Reading Time: 2 minutes

आयपीओच्या गावामधे सध्या काही दिग्गज अश्या कंपन्यांच्या आयपीओची चर्चा आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्सनं आयपीओमधे नवीन रेकॉर्ड बनवले, तर त्यापाठोपाठ आता स्विगीबद्दल चर्चा होऊ लागली आहे. खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या क्षेत्रामधून झोमॅटोनंतर आता स्विगीने सुद्धा आयपीओसाठी अर्ज दाखल केला आहे.

त्यामुळे एक नंबरवर असणाऱ्या प्रतिस्पर्धी झोमॅटोला जसा प्रतिसाद मिळाला तसा किंवा त्यापेक्षा जास्त प्रतिसाद  स्विगीला मिळणार का? हे बघावे लागेल.

  • सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे स्विगीने नुकतेच आयपीओसाठी मसुदयाचे कागदपत्र दाखल केले आहे आणि सेबीने आयपीओसाठी मंजूरी दिली आहे. 
  • तब्बल Rs.10,000 कोटी इतका मोठ्या रकमेचा हा आयपीओ असणार आहे. यामधे जवळपास Rs.3750 कोटी किमतीचे नवीन शेअर्स असतील तर ऑफर फॉर सेलसाठी जवळपास Rs.18 कोटी इतके इक्विटी शेअर्स असतील.

योजना : एनपीएस वात्सल्य योजना 

ऑफर फॉर सेलद्वारे काही विद्यमान भागधारक त्यांच्याकडच्या समभागांची विक्री करणार असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.अल्फा वेव्ह वेंचर्स, डीएसटी युरो एशिया व्ही बी व्ही, एलिवेशन कॅपिटल व्ही लिमिटेड, एक्सेल इंडिया लिमिटेड, अपोलेटो एशिया लिमिटेड हे त्यापैकी काही नावं आहेत.

  • चालू वर्षाच्या आर्थिक अहवालानुसार, कंपनीचे फूड मार्केटप्लेस सीईओ रोहित कपूर यांनी कंपनीचा व्यवसाय वेगाने विस्तारत आहे आणि नफ्याचे प्रमाण वाढत असल्याचे म्हटले आहे.
  • मात्र आकडेवारीनुसार बघितले असता, वर्ष 2023 मधे कंपनीला Rs.4179 कोटी इतका तोटा झाल्याचे दिसून येते, जो की वर्ष 2024 मधे Rs.2350 कोटीपर्यंत आला आहे. म्हणजेच तोटा कमी होऊन नफ्याचे प्रमाण वाढले आहे. 
  • कंपनीच्या महसुलाबद्दल (रेव्हेन्यू) बोलायचे झाल्यास वर्ष 2023 मधे कंपनीचा महसूल Rs.8265 कोटी होता.जो वर्ष 2024 मधे वाढून Rs.11,247 कोटी इतका झाला. या आकडेवारीवरून एक गोष्ट लक्षात येते, की  कंपनीच्या एकूणच आर्थिक परिस्थितीमधे सुधारणा होत आहे. 
  • मात्र कंपनीची प्रतिस्पर्धी असलेली आणि खाद्यपदार्थांच्या वितरणामध्ये अग्रेसर असलेली झोमॅटो कंपनी तुलनेने अधिक वेगाने वाढत आहे. 
  • झोमॅटोचे आर्थिक आकडेवारीकडे नजर फिरवली असता कंपनीने एप्रिल ते जून या तीमाहीमधे नफ्यामधे जवळपास 125 टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ नोंदवली आहे. आकडेवारीचा हा तुलनात्मक फरक पाहिला तर दोन्हीमधे फरक असल्याचे दिसून येते.

थोडक्यात महत्वाचे : थीमॅटिक फंड म्हणजे काय ?

  • वर्ष 2014 मधे स्थापन झालेल्या स्विगीने आता तब्बल दहा वर्षांनंतर एका नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. ‘प्रोजेक्ट नेक्स्ट’ असं या उपक्रमाचं नाव असून या प्रोजेक्टद्वारे स्विगीचे रेस्टॉरंटचे जाळे आणखी वाढावे आणि डिलिव्हरी पार्टनर्सच्या माध्यमातून तरुणांना रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध करून देणं हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे, असं स्विगीकडून सांगण्यात आलं आहे.
  • तसेच मोठ्या शहरांसोबतच आता टियर टू आणि टियर थ्री शहरांमधे सुद्धा स्विगीची सुविधा पोहोचावी आणि पर्यायाने या शहरांमधले हॉटेलसुद्धा स्विगीच्या कक्षेत येऊन त्यांचाही विस्तार व्हावा हे या प्रोजेक्टचे ध्येय आहे.
  • या उपक्रमामुळे स्विगीचा व्यवसाय नेक्स्ट लेव्हलला जाण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.ज्याचा फायदा भविष्यामधे गुंतवणूकदारांना होऊ शकतो. 
  • स्विगीच्या या नवीन उपक्रमाला हॉटेल व्यवसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रोजेक्ट नेक्स्ट  उपक्रम सुरू केल्यानंतर बऱ्याच हॉटेल व्यवसायिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. 

तर अश्या या बहूचर्चित स्विगीच्या आयपीओची अधिक माहिती आणि आयपीओ लिस्टिंगसाठी गुंतवणूकदारांना नोव्हेंबर 2024 पर्यंतची वाट बघावी लागणार आहे. 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…