इंटरनेट बँकिंग – धोके आणि सुरक्षा, भाग ३
Reading Time: 2 minutesधोक्याची सूचना!
इंटरनेट बँकिंग वापरताना कळत नकळत अशा काही चुका होऊन जातात की ज्यामुळे तुमची जमापुंजी धोक्यात येते. मोठे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव करायचा असेल तर इंटरनेट बँकिंग चा काळजीपूर्वक वापर करणं फार महत्वाचं आहे.
इंटरनेट बँकिंग हे साधन जितकं सोईस्कर आहे तितकच धोक्याचाही आहे. इंटरनेट बँकिंग बद्दलची अपुरी माहिती फार महागात पडू शकते. ‘Half knowledge is always dangerous’ असं म्हणतात, ते इथेही खरं आहे.
ऑनलाईन आर्थिक व्यवहार हाताळताना, मग ते लहान रकमेचे असोत की करोडोंचे, पुढील काही गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत. तरच तुम्ही खऱ्या अर्थाने नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेऊ शकता, अथवा ऑनलाईन फ्रॉड, आणि तत्सम धोक्याची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असेल.