अक्षय्य तृतीया: सोने खरेदीचे हे नवीन पर्याय तुम्हाला माहिती आहेत का?

Reading Time: 3 minutes यावर्षी अक्षय्य तृतीया कोरोनाच्या सावटाखाली आहे. मागील वर्षांपासून कोरोना व्हायरसमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं आहे. सणांचा उत्साह कुठेतरी हरवून गेला आहे. लॉकडाऊनमुळे दुकानेही बंद आहेत. यावर्षी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल, तर तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन गुंतवणूक देखील अत्यंत सुरक्षित पर्याय आहे.