रिफंडची रक्कम जमा झाल्याचा मेसेज आलाय? सावधान

Reading Time: 2 minutes “Salary Credited to Your Account No. xxxxxx .” हा मेसेज सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातला एक महत्वाचा आणि आनंद देणारा मेसेज आहे. असाच एक मेसेज सध्या व्हाट्स ऍपवर फिरतो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून येणारा ‘रिटर्न अमाऊंट क्रेडीटेडचा मेसेज’! दुर्दैवाने ‘सॅलरी क्रेडीटेड’च्या मेसेजप्रमाणे हा मेसेज आनंद देणारा नाही.  इन्कम टॅक्स डिपार्टकडून अशा प्रकारचे कोणतेही मेसेज नागरिकांना पाठविण्यात आलेले  नसून अशा प्रकारच्या मेसेजेसच्या बाबतीत नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.