केल्यामुळे महसुलात वाढ आणि त्यांच्या वाईन पर्यटन व्यवसायाला चांगली चालना मिळाली आहे. 

 

नक्की वाचा : आयपीओमध्ये गुंतवणुकीपूर्वी या गोष्टींकडे द्या लक्ष 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मुलींसाठी असणाऱ्या ‘या’ ४ सरकारी योजना तुम्हाला माहित आहेत का?

Reading Time: 2 minutes भारत सरकारने मुलींच्या भविष्यासाठी अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. मुलींचे शिक्षण आणि…

Cbl Score : या 10 मार्गानी वाढवा तुमचा सिबिल स्कोअर !

Reading Time: 2 minutes   सिबिल स्कोअरचे सध्याच्या काळात मोठे महत्व आहे. पैसे वाचवण्याचा प्रत्येक जण…

कंपन्यांचे प्रकार

Reading Time: 3 minutes कंपन्यांचे प्रकार भारतातील कंपन्यांचे त्यातील सभासद संख्येवरून तीन, त्यांच्या उत्तरादायित्वावरून तीन, विशेष…

Leave and license Agreement: भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी

Reading Time: 3 minutes भाडेकरार कसा असावा याचा नमुना उपलब्ध असून त्यात परस्पर संमतीने काही बदल करता येतात. यात खालील गोष्टींचा उल्लेख असणे जरूर आहे.