Reading Time: 2 minutes

म्युच्युअल फंड हे गुंतवणूकदारांसाठी कायमच आकर्षणाचा बिंदू ठरला आहे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट फंड, इंडेक्स फंड, गोल्ड फंड, हायब्रीड फंड, थीमॅटिक फंड इत्यादी असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी आजच्या लेखामधून थीमॅटिक फंड म्हणजे नेमके काय हे माहीत करून घेऊ. 

थीमॅटिक म्युच्युअल फंड हा एक इक्विटी म्युच्युअल फंडचा प्रकार आहे. हा फंड अशा कंपनीमध्ये किंवा स्टॉकमधे गुंतवणूक करतो, ज्या कंपन्या एखाद्या विशिष्ट प्रकारच्या थीमशी संबधित असतात. विशिष्ट प्रकारच्या   थीमनुसारच थीमॅटिक म्युच्युअल फंड व्यवस्थापक गुंतवणूक करतो.

  • विशिष्ट प्रकारची थीम म्हणजे येणाऱ्या काळात विशेष प्रगती होणारे, नव्याने विस्तारणारे क्षेत्र यांचा अंदाज घेऊन कुठले क्षेत्र आर्थिकदृष्ट्या विशेष कामगिरी करून देशाच्या विकासात हातभार लावतील, असे क्षेत्र थीमॅटिक म्युच्युअल फंडकडून गुंतवणुकीसाठी निवडले जातात. 
  • सध्याचा मार्केट ट्रेंड काय आहे? कुठल्या क्षेत्रामधे गुंतवणुकीला जास्त वाव आहे? कुठले क्षेत्र उदयोन्मुख म्हणून पहिले जात आहे? कुठल्या अश्या कंपनी किंवा क्षेत्र आहे ज्यात येणाऱ्या पाच ते दहा वर्षात लक्षणीय बदल घडून येऊ शकतात ? अश्या अनेक गोष्टींवर काम करून थीमॅटिक म्युच्युअल फंडकडून गुंतवणूक केली जाते.
  • थीमॅटिक म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी हा बऱ्याचवेळा दीर्घकाळासाठी सुचवला जातो. त्यामुळे ज्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडमधे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची आहे; असे गुंतवणूकदार त्यांच्या भविष्यातल्या आर्थिक गरजेनुसार थीमॅटिक म्युच्युअल फंडला पसंती देतात.
  • साधारणपणे कुठल्याही इक्विटी फंडमधे गुंतवणूक करताना फंड व्यवस्थापक गुंतवणूकदाराची जोखीम कमी करण्यासाठी विविध क्षेत्रातून अनेक प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे इक्विटी फंडमधे थीमॅटिकच्या तुलनेने जोखीम कमी असते.
  • मात्र थीमॅटिक म्युच्युअल फंडमधे एक विशिष्ठ थीम लक्षात घेतली जाते आणि वर म्हटल्याप्रमाणे मार्केट ट्रेंडवर काम केल्यामुळे गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.
  • थीमॅटिक म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करताना फंड व्यवस्थापक वेगवेगळ्या मार्केट कॅप असलेल्या कंपन्यांची निवड करतात, यामुळे स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप अश्या सगळ्याच आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. यामुळे गुंतवणुकीचे संतुलन राखण्यास मदत होते. 

उदाहरणार्थ,

  • इन्फ्रास्ट्रक्चर थीम फंड : हा फंड सिमेंट, पॉवर, स्टील इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करतो.
  • मॅन्युफॅक्चरिंग थीम फंड : हा फंड मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित मूलभूत सामग्री, कच्चा माल, तयार उत्पादन साहित्य अश्या कंपन्या अश्यामधे गुंतवणूक करतो.
  • थीमॅटिक एनर्जी फंड : हा फंड ऊर्जा, तेल, सौर आणि पवन ऊर्जा यासारख्या क्षेत्रातल्या कंपनीमधे गुंतवणूक करतो. 

थोडक्यात महत्वाचे : पायाभूत सुविधा क्षेत्र 

गुंतवणुकीसाठी अधिक कालावधी आणि परताव्यासाठी संयम: 

  • एखादे विशिष्ट क्षेत्र कार्यान्वित व्हायला पुरेसा काळ जावा लागतो, थीमॅटिक फंडमधे गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी लागते. तसेच योग्य परतावा मिळण्यासाठी संयम असणं गरजेचं आहे. 
  • यात कमीत कमी पाच वर्षे इतका कालावधी गुंतवणुकीसाठी अपेक्षित असतो. सर्वसाधारणपणे काही फंडच्या माहितीनुसार सरासरी बघितली तर थीमॅटिक फंडमधला पाच वर्षाचा परतावा 25.50% इतका आहे.
  • छोट्या किंवा मध्यम कालावधीसाठी गुंतवणूक करून पैसे काढून घेतल्यास गुंतवणूकदाराचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे पैसे गुंतवण्याचा हेतू लक्षात घेऊनच थीमॅटिक फंडमधे गुंतवणूक करणं  फायद्याचं ठरू शकतं.
  • आपत्कालीन पैशाची व्यवस्था आणि पैशाची तरलता या गोष्टी लक्षात ठेवूनच गुंतवणूकदारांनी थीमॅटिक फंडमधे गुंतवणूक करणं योग्य ठरतं. 
  • कोणत्याही म्युच्युअल फंडमधे गुंतवणूक करताना ज्याप्रमाणे शेअरमार्केट मधले संभाव्य चढ-उतार, भूराजकीय घडामोडी, मार्केटसंबंधी एखादी वाईट बातमी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी या सगळ्यांचा परिणाम होत असतो. त्याचप्रमाने एखाद्या उद्योग विश्वामधल्या बातमीच्या घटनेचा परिणाम एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर झाला तर थीमॅटिक फंडमधली जोखीम कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

गुंतवणूक : फंड ऑफ फंडस 

मार्केटमधे असणारे थीमॅटिक फंड:

सध्या मार्केटमधे बरेच थीमॅटिक फंड उपलब्ध आहे. काही थीमॅटिक फंड पुढीलप्रमाणे आहे. (इथे दिलेले फंडची नावे ही केवळ महितीकरता असून यामधे कुठल्याही प्रकारे गुंतवणूक करण्याचा सल्ला वेबसाईटद्वारे देण्यात आलेला नाही.)

  • फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंड
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चरिंग फंड  डायरेक्ट ग्रोथ
  • डीएसपी नैसर्गिक संसाधने आणि नवीन ऊर्जा फंड 
  • एसबीआय एनर्जी अपॉर्च्युनिटी फंड 
  • आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्सपोर्ट अँड सर्विसेस फंड 

 

Share this article on :
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

बदललेल्या स्वरूपातील राष्ट्रीय पेन्शन योजना

Reading Time: 3 minutes ★सरकारने महागाईशी निगडित पेन्शनचा, देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा भार लक्षात घेऊन त्यास पर्याय…

MRF चा शेअर्स महाग आहे असे तुम्हाला वाटत असेल तर हा लेख नक्की वाचा !

Reading Time: 3 minutes MRF म्हटले की आपल्या डोळ्यासमोर विराट कोहलीची जाहिरात येते. भारतीय उद्योग क्षेत्रातील…

पी व्ही सुब्रमण्यम यांच्याशी बातचीत भाग 3

Reading Time: 5 minutes असा एक प्रश्न आहे की आम्ही मुंबईत 1बीएचके घर घेऊ इच्छितो आमच्याकडे…

मार्केट कधी पडणार?

Reading Time: 3 minutes अस्थिरता हा बाजाराचा स्थायीभाव आहे. गेले काही दिवस मार्केट निर्देशांक नवनवे उच्चांक…