Advance Technology: या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवली

Reading Time: 2 minutesसध्याचे युग हे डिजिटल युग आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने (Advance Technology) जगभरातील जवळपास सर्वच क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे . कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि क्लाउड कम्प्युटिंग यासारख्या तंत्रज्ञानामुळे उद्योजकांपुढील सुरुवातीचे अ़डथळे कमी झाले आहेत. ते स्टार्टअपना उद्योगाच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि वातावरण उभारण्याची चिंता त्यांना करावी लागत नाही. कदाचित यामुळेच, फॉर्च्युन बिझनेस इनसाइट्स स्टडीनुसार, एआय मार्केटची वाढ ३३.२ टक्क्यांच्या CAGR वरहोण्याची शक्यता आहे.